शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
3
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
4
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
5
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
6
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
7
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
8
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
9
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
10
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
11
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
12
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
13
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
14
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
15
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
16
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
17
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
18
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
19
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
20
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
Daily Top 2Weekly Top 5

सलग सुट्ट्यांमुळे रायगड पर्यटकांनी फुलला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2017 02:31 IST

अलिबाग : ख्रिसमस आणि सरत्या इंग्रजी वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्याच्या रेवस-मांडवा-सासवने-किहिम-थळ-वरसोली-अलिबाग-आक्षी-नागाव-पालव-चौल-रेवदंडा-बारशिव-काशिद-नांदगाव-मुरूड-दिवेआगर-श्रीवर्धन या किनारपट्टीतील सर्व हॉटेल्स, रिसॉर्ट आणि घरगुती निवारे हाउसफुल्ल झाले.

विशेष प्रतिनिधी अलिबाग : ख्रिसमस आणि सरत्या इंग्रजी वर्षाला निरोप आणि नववर्षाच्या स्वागतासाठी रायगड जिल्ह्याच्या रेवस-मांडवा-सासवने-किहिम-थळ-वरसोली-अलिबाग-आक्षी-नागाव-पालव-चौल-रेवदंडा-बारशिव-काशिद-नांदगाव-मुरूड-दिवेआगर-श्रीवर्धन या किनारपट्टीतील सर्व हॉटेल्स, रिसॉर्ट आणि घरगुती निवारे हाउसफुल्ल झाले. रविवारी रात्रीच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यातील किनारपट्टीतील छोट्या-मोठ्या हॉटेल्ससह रिसॉर्ट आणि घरगुती निवाºयांमध्ये दाखल पर्यटकांची संख्या दहा लाखांच्या वर गेल्याची माहिती किनारपट्टीतील विविध हॉटेल व्यावसायिक व पोलीस यंत्रणेशी संपर्क साधला असता ‘लोकमत’ला प्राप्त झाली आहे.मुंबई नगरीस अगदी खेटून असलेल्या आणि समुद्रमार्गे केवळ ४० मिनिटांच्या अंतरावर असलेल्या मांडवा जेट्टीवरून मोठ्या प्रमाणात पर्यटक मांडवा, सासवने, थळ, अलिबाग परिसरात आले आहेत. मांडवा परिसरात ५२ नोंदणीकृत हॉटेल्स व रिसॉर्ट असून ते पूर्णपणे हाउसफुल्ल झाले आहेत. मांडवा परिसरात रविवारी सर्वाधिक सुमारे १ लाख ७५ हजार पर्यटक संख्येची नोंद झाल्याचे मांडवा पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक मेघना बुरांडे यांनी सांगितले. तर अलिबाग शहर परिसरातील ४ हजार ५०० हॉटेल्स व रिसॉर्ट व पर्यटक निवाºयांमध्ये पर्यटक दाखल झाले असून ५० हजार मुक्कामी तर तितकेच पर्यटक सकाळी येऊन संध्याकाळी मुंबईस परतत अशा एक लाखापेक्षा अधिक पर्यटकांनी अलिबागला हजेरी लावल्याचे अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी सांगितले.मुरूड तालुक्यातील काशिद येथे ९०, मुरूड येथे ४०, नांदगाव येथे ३५ हॉटेल्स व रिसॉर्ट व पर्यटक निवारे असून खासगी फार्महाउस ७० आहेत. या सर्व ठिकाणी पर्यटकांची तुडुंब गर्दी आहे. रविवारी सुमारे ४० हजार पर्यटक मुक्कामी तर सुमारे ५० ते ६० हजार पर्यटक दिवभराच्या पर्यटनार्थ आल्याचे मुरूडचे पोलीस निरीक्षक किशोर साळे यांनी सांगितले.रेवदंडा परिसरात सुमारे ८० हॉटेल्स, रिसॉर्ट व पर्यटक निवारे असून सुमारे ६० हजार पर्यटकांनी हजेरी लावली असल्याची माहिती रेवदंडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रकाश सकपाळ यांनी दिली आहे. श्रीवर्धनमधील ८० नोंदणीकृत हॉटेल्स व रिसॉर्ट व पर्यटक निवाºयांमध्ये ३ हजार पर्यटक मुक्कामी असून दिवसभरात सुमारे ४० हजार पर्यटक पर्यटनार्थ आल्याचे श्रीवर्धनचे पोलीस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी सांगितले. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी आतापासूनच तरुणाई आणि पर्यटकांची जोरदार तयारी सुरू आहे. त्यासाठी तरुणाईत, पर्यटकांमध्ये पार्टी, नाचगाण्यावर थिरकण्याचे बेतही आखले जात आहेत.>किल्ला पाहण्यासाठी मुरूडमध्ये पर्यटकांची गर्दीनांदगाव/ मुरूड : जंजिरा किल्ला पाहण्यासाठी सोमवारी नाताळ सणाच्या सुट्टीमुळे पर्यटकांनी सकाळपासूनच तुफान गर्दी केली होती. उंद्रे हायस्कूलपर्यंत ते राजपुरी जेट्टीपर्यंत लांबच लांब रांगा दिसून आल्या. तिकीट खिडकीवर पर्यटकांची झुंबड दिसून आली. खोरा बंदरावर वाहनाच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. सलग तीन दिवसांच्या सुट्टीत पर्यटक मौजमजा करताना दिसून येत आहेत. मात्र शनिवारी एक ा पर्यटक महिलेला अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शनिवारी २३ डिसेंबर रोजी नाशिक येथील पर्यटक महिला गंगोत्री देवी (५५) या जंजिरा किल्ल्यावरून परतत असताना त्यांचा अपघात होऊन छातीची बरगडी फ्रॅक्चर झाल्या. जंजिरा किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून होडीत बसताना पाय घसरून त्या होडीच्या मधोमध पडल्याने छातीची बरगडी फ्रॅक्चर झाल्याचे निदर्शनास येत आहे.>मुंबई-पुणे मार्गावर वाहतूककोंडीरायगडच्या किनारपट्टीतील हॉटेल्स व रिसॉर्ट व पर्यटक निवाºयांचे आगाऊ बुकिंग गेल्या महिन्यापूर्वीच झाले असल्याने आयत्या वेळी आलेल्या पर्यटकांची मोठीच पंचाईत झाली होती.रविवारी अलिबागमध्ये काही पर्यटकांना अलिबाग बस स्थानकात बसून रात्र काढावी लागली तर काहींनी शहरातील नागरिकांना विनंती करून घराच्या व्हरांड्यात रात्र काढण्याचा निर्णय घेतला.अलिबाग, मुरूड, काशिद, रेवदंडा, नागाव परिसरातील हॉटेल्स व रिसॉर्ट व पर्यटक निवारे फुल्ल झाले असल्याने आपापल्या चारचाकी वाहनातून आलेल्या पर्यटकांनी संध्याकाळीच मुंबई-पुण्यास जाण्याचा निर्णय घेतला, परिणामी या मार्गावर मोठी वाहतूककोंडी झाली होती. वडखळ ते अलिबाग या केवळ २० ते २५ मिनिटांच्या प्रवासाकरिता तब्बल एक ते दीड तास लागत होता.