सीसीटीएनएस कार्यप्रणालीत राज्यात रायगड जिल्हा पोलीस दल तिसरे

By निखिल म्हात्रे | Published: September 10, 2023 07:02 PM2023-09-10T19:02:05+5:302023-09-10T19:02:18+5:30

लोकमत न्युज नेटवर्क  अलिबाग - सीसीटीएनएस कार्यप्रणाली मध्ये रायगड जिल्हयाने राज्यात पुन्हा एकदा आपली सरशी सिध्द केली आहे. सन ...

Raigad District Police Force is third in the state under CCTNS system | सीसीटीएनएस कार्यप्रणालीत राज्यात रायगड जिल्हा पोलीस दल तिसरे

सीसीटीएनएस कार्यप्रणालीत राज्यात रायगड जिल्हा पोलीस दल तिसरे

googlenewsNext

लोकमत न्युज नेटवर्क 
अलिबाग - सीसीटीएनएस कार्यप्रणाली मध्ये रायगड जिल्हयाने राज्यात पुन्हा एकदा आपली सरशी सिध्द केली आहे. सन २०२२ प्रमाणे सन २०२३ मध्ये आपले सातत्य कायम ठेवत रायगड पोलीस दलाने वार्षिक गुणांकनामध्ये राज्यातून तिसरे स्थान प्राप्त केले आहे. दरवर्षी सीसीटीएनएस कार्यप्रणालीचा जास्तित जास्त वापर, गुन्हे प्रकटीकरण व गुन्हे प्रतिबंध करणेसाठी सर्व घटकांकडुन मासिक कामगिरीचा आढावा घेण्यात येतो. त्यानुसार घटकांच्या कामगिरीचे मुल्यांकन करून उल्लेखनिय कामगिरी करणाऱ्या घटकांचा महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळावामध्ये गौख करण्यात येतो.

रायगड जिल्हयाने सन २०२२ चे सातत्य कायम ठेवत सन २०२३ मध्ये सीसीटीएनएस कार्यप्रणालीच्या नावाप्रमाणे कर्तव्य पार पाडत जुलै महिना पर्यंत १ प्रथम, ४ व्दितीय व २ वेळा तृतीय क्रमांक प्राप्त करीत सीसीटीएनएस प्रणालीच्या वार्षिक गुणांकनात तिसऱ्या क्रमांकाच्या पारितोषीकावर आपले नाव कोरले.

शनिवारी राज्य राखीव पोलीस दल, गट क्रमांक २, रामटेकडी-पुणे येथे १८ या महाराष्ट्र पोलीस कर्तव्य मेळावा सन २०२३ च्या दिमाखदार समारोप सोहळया दरम्यान  पोलीस महासंचालक  रजनीश सेठ यांच्या हस्ते जिल्हा पोलिस अधिक्षक सोमनाथ घार्गे,  व सीसीटीएनएस रायगड टिम यांना तृतीय क्रमांकाची ट्रॉफी देवून सन्मानित करण्यात आले.

रायगड जिल्हयाने पोलीस ठाण्यात दाखल होणारे गुन्हे, अहवाल यांची सीसीटीएनएस मधील फॉर्मची तत्काळ नोंदणी, सिटीझन पोर्टल वरील प्राप्त तक्रारींची तत्काळ निर्गती, सीसीटीएनएस प्रणालीचा वापर करून करण्यात येणारे गुन्हे प्रकटीकरण, प्रतिबंधक कारवाई यामध्ये विशेष कामकाज करीत सदरचे यश प्राप्त केले आहे. 

पोलीस ठाण्यात अटक होणाऱ्या गुन्हेगारांची कुंडली जुळविण्यात सदर प्रणाली अत्यंत प्रभावी ठरत असुन रायगड जिल्हा पोलीस दलाची ही घोडदौड यापुढेही अशीच सुरु राहील असे प्रतिपादन अपर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे यांनी केले आहे.

रायगड पोलीस दलातील अधिकारी व अंमलदार यांच्या अपार मेहनतीचे हे यश आहे. यामध्ये सातत्य कायम ठेवत यापुढेही रायगड जिल्हा अग्रस्थानी ठेवण्याकरीता प्रयत्नशिल राहू असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक रायगड सोमनाथ घार्गे यांनी केले आहे.

Web Title: Raigad District Police Force is third in the state under CCTNS system

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Policeपोलिस