शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

Raigad: फेक व्हिडीओ व्हायरल प्रकरणी न्हावा-शेवा पोलीसांनी आरोपीला गुजरातमधुन घेतले ताब्यात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2024 21:37 IST

Raigad News: व्हॉट्सॲपवर फेक व्हिडिओ व्हायरल करून न्हावा-शेवा परिसरात येणाऱ्या हजारो वाहनचालक, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरविणाऱ्या आरोपी पंकज रामजी गिरी याला न्हावा -शेवा बंदर विभागाच्या पोलिसांनी वडोदरा- गुजरात येथील कार्यालयातुन ताब्यात घेतले आहे.

- मधुकर ठाकूर उरण - व्हॉट्सॲपवर फेक व्हिडिओ व्हायरल करून न्हावा-शेवा परिसरात येणाऱ्या हजारो वाहनचालक, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरविणाऱ्या आरोपी पंकज रामजी गिरी याला न्हावा -शेवा बंदर विभागाच्या पोलिसांनी वडोदरा- गुजरात येथील कार्यालयातुन ताब्यात घेतले आहे.

आरोपीने 'न्हावा शेवा पोर्ट, रायगड येथे एका सरपंचांच्या मुलाचा अपघात झाल्यामुळे त्याने १११ चालकांना मारण्याची शपथ घेतली आहे. चालकांना दिसेल तिथे कापुन टाकले जात आहे. आतापर्यंत १५ ते २० चालकांना मारून टाकलेले आहेत.पोलीसही  चालकांची मदत करत नाहीत. चालकांनी न्हावा-शेवा पोर्टकडे जाऊ नये' अशा आशयाचा व्हिडीओ सोशल मिडीयावरती व्हायरल केला होता.मोठ्या प्रमाणावर व्हायरल झालेल्या या फेक व्हिडीओमुळे ट्रेलरचालक व ट्रांसपार्टर्संमध्ये भीती निर्माण झालेली होती.या व्हायरल झालेल्या फेक व्हिडिओमुळे सर्वांकडून विचारणा केली जात होती.यामुळे पोलिस यंत्रणेवर नाहक ताण पडला होता.

न्हावा-शेवा पोर्टमध्ये दररोज सुमारे ३० ते ३५ हजार कंटेनर ट्रेलर वाहनांची वाहतूक होत असते. या फेक व्हिडीओमुळे मात्र पोर्टमध्ये येणा-या ट्रेलरचालकांच्या मनामध्ये भिती निर्माण झाल्यामुळे आरोपीस शोध घेऊन कारवाई करण्यासाठी पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी आदेश दिलेले होते.न्हावा-शेवा बंदर विभागाचे सहा. पोलीस आयुक्त धनाजी क्षीरसागर व वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली शोध पथक तयार करण्यात आले होते.या पथकात सहा. पोलीस निरीक्षक अमोल शिंदे, पोलीस उपनिरीक्षक नितीन सांगळे, पोलीस हवालदार  वैभव शिंदे, विशाल हिंदोळा, दयानंद कवलगीर, जितेंद्र दबके व राम राठोड यांचा समावेश होता.या शोध पथकाने आरोपी पंकज रामजी गिरी याला वडोदरा-गुजरात येथील कार्यालयातुन मोठ्या शिताफीने ताब्यात घेतलेले आहे.त्याच्याविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची प्रकीया सुरू आहे.

तपासामध्ये आरोपीने त्याला मिळालेल्या ऐकीव माहितीच्या आधारे सदरची अफवा पसरवलेली होती असे समोर आले असुन त्यामध्ये कोणतेही तथ्य नाही. न्हावा -शेवा पोलीसांकडुन सर्व ट्रेलरचालकांना कोणत्याही अफवेवरती विश्वास ठेऊ नये.तसेच कोणत्याही प्रकारच्या आपत्कालीन मदतीसाठी ११२ या हेल्पलाईन क्रमांकावरती संपर्क करण्याचे आवाहन पोलीस उपाआयुक्त पंकज डहाणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

टॅग्स :RaigadरायगडCrime Newsगुन्हेगारी