शहरं
Join us  
Trending Stories
1
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
2
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
3
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
4
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
5
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
6
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
7
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
8
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
9
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
10
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
11
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
12
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
13
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
14
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
15
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
16
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
17
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
18
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
19
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
20
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...

Raigad: जेएनपीएच्या पीयूबी बिल्डिंगच्या समोरच्या रस्त्यावर, केमिकलने भरलेला टॅकर पलटी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2024 19:56 IST

Raigad News: जेएनपीए बंदरातून फॉस्फरीक ॲसिड वाहून नेणारा टॅकर गुरुवारी दुपारी पोर्ट यूजर बिल्डिंगच्या समोरच्या रस्त्यावर अचानक पलटी झाला.केमिकलने भरलेला टॅकर रस्त्यावरच पलटी झाल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून या मार्गावरील कंटेनर वाहतूक सुमारे तासभर रोखुन ठेवण्यात आली होती.

- मधुकर ठाकूर उरण - जेएनपीए बंदरातून फॉस्फरीक ॲसिड वाहून नेणारा टॅकर गुरुवारी दुपारी पोर्ट यूजर बिल्डिंगच्या समोरच्या रस्त्यावर अचानक पलटी झाला.केमिकलने भरलेला टॅकर रस्त्यावरच पलटी झाल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून या मार्गावरील कंटेनर वाहतूक सुमारे तासभर रोखुन ठेवण्यात आली होती.सुदैवाने वाहनचालक जखमी झाला आहे. मात्र यामध्ये कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

गुरुवारी दुपारच्या सुमारास जेएनपीए बंदरातील गणेश बॅन्जो प्लास्ट या रासायनिक कंपनीतुन  फॉस्फरीक ॲसिड भरलेले टॅकर तळोजातील दिपक फर्टिलायझर कंपनीकडे निघाला होता.पीयुबी बिल्डिंग नजीकच्या उड्डाणपूला जवळील वळणावर येताच वाहनचालकाचे नियंत्रण सुटल्याने टँकर रस्त्यावरच पलटी झाला.यामध्ये वाहनचालक सुभाष शिवाजी गोरे जखमी झाला आहे.सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नसल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर पोलिसांनी दिली.

दरम्यान, फॉस्फरीक ॲसिड भरलेला ट्रॅकर वर्दळीच्या रस्त्यावरच पलटी झाल्याने खबरदारीची उपाययोजना म्हणून काही तास या मार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली होती.तासाभराच्या प्रयत्नांने पलटी झालेला टॅकर क्रेनच्या सहाय्याने व वाहतूक नियंत्रण शाखेच्या पोलिसांच्या मदतीने रस्त्याच्या बाजूला सारून ठेवण्यात आला असल्याची माहिती न्हावा-शेवा बंदर वाहतूक नियंत्रण शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जी.एम.मुजावर यांनी दिली.तर या फॉस्फरीक ॲसिड ज्वलनशील नसुन यांचा वापर खत निर्मितीसाठी केला जात असल्याची माहिती गणेश बॅन्जो प्लास्ट कंपनीचे अधिकारी संदेश म्हात्रे यांनी दिली.

टॅग्स :RaigadरायगडAccidentअपघात