शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
"बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून... "; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

cyclone tauktae: तौत्के चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस सज्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2021 21:27 IST

तौक्ते चक्रीवादळ संकटाला जिल्हा प्रशासन तोंड देण्यासाठी तयारी करीत आहे. पोलिसही वादळाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला सहकार्य करत आहे.

निखिल म्हात्रेअलिबाग - तौक्ते चक्रीवादळ संकटाला जिल्हा प्रशासन तोंड देण्यासाठी तयारी करीत आहे. पोलिसही वादळाच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाला सहकार्य करत आहे. समुद्रकिनारी राहणाऱ्या नागरिकांनी वादळ काळात प्रशासनाला साथ द्यावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे. वादळ हे रायगड समुद्रात 17 मेच्या पहाटे येणार असल्याने पोलीस यंत्रणा रात्रभर सज्ज राहणार आहे.रायगड जिल्ह्याला 240 किमीचा समुद्रकिनारा लाभला आहे. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन, उरण या तालुक्यांना समुद्रकिनारे आहेत. वादळाचा फटका हा समुद्रकिनारी आणि खाडी किनारी राहणाऱ्या नागरिकांना अधिक बसत असतो. यासाठी प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. पोलिसांकडूनही नागरिकांना आवाहन केले जात आहे.

पोलीस यंत्रणा सज्जअलिबाग तालुक्यातील अलिबाग, वरसोली, थळ, आक्षी, नागाव, रेवदंडा, किहीम, मांडवा याठिकाणी समुद्रकिनारे आहेत. याठिकाणी पोलीस स्वत: जाऊन मच्छीमार बांधवांना वादळ काळात बोटी घेऊन जाऊ नये, याबाबत सूचना देत आहेत. तसेच नागरिकांनी वादळात बाहेर पडू नये, घरातच रहावे, अशा सूचना देखील पोलिसांकडून दिल्या जात आहे. त्याचबरोबर पोलीस प्रशासनाकडून वादळात झाडे पडल्यास त्वरित रस्ते मोकळे करण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवली असल्याची माहिती अलिबाग पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक ओमप्रकाश कावळे यांनी दिली आहे.

टॅग्स :Tauktae Cycloneतौत्के चक्रीवादळcycloneचक्रीवादळRaigadरायगड