शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
4
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
5
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
6
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
7
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
8
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
9
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
10
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
11
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
12
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
13
आयोग नव्हे, मतदारच राजा !
14
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
15
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
16
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
17
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
18
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
19
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
20
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले

Raigad: दागिन्यांच्या हव्यासापोटी वृद्धेचा खून, आरोपीच्या २४ तासांतच आवळल्या मुसक्या, उरण पोलिसांची दमदार कामगिरी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2023 20:26 IST

Crime News: बोकडवीरा येथील ललिता ठाकूर या महिलेची बुधवारी हत्या झाली होती.तिचे हातपाय रस्सीने करकचून बांधुन मृतदेह बाथरूममध्ये टाकून खोलीला बाहेरून कुलूप लावून आरोपी अमोल शेलार फरार झाला होता.

- मधुकर ठाकूर 

उरण - भाड्याने दिलेली खोली करण्यासाठी सांगितल्याचा मनात राग धरून आणि अंगावरील दागिन्यांच्या हव्यासापोटीच ५७ वर्षीय वृध्देच्या हत्येप्रकरणी फरार झालेल्या नराधम भाडेकरू अमोल शेलार (३०) यांच्या उरण पोलिसांनी अहमदनगरमधुन २४ तासात मुसक्या आवळल्या असल्याची माहिती वपोनि सुनील पाटील यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकातुन दिली आहे.

बोकडवीरा येथील ललिता ठाकूर या ५७ वर्षीय वृध्द विधवा महिलेची बुधवारी हत्या झाली होती.तिचे हातपायही रस्सीने करकचून बांधुन मृतदेह बाथरूममध्ये टाकून खोलीला बाहेरून कुलूप लावून आरोपी अमोल शेलार (३०) फरार झाला होता.उरण पोलिसांनी न्हावा -शेवा बंदर विभागाचे एसीपी धनाजी क्षीरसागर व वपोनि सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलिस निरीक्षक सुहास चव्हाण,सपोनि विजय पवार यांच्या  पथकाने शिताफीने तपास करीत आरोपीच्या अहमदनगर जिल्ह्यातील ढवळगावातुन २४ तासांच्या तपासानंतर मुसक्या आवळल्या आहेत.चौकशीअंती आरोपीने भाड्याने दिलेली खोली करण्यासाठी सांगितल्याचा मनात राग धरून आणि अंगावरील दागिन्यांची हाव सुटल्यानेच ५७ वर्षीय वृध्देचा निर्घृणपणे खुन केला आहे.चोरलेले दागिने शिरुर-पुणे येथील सराफाकडे गहाण ठेवण्यात आले असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.न्यायालयाने आरोपीला पोलिस कोठडी सुनावली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसRaigadरायगड