शहरं
Join us  
Trending Stories
1
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
2
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
3
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
4
महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
5
पळून गेलेले सासू-जावई सापडले, ७२ तास पोलिसांना दिला चकमा; म्हणाली, "मी फक्त माझ्या..."
6
कोलकाता आगीत १४ जणांचा होरपळून मृत्यू; PM मोदींनी शोक व्यक्त करत जाहीर केली २ लाखांची मदत
7
PF सदस्यांच्या किमान पेन्शनमध्ये ३ पट वाढ होणार? कोट्यवधी कर्मचाऱ्यांना होईल फायदा
8
IPL सामन्यानंतर मोठी घटना! कुलदीप यादवने रिंकू सिंहच्या दोनदा कानशिलात लगावली; Video व्हायरल...
9
नरसिंह मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या भाविकांवर कोसळली भिंत, 8 जणांचा मृत्यू
10
Stock Market Today: पळून थकला का शेअर बाजार? ८२ अंकांच्या तेजीसह शेअर बाजार उघडला; ऑटो-PSU Bank मध्ये विक्री
11
आता अमेरिकेतील दीड लाख भारतीय ट्रकचालक संकटात; अस्खलित इंग्रजीतच बोलण्याचा ट्रम्प यांनी काढला नवा आदेश
12
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
13
₹७७ लाखांचं घर : Home Loan EMI भरावे की SIP करावी, घर खरेदीची स्मार्ट पद्धत कोणती? पाहा कॅलक्युलेश
14
MBBS युवतीचा संशयास्पद मृत्यू, दिल्लीला परीक्षेला गेली होती; जळालेल्या अवस्थेत...
15
'या' कंपनीनं केली दुधाच्या दरात वाढ; आजपासून लागू होणार नवे दर, कारण काय?
16
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
17
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
18
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
19
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
20
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं

रायगडमध्ये भाजपा हाच महाविकास आघाडीचा प्रतिस्पर्धी; राष्ट्रवादी काॅंग्रेसचा अलिबागमध्ये संपर्क दाैरा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 16, 2020 18:18 IST

पक्ष संघटना मजबूत करण्याचे आवाहन

रायगड- पक्ष संघटना मजबूत करण्यावर भर देतानाच मित्र पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांचा पक्ष प्रवेश घेणार नाही. असा ठरावच वरिष्ठ पातळीवर झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यात भाजपा हाच एक नंबरच प्रतिस्पर्धी राहणार आहे, असे राष्ट्रवादी काॅंग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस खासदार सुनिल तटकरे यांनी येथे स्पष्ट केले.

स्वराज्य संस्थांच्या निवडणूकांचे वारे आता जिल्ह्यात वाहू लागले आहेत. त्या आधीच राष्ट्रवादी काॅंग्रेसने जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्येकर्ते यांच्याबराेबर सयुंक्त दाैऱ्याचे आयाेजन केले आहे. शुक्रवारी अलिबाग तालुक्यामध्ये या दाैऱ्यांचे आयाेजन भाग्यलक्ष्मी हाॅल येथे करण्यात आले हाेते. त्याप्रसंगी खासदार तटकरे बाेलत हाेेते. त्यांनी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गाऱ्हाणी एेकून घेतली. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी सर्वांनी जाेमाने कामाला लागावे असे आवाहन त्यांनी केले.

गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत घटक पक्ष असणाऱ्या शेकापचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांच्याबराेबर समन्वय राहीला नाही का असा प्रश्न विचारण्यात आला. " का धरला मजवरी राग..."असे गीत गाऊन तटकरे यांनी आमदार पाटील रागवाले असल्याचे सुचकपणे सांगितले. मात्र याबाबतीमध्ये वेळ आल्यावर बाेलेण असेही सांगायला ते विसरले नाहीत. शेकापहा महाविकास आघाडीचा सुरुवातीपासूनचा घटक पक्ष असल्याने " जीवनातली घडी अशीच राहू दे ..."  अशी आर्त हाक त्यांनी आपल्या खाल शैलीतून आमदार पाटील यांना दिली आहे. आमदार पाटील याबाबत काेणती भूमिका घेतात हे लवकरच स्पष्ट हाेणार आहे. आगामी स्वराज्य संस्थांच्या निवडणूका महाविकास आघाडीच्या माध्यमातून लढण्याबाबत वरिष्ठ पातळीवर निर्णय घेण्यात येईल, परंतू भाजपा हाच एक नंबरचा प्रतिस्पर्धी असेल असेही त्यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, याप्रसंगी काेराेना कालावधीत आणि निसर्ग चक्रीवादळात पुढे हाेऊन काम करणाऱ्या पत्रकार आणि सामाजिक कार्यकर्ते यांना खासदार तटकरे यांच्याहस्ते गाैरवण्यात आले. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश लाड, अलिबाग तालुकाध्यक्ष दत्ता ढवळे, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुरेश घारे, अलिबाग तालुका राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे अध्यक्ष मनाेज शिर्के, वाडगावचे माजी सरपंच जयेंद्र भगत, आशिष भट यांच्यासह अन्य मान्यवर पदाधिकारी उपस्थित हाेते. पालकमंत्री आदिती तटकरे यांची मंत्रालयामध्ये विशेष बैठक असल्याने त्या या बैठकीला उपस्थित राहू शकल्या नाहीत.पेण अर्बन बॅंकेतील ठेवीदार खातेदार यांना तातडीने न्याय देण्यासाठी त्यांना पैसे कसे देता येतील याबाबत कालबध्द कार्यक्रम आखाण्यात यावा असे निर्देश त्यांनी बैठकीमध्ये दिले. याबाबतची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात सकाळी पार पडली. पेण अर्बन बॅंकेला बळ देण्यासाठी लवकरच तीचे सशक्त बॅंकेत विलगीकरण करण्यासाठी आवश्यकत्या कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करा असेही त्यांनी सांगितले. 

टॅग्स :sunil tatkareसुनील तटकरेNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाRaigadरायगड