शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
2
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
3
कपिल शर्माला टक्कर द्यायला येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
4
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
5
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
6
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
7
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
8
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
9
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
10
मोदींना जिरेटोप घातल्याने वादंग; टीकेनंतर प्रफुल्ल पटेलांनी शिवप्रेमींना दिला 'हा' शब्द
11
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
12
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
13
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
14
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
15
'नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा नक्कीच पंतप्रधान होतील, आम्हालाही त्यांच्यासारख्या नेत्याची गरज; पाकिस्तानी अब्जाधीशांनी केले कौतुक
16
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र
17
'अनिल कपूरसारखा पती नको' असं का म्हणाली होती माधुरी दीक्षित? इंटरेस्टिंग आहे यामागचं कारण
18
IPL Playoffsच्या २ जागांसाठी ५ संघ शर्यतीत; SRH ला ८७.३%, CSK ला ७२.७% टक्के चान्स, तर RCBला...
19
Video - ना स्ट्रेचर, ना कोणाची मदत; आजारी वडिलांना उचलून घेऊन रुग्णालयात फिरत राहिला लेक
20
सूर्यावर भीषण स्फोट; ISROच्या आदित्य L-1 आणि चांद्रयान-2 च्या कॅमेऱ्यात कैद

Raigad: रखडलेल्या खारकोपर-उरण रेल्वे मार्गावर विद्युत वाहिन्या तपासणीच्या कामाला सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2023 5:00 PM

Kharkopar-Uran Railway Update : मागील ५० वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या नेरुळ ते उरण रेल्वे मार्गावरील खारकोपर ते उरण स्थानकापर्यंत सोमवारी (१६) सायंकाळी रेल्वेच्या  विद्युत वाहनाने मार्गावरील विद्युत यंत्रणा तपासणीच्या कामाला सुरुवात झाली आहे.

- मधुकर ठाकूर उरण -मागील ५० वर्षांपासून प्रतिक्षेत असलेल्या नेरुळ ते उरण रेल्वे मार्गावरील खारकोपर ते उरण स्थानकापर्यंत सोमवारी (१६) सायंकाळी रेल्वेच्या  विद्युत वाहनाने मार्गावरील विद्युत यंत्रणा तपासणीच्या कामाला सुरुवात झाली आहे. रेल्वे मार्गावरील सुरू करण्यात आलेल्या या वीज वाहिन्यांच्या तपासणीच्या कामामुळे या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू होण्याच्या चर्चेला पुन्हा एकदा उधाण आले आहे.

सिडको,मध्यरेल्वे यांच्या भागीदारीत २७ किमी लांबीचा आणि १७८२ कोटी खर्चाच्या नेरूळ -उरण महत्वाकांक्षी प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. यापैकी या पहिल्या टप्प्यातील २७ किमी लांबीच्या या रेल्वे मार्गावरील ११ स्थानकांपैकी नेरुळ,सीवूड,सागर संगम, बेलापूर, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर अशा १२.५ किमी अंतरापर्यंत रेल्वे प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आली आहे.त्यानंतर उर्वरित गव्हाण, रांजणपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी,उरण या स्टेशन दरम्यान १४.३ किमी लांबीच्या रेल्वे मार्गावरील दुसऱ्या टप्प्यातील रखडलेल्या कामातील विविध अडथळे दूर करण्यात आले आहेत. स्टेशन उभारणी, रेल्वे ट्रॅक टाकणे, ओव्हरहेड वायर, तिकीट घर, उड्डाण पूल उभारण्याची कामे प्रगतीपथावर असून वेगाने सुरू आहेत.या प्रगतीपथावरील कामांच्या जोरावरच रेल्वे प्रशासनाने मागील दोन वर्षात प्रकल्प पूर्ण करून या महत्त्वाच्या रेल्वे मार्गावरील प्रवासी वाहतूक सुरू करण्याच्या तीन डेडलाईन जाहीर करण्यात आल्या होत्या.दिलेली डेडलाईन्स  पुन्हा हुकणार नाही याची दक्षता घेण्यासाठी मध्य रेल्वे प्रशासनानेही या रेल्वे मार्गावर शिल्लक राहिलेली विविध कामे युद्ध पातळीवर सुरू केली आहेत.या रेल्वे मार्गावर सुरक्षा ट्रायलरनची चाचणीही घेण्याबरोबरच  इतर तपासण्या आदी तत्सम कामांचे टार्गेटही पुर्ण करण्यासाठीही प्रशासनाने कंबर कसली होती.मात्र त्यानंतरही वारंवार दिलेल्या हेडलाईन्स पाळण्यात रेल्वे प्रशासन सपशेल अपयशी ठरले आहे.

पावसाळ्यानंतर सोमवारी (१६) सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास रेल्वेच्या विद्युत वाहनाव्दारे खारकोपर पासून गव्हाण,रांजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी व उरण या मार्गावरील वीज वाहिन्यांच्या तपासणीच्या कामाला रेल्वे प्रशासनाने सुरुवात केली आहे.रेल्वे मार्गावरील सुरू करण्यात आलेल्या या वीज वाहिन्यांच्या तपासणीच्या कामामुळे या मार्गावर लवकरच प्रवासी वाहतूक सुरू होण्याची चर्चा पुन्हा एकदा सुरू झाली आहे.

याबाबत कर्मचाऱ्यांकडे केलेल्या चौकशीत ही रुटिंग तपासणी असून प्रवासी वाहतूक सुरू करण्याआधीही अशाच प्रकारची तपासणी करण्यात येईल अशी माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.तर अपुरी असलेली काही कामे अद्यापही पुर्णत्वास गेलेली नाहीत.या कामासाठी होणारा विलंबच खारकोपर ,गव्हाण, रांजणपाडा, न्हावा-शेवा, द्रोणागिरी,उरण या स्टेशन दरम्यान १४.३ किमी लांबीच्या रेल्वे मार्गावरील दुसऱ्या टप्प्यातील प्रवासी वाहतूक सुरू करण्यात अडथळा ठरत आहे. रेल्वे मार्गावर शक्य तितक्या लवकर प्रवासी वाहतूक सुरू करण्यासाठी प्रशासनाचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत.त्यामुळे या रखडलेल्या रेल्वे मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्यात आणखी किती काळावधी जाईल हे निश्चितपणे सांगता येणार नसल्याचे  मध्यरेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

टॅग्स :Mumbai Suburban Railwayमुंबई उपनगरी रेल्वेRaigadरायगड