शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
2
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
3
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
4
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
5
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
6
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
7
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
8
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
9
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
10
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
11
मस्तच! नवरात्रीत कन्या पूजनानंतर द्या 'हे' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकलींचे चेहरे
12
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
13
जीएसटीनंतर Activa आणि Jupiter किती झाली किंमत? पहा सर्व कंपन्यांच्या स्कूटर्स... 
14
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!
15
समृद्धी महामार्गावर खरंच खिळे ठोकण्यात आले? MSRDC ने अखेर दिलं स्पष्टीकरण
16
राज ठाकरे-उद्धव ठाकरे बैठक संपली, अडीच तास 'शिवतीर्थ'वर खलबतं; शिवसेना-मनसे युतीचा मुहूर्त ठरला?
17
३० हजार ते ३० लाखांपर्यंत फायदा; जीएसटी कपातीचा कार खरेदीदारांना मोठा लाभ, कोणती गाडी किती स्वस्त?
18
PNB ग्राहकांच्या खिशावरील ताण वाढणार! लॉकर ते ट्रान्झॅक्शनपर्यंतचं शुल्क वाढणार, कधीपासून वाढणार चार्जेस?
19
VIRAL : एकाने उचलली चप्पल तर, दुसराही कमी नाही! दिल्ली मेट्रोमध्ये तुफान हाणामारी
20
युक्रेननंतर आता रशियाने पोलंडवर हल्ला केला? रशियन ड्रोनच्या प्रवेशामुळे नाटो देशांमध्ये घबराट

Raigad: हरिहरेश्वर येथे रूम देण्यास नकार देणाऱ्या हॉटेल मालकाच्या बहिणीस मद्यधुंद पर्यटकांनी चिरडले

By राजेश भोस्तेकर | Updated: October 20, 2024 13:36 IST

Raigad Crime News: श्रीवर्धन तालुक्यातील तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर येथे पुण्याच्या पर्यटकांनी ज्योती सुधाकर धामणस्कर वय 34 वर्ष या महिलेला कारखाली चिरडल्याची धक्कादायक घटना घडली आहे .

श्रीवर्धन - श्रीवर्धन तालुक्यातील तीर्थक्षेत्र हरिहरेश्वर  येथे पुण्याच्या पर्यटकांनी ज्योती सुधाकर धामणस्कर वय 34 वर्ष या महिलेला गाडीखाली चिरडले आहे . प्राप्त सूत्रानुसार शनिवारी मध्यरात्री  १:३० च्या सुमारास पुणे येथील पर्यटकांनी  हरिहरेश्वर येथे  धामणस्कर यांच्या इथे राहण्यासाठी रूमची मागणी केली  मात्र रूम मालकाने आरोपी दारू पिल्याच्या संशयावरून  रूम देण्यास नकार दिला  त्यानंतर संतप्त झालेल्या आरोपीने धामणस्कर यांना मारहाण केली  व हरिहरेश्वर इथून पळ काढला.  मात्र त्यांचा एक सहकारी  स्थानिक नागरिकांच्या ताब्यात सापडला स्थानिकांनी सदरच्या इसमाला ताब्यात घेऊन  त्याच्या सहकाऱ्यांना  बोलावले.  मात्र ताब्यात घेतलेल्या पर्यटकाच्या सहकाऱ्यांनी  परत येऊन वाद घातला व ज्योती सुधाकर धामणस्कर या महिलेस गाडी खाली चिरडल्याच्या फिर्याद श्रीवर्धन पोलीस ठाण्यात देण्यात आली आहे.

श्रीवर्धन पोलीस ठाण्यात  भारतीय न्याय संहिता १०३ व ३४गुन्हा दाखल झाल्याचे  वृत्त आहे . एम एच १२ जी एफ ६१०० सफेद रंगाच्या स्कार्पिओ  गाडीमध्ये असलेल्या  जवळपास दहा व्यक्तींनी  सदरची कृत्य केलेले आहे. इराप्पा यमनाप्पा धोत्रे( पिंपरी चिंचवड  पुणे ) या व्यक्तीस पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे  उपविभागीय पोलीस अधिकारी सविता माने, पोलीस निरीक्षक उत्तम रिकामे   यांच्या मार्गदर्शनाखाली  सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन लटके पुढील तपास करत आहेत. सदर घटनेचे वृत्त  सोशल मीडियामुळे  सर्वत्र पसरल्यामुळे  श्रीवर्धन मधील नागरिक संतप्त झाले . श्रीवर्धन पोलीस ठाणे  व उपजिल्हा रुग्णालय  च्या परिसरात मोठ्या स्वरूपात नागरिकांनी गर्दी केली.

टॅग्स :RaigadरायगडCrime Newsगुन्हेगारी