रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले, नागोठण्यात पूरस्थिती
By Admin | Updated: July 3, 2016 10:01 IST2016-07-03T09:47:03+5:302016-07-03T10:01:34+5:30
रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. २४ तासात रायगड जिल्ह्यात एकूण १८८५.५० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

रायगड जिल्ह्याला पावसाने झोडपले, नागोठण्यात पूरस्थिती
style="text-align: justify;">जयंत धुळप
अलिबाग, दि. ३ - रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला आहे. २४ तासात रायगड जिल्ह्यात एकूण १८८५.५० मिमी पावसाची नोंद झाली असून, आंबा व कुंडलीका या दोन्ही नद्यांनी धोकादायक जलपातळी ओलांडल्याने पुर परिस्थिती निर्माण झाली आहे.
जिल्ह्यात सर्वाधिक पावसाची नोंद सुधागड येथे २३४ मिमी झाली आहे. नागोठणे येथे आंबा नदीतील पाण्याने आठ मिटरची पुररेषा ओलांडून जलपातळी ८.२५ मीटर तर रोहा येथे कुंडलीका नदीची २३.९५ मीटर पुररेषा पाण्याने ओलांडून जलपातळी २४ मीटर झाली आहे. पुराचे पाणी अष्टमी(रोहा) पुलावर आल्याने वाहतुक ठप्प झाली आहे.
दरम्यान जिल्ह्यात गेल्या 24 तासात रोहा-184, अलिबाग-87, पेण-155, मुरुड-37,पनवेल-157.20, उरण-106, कर्जत-145, खालापुर-134, माणगांव - 83, तळा-97, महाड-133, पोलादपुर-122, म्हसळा-47.60, श्रीवर्धन -40, माथेरान-123 मिमी पाऊस झाला आहे.