शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
4
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
5
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
6
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
7
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
8
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
9
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
10
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
11
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
12
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
13
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
14
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
15
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
16
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
17
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
18
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
19
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

Raigad: उरण एसटी स्थानकात पाण्याचा ठणठणाट : प्रवासी वाहतूकीत वाढ, मात्र प्रवाशांचा घसा कोरडाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2023 22:57 IST

Raigad: उरण एसटी बस स्थानकातून १६ मार्गावरील दररोज २० ते २२ हजारांहून प्रवासी वाहतूक होत आहे.मात्र प्रवासी वाहतूकीत वाढ झाली असताना मात्र बस स्थानकात  पाण्याची व्यवस्था नसल्याने  प्रवाशांचा घसा कोरडा पडतो आहे.

- मधुकर ठाकूर उरण : उरण एसटी बस स्थानकातून १६ मार्गावरील दररोज २० ते २२ हजारांहून प्रवासी वाहतूक होत आहे.मात्र प्रवासी वाहतूकीत वाढ झाली असताना मात्र बस स्थानकात  पाण्याची व्यवस्था नसल्याने  प्रवाशांचा घसा कोरडा पडतो आहे.

उरण स्थानकातुन एसटी महामंडळाच्या एकूण १६ मार्गांवर २५० गाड्यांच्या फेऱ्या होतात.या २५० फेऱ्यात दररोज २० ते २२ हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करतात.मात्र प्रवासी संख्या वाढत चालली असताना मात्र प्रवाशांसाठी कोणत्याही प्रकारची सुविधा उपलब्ध नाही.त्यामुळे दररोज प्रवास करणाऱ्या हजारो प्रवाशांचा घसा कोरडा पडतो आहे.उरण स्थानकातच पिण्याच्या पाण्याचा ठणठणाट जाणवत असल्याने गरीब सामान्य  प्रवाशांना बाहेरून बाटलीचे महागडे खरेदी करावे लागते.या अतिरिक्त खर्चाच्या भारामुळे प्रवासी वर्गात असंतोष निर्माण झाला आहे.

उरण स्थानकातून दररोज ये-जा करणाऱ्या प्रवाशांमध्ये वाढ होत चालली आहे.मागील आर्थिक वर्षात एप्रिल २०२२ पर्यंत प्रवाशांची संख्या १ लाख २७ हजार ६५६ होती.त्यामध्ये २२-२३ या आर्थिक वर्षात प्रवासी संख्या वाढून  ३ लाख ९१ हजार ६६७ वर पोहचली आहे. मात्र या स्थानकात प्रवाशांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नाही. चाणजे ग्रामपंचायतीकडून दिड इंच व्यासाचे पाण्याचे कनेक्शन देण्यात आले आहे.मात्र बस स्थानक आणिवर्कशॉप येथील दोन्ही वॉटर कुलर मशिन अनेक महिन्यांपासून बंद पडल्या आहेत.नवीन दोन वॉटर कुलर मशिनची मागणी आहे.मागील वेळाही काही स्वयंसेवी संस्थांकडून वॉटर कुलर मशिनची व्यवस्था करण्यात आली होती.यावेळीही अशा स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मदतीची अपेक्षा आहे. - सतीश मालचे -उरण एसटी डेपो व्यवस्थापकसध्या कडकडीत रणरणत्या उन्हात एसटी प्रवाशांची पाण्याविना तडफड सुरू आहे. त्यामुळे उरणच्या एस टी स्थानकात पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी अमित पाटील आणि इतर प्रवाशांकडून केली जात आहे.

टॅग्स :Raigadरायगडstate transportएसटी