शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुलीला बाहेर काढण्यासाठी कानाखाली मारली"; अविनाश जाधवांनी मारहाण केल्याचे CCTV फुटेज समोर
2
काँग्रेसला आणखी एक धक्का! पक्षानं फंडिंग न दिल्यानं निवडणूक लढण्यास उमेदवाराचा नकार
3
"मोदींनी स्वतःचं कुटुंब तरी कुठं सांभाळलं"; शरद पवारांचा पंतप्रधानांवर पलटवार
4
Video - मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी महुआ मोइत्रांसोबत निवडणूक रॅलीत केला डान्स
5
'...तर आफ्रिकेत जाऊन मतं मागा, कोकणातील शेतकरी लोकप्रतिनिधींवर संतप्त', त्या बॅनरची चर्चा
6
"स्मृती इराणींना निवडणुकीनंतर गोव्यात पाठवणार, गांधी परिवार कोणाला घाबरत नाही"
7
EPF Claim: किती दिवसांत मिळतो EPFO कडून क्लेम? ईपीएफनं म्हटलं, कमीतकमी लागतात 'इतके' दिवस
8
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
9
'नाच गं घुमा'मध्ये नम्रताचं काम पाहून प्राजक्ता माळी भारावली, म्हणाली -"हास्यजत्रेत ती गेली साडेपाच वर्ष..."
10
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
11
...म्हणून काँग्रेसने राहुल गांधींना अमेठी ऐवजी रायबरेलीतून दिली उमेदवारी, असं आहे मतांचं गणित
12
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
13
Sara Tendulkar : सारा तेंडुलकर आता कोरियन ब्युटी ब्रँडची ॲम्बेसेडर; कोणत्या प्रोडक्टची करणार जाहिरात?
14
राणीमुळे झाला होता करण-काजोलमध्ये टोकाचा वाद; 'कुछ कुछ होता हैं' च्या सेटवर झालेलं भांडण
15
संविधान बदलणार बाेलले अन् पक्षाने तिकीट कापले; विश्वेवर हेगडे-कागेरी यांना उमेदवारी
16
मोबाइल चोरी नाहीच; पण, मृत्यूचे गूढ कायम; विशाल पवार संशयास्पद मृत्यू प्रकरण
17
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
18
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
19
भाजप अन् काँग्रेससमोर ‘पिंचहिटर’चे आव्हान ; पठाणच्या ‘एन्ट्री’मुळे देशाच्या नजरा
20
९ मे रोजी सुरू होत आहे वैशाख मास; रखरखीत उन्हाळ्यातही तो का ठरतो खास? वाचा!

‘निसर्ग’च्या फटक्यानंतर सावरतोय रायगड जिल्हा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2020 12:02 AM

प्रशासनाचे काम सुरू : वादळामुळे अलिबाग, मुरूड, श्रीवर्धनमध्ये नुकसान

निसर्ग चक्रीवादळ हे रायगड जिल्ह्याच्या मुरूड समुद्रकिनारी धडकल्याने याचा फटका हा अलिबाग, मुरूड, श्रीवर्धन तालुक्यांना बसला आहे. या वादळाने खासगी आणि शासकीय मालमत्तेचे आर्थिक नुकसान झाले आहे. जिल्ह्यात अनेक भागांत झाडे उन्मळून पडल्याने रस्ते बंद झाले आहेत. अनेक इमारतींचे पत्रेही उडाले आहेत. पाऊस थांबल्यानंतर पोलीस प्रशासनाने जेसीबीच्या साह्याने रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे.

पोलादपूर वीज महावितरणकडून कामाला सुरुवातपोलादपूर : बुधवारी आलेल्या निसर्ग चक्रीवादळामुळे तालुक्यात विद्युत पोल कोसळून, तारा तुटून वीजपुरवठा खंडित झाला होता. या पार्श्वभूमीवर वीज महावितरण कंपनीकडून कामाला तातडीने सुरुवात करण्यात आली असून वीजपुरवठा लवकरच सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे महावितरणकडून सांगण्यात आले आहे. यासाठी अजय सलगर आणि टीम मेहनत घेत आहे.पोलादपूर शहर परिसरातील एल टी लहान लाइन १४ खांब तर एच टी मेन लाइन पोलादपूर पेट्रोल पंप येथील एक खांब आणि राजेवाडी भागातील पाच खांबांचे नुकसान झाल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. मात्र, महावितरणने कामाला युद्धपातळीवर सुरुवात केली असून राजेवाडी भागातील पोल उभे करण्यात आले आहेत. पेट्रोल पंपावरील खांबांच्या दुरुस्तीचे कामही सुरू करण्यात आले आहे. पोलादपूर शहर परिसरातील विद्युत खांब दुरुस्तीनंतर सायंकाळपर्यंत वीजपुरवठा सुरळीत सुरू होईल, असे सांगण्यात आलेआहे.दरम्यान, तालुक्यातील ग्रामीण भागातील खंडित वीजपुरवठा सुरळीत कण्यासाठी सर्व विभागांत कर्मचारी काम करीत आहेत. ग्रामीण भागात वीज वितरण कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, ही कामेही लवकरच सुरळीत करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले.नुकसानग्रस्तांना तत्काळमदत करावी - प्रवीण दरेकरच्अलिबाग : निसर्ग वादळाचा तडाखा कोकण किनारपट्टीला सर्वाधिक बसला आहे. त्यामुळे राज्य सरकारने कोकणासाठी विशेष पॅके ज जाहीर करीत तत्काळ मदत करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी अलिबाग येथे केली आहे. तसेच जिल्ह्यात झालेल्या दोन मृत्यूची माहिती घेऊन अलिबाग तालुक्यातील रामराज-उमठे येथील मृतांच्या नातेवाइकांची भेट घेतली.च्श्रीवर्धन, मुरुडसह अलिबागला निसर्ग वादळाचा चांगलाच तडाखा बसला. जिल्हाभरात झालेल्या नुकसानाची पाहणी करण्यासाठी विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर अलिबागेत आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकऱ्यांकडून झालेल्या नुकसानाची माहिती घेऊन नुकसानीचे तत्काळ पंचनामे करावेत, अशा सूचना अधिकाऱ्यांना त्यांनी दिल्या.चक्रीवादळात भिंत कोसळून महिला ठारमाणगाव : गोरेगाव शहरनजीक देवळी गावात एका घराची भिंत वादळात पडल्याने घरातील एक महिला जागीच ठार झाली तर दोघे जखमी झाल्याची घटना ३ जून रोजी दुपारी १ वाजता घडली. ललिता नथुराम सत्वे (४५, रा. उणेगाव) या माहेरी देवळी येथे आल्या आसता घराची भिंत कोसळून डोक्यात मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे भाऊ राजेंद्र भगोजी कालेकर (३५, रा. देवळी), भावजय विक्रांती विक्रम कालेकर (२५) हे दोघे जखमी झाले.माणगाव तालुक्यात निसर्गचे थैमानमाणगाव : तालुक्यात निसर्ग चक्रीवादळामुळे मुंबई-गोवा महामार्गावर, राज्यमार्गावर व विविध अंतर्गत ठिकाणी झाडे पडली होती. आपत्कालीन यंत्रणेने ही झाडे ताबडतोब दूर केली. तसेच मुंबई-गोवा महामार्गावर इंदापूर येथे सिलिंडर असलेल्या ट्रेलरला आग लागली. प्रशासनाने अग्निशामक दलास बोलावून ही आग विझविण्यास मदत केली. तालुक्यात अनेक ठिकाणी घरांची पडझड झाली आहे.

टॅग्स :Cyclone Nisargaनिसर्ग चक्रीवादळ