शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

रायगडला म्युकरमायकोसिसचे रुग्ण नाहीत; स्टेरॉइड्स, टोसिलिझुमॅब इंजेक्शनचे परिणाम टाळण्याचे प्रयत्न यशस्वी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2021 08:29 IST

विशेषतः मधुमेह असलेल्या रुग्णांना तो होत असून, त्यामुळे अनेकांना डोळे गमविण्याची वेळ आली आहे. रुग्णाचे केवळ डोळेच नव्हे, तर मूत्रपिंड आणि मेंदूवरही या आजारामुळे आघात होऊ शकतो.

निखिल म्हात्रे - अलिबाग : कोरोनासारख्या जीवघेण्या आजारातून वाचविण्यासाठी देण्यात येणारे स्टेरॉइड्स आणि अन्य टोसिलिझुमॅब इंजेक्शनचे आता प्रतिकूल परिणाम दिसत असून, म्युकरमायकोसिस हा बुरशीसारखा आजार होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. मात्र, रायगड जिल्ह्यात आतापर्यंत एकाही रुग्णाला या आजाराची लागण झाली नसल्याने डाॅक्टरांच्या प्रयत्नांना यश आले आहे. विशेषतः मधुमेह असलेल्या रुग्णांना तो होत असून, त्यामुळे अनेकांना डोळे गमविण्याची वेळ आली आहे. रुग्णाचे केवळ डोळेच नव्हे, तर मूत्रपिंड आणि मेंदूवरही या आजारामुळे आघात होऊ शकतो. फेब्रुवारीपासून कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली. दुसरी लाट इतकी भयंकर आहे की, अनेक रुग्णांना ऑक्सिजनचीही गरज भासत आहे. कोरोना रुग्णांची गंभीर अवस्था असेल, तर त्यांना वाचविण्यासाठी उपचार करणारे डॉक्टर्स स्टेरॉइड्स आणि अन्य टोसिलिझुमॅब इंजेक्शनचा वापर करतात. त्यानंतर, हे रुग्ण बरे होत असले, तरी नंतर मात्र, अशा औषधांच्या माऱ्याचा प्रतिकूल परिणामही जाणवत आहे. विशेषतः औषधांच्या माऱ्यामुळे म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार होतो. मधुमेह असणाऱ्या रुग्णांवर अशा औषधांच्या डोसचा विपरित परिणाम जाणवत आहे. मात्र, जिल्ह्यातील डाॅक्टरांनी आगोदरच काळजी घेतल्याने रुग्णांना म्युकरमायकोसिसचा सामना करावा लागला नाही. म्युकरमायकोसिस या आजारामुळे डोळे, जबडा अशा ठिकाणी बुरशी जन्य आजार होत आहे. या बुरशीचा आघात होत असल्याने डोळे निकामी होतात आणि ते काढावेही लागत आहेत, तसेच मूत्रपिंड आणि मेंदूवरही या आजाराचा आघात होऊ शकतो, असे जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी राजीव तंबाळे यांनी सांगितले.

ही आहेत लक्षणेकोविड बरा झाल्यावर काही रुग्णांना आणखी एका आजाराचा धोका आहे, तो म्हणजे म्युकरमायकोसिस. आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेतलं की, हा आजार काय आहे आणि कोणाला या आजाराचा जास्त धोका आहे. साधारणतः म्युकरमायकोसिस उपचाराचे हेवी डोस घेण्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते, तसेच नाक कोरडे होणे, गाल सुजणे, डोळे लाल होणे किंवा डोळे दुखणे ही या विकारांची मुख्य लक्षणे आहेत. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसOxygen Cylinderऑक्सिजनhospitalहॉस्पिटलdocterडॉक्टरCorona vaccineकोरोनाची लस