शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Raigad Rains: रायगडला मुसळधार पावसाचा तडाखा, २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद, अनेक मार्ग ठप्प!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 09:27 IST

Maharashtra Rains: रायगड जिल्ह्याला बुधवारी मध्यरात्रीपासून जोर धारांनी झोडपले.

लोकमत न्यूज नेटवर्क अलिबाग: रायगड जिल्ह्याला बुधवारी मध्यरात्रीपासून जोर धारांनी झोडपले. यामुळे कुंडलिका, आंबा, गांधारी आदी प्रमुख नद्या ओसंडून वाहत आहेत. नागोठणेमध्ये तर पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अलिबाग-रोह्यासह अनेक मार्ग ठप्प झाले आहेत. जिल्ह्यात गेल्या २४ तासांत १२९.३ मिमी पावसाची नोंद झाली आहे. 

अलिबाग, तळा, पोलादपूर, रोहा, महाड या तालुक्यांत पावसाचा जोर वाढल्याने जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी येथील शाळा, महाविद्यालयांना सुट्टी जाहीर केली. बोरघर रस्त्यावर पाणी साचले असल्याने अलिबाग-रोहा रस्ता बंद झाला आहे. जिल्ह्यातील अंबा, कुंडलिका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. पाताळगंगा नदीनेही इशारा पातळी ओलांडली होती. रोहा तालुक्यातील चिंचोली तर्फ आतोणे ग्रामपंचायत हद्दीतील खरबाची वाडी येथील राजेश जाधव यांचे घर मुसळधार पावसात कोसळले. बुधवारी रात्री १२ च्या सुमारास ही घटना घडली. 

नागोठण्यात पुराच्या पाण्याचे थैमाननागोठण्याजवळून वाहणाऱ्या अंबा नदीने गुरुवारी सकाळी ८.३० च्या सुमारास धोक्याची पातळी ओलांडली. पुरामुळे मुख्य रस्त्यावरील वाहतूक पूर्णपणे बंद होती. मिनिडोअर रिक्षा स्टँडच्या परिसरात तसेच नागोठणे बसस्थानकासमोरील परिसरात पुराचे पाणी आल्याने वाहतुकीवर मोठा परिणाम झाल्याचे चित्र दिसून आले. महाडमध्ये पूरस्थिती उद्भवण्याच्या शक्यतेने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

पालघरच्या ग्रामीण भागात दमदार पाऊस पालघर जिल्ह्यात बुधवारपासून पुन्हा पावसाने दमदार सुरूवात केली आहे. विशेष करून वसईसह वाडा, जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. त्यातही ग्रामीण भागात पावसाचा चांगला जोर होता. काही नद्यांवरील पूल पाण्याखाली गेल्याने अनेक गावपाड्यांचा संपर्क तुटला. पालघर जिल्ह्यात एकूण १५२.९ मिलिमीटर इतका पाऊस पडला असून एकूण २६७.२ इतका सरासरी पाऊस झाला आहे. पावसाने नदी, नाले, ओहोळ दुथडी  भरून वाहत होते. वसईमधील पूर्वेकडील तुळींज रस्त्यावर गुरुवारी पावसामुळे पाणीच पाणी झाले होते. शहराच्या सखल भागात पाणी साचले होते. 

टॅग्स :RainपाऊसRaigadरायगडMaharashtraमहाराष्ट्र