शहरं
Join us  
Trending Stories
1
कबड्डीपटू राणा बालचौरियाची गोळ्या घालून हत्या; सिद्धू मुसेवाला हत्येचा बदला घेतल्याची चर्चा
2
IND vs SA T20I: अक्षर पटेल OUT! फक्त ३ वनडे खेळलेला खेळाडू ३ वर्षांनंतर टीम इंडियात
3
भाजपचा विजयी चौकार की काँग्रेस ठरणार ‘गेमचेंजर’? शिवसेना, राष्ट्रवादीसाठी अस्तित्वाची लढाई
4
IPL 2026 Auction Live Streaming : क्रिकेटर्सवर होणार पैशांची 'बरसात'! कधी अन् कुठे पाहता येईल लिलाव?
5
कुख्यात गँगस्टर सुभाषसिंह ठाकूरचा ताबा मिरा भाईंदर पोलिसांकडे; मंगळवारी कोर्टात हजर करणार
6
कोंबड्यांचा व्यवसायाआड चालणारा अमली पदार्थांचा कारखाना पोलिसांकडून उद्ध्वस्त, ११ अटकेत
7
पार्थ पवारांचा भागीदार दिग्विजय पाटील अखेर पोलिसांसमोर; सव्वा महिन्याने बावधन पोलीस ठाण्यात
8
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाला रस्ता वळवताना नियोजनाचा अभाव; शिक्षिकेचा उपचाराअभावी मृत्यू
9
बालविवाह थांबवला..! नवरदेव लग्न मंडपात जाणार होता, पण त्यापूर्वीच दामिनी पथकाची धडक अन्...
10
डोंबिवलीत ४० वार करून खून करणारे आरोपी १२ तासात गजाआड, पाच दिवसांची पोलिस कोठडी
11
लष्कर-ए-तोयबाचा कमांडर साजिद जट्टने रचला पहलगाम हल्ल्याचा कट; NIA चा खुलासा
12
फुटबॉल जगतातील दिग्गजाला जय शाह यांनी दिलं खास निमंत्रण; मेस्सी म्हणाला, "मी नक्कीच पुन्हा येईन!"
13
रणजित गायकवाड यांची हल्ल्यानंतर १० दिवसांनी मृत्यूशी झुंज अपयशी, त्याच दिवशी आरोपी गजाआड
14
उधमपूरमध्ये जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांसोबत चकमक; सुरक्षा दलाने संपूर्ण परिसराला घेरले
15
IPL 2026 Auction : खर्चासाठी MI च्या पर्समध्ये फक्त पावणे तीन कोटी; तरीही ते निवांत कारण...
16
शाब्बास पोरा! ४० लाखांचं पॅकेज सोडून वडिलांचं स्वप्न केलं साकार; आधी IPS, मग झाला IAS
17
"बांग्लादेशींना महाराष्ट्रात आणून सत्ताधाऱ्यांच्या जवळचे लोक ड्रग्स कारखाने चालवत आहेत..."
18
उद्धव-राज ठाकरे एकत्र आले अन् काँग्रेसही सोबत गेली तर..? देवेंद्र फडणवीसांचे स्पष्ट उत्तर
19
सुट्टी नाही! रोहित-विराटसाठीच नव्हे तर BCCI नं गिल आणि सूर्यासाठीही केली 'या' गोष्टीची सक्ती
Daily Top 2Weekly Top 5

दासगाव दरडग्रस्तांचे प्रश्न प्रलंबितच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 1, 2017 07:24 IST

महाड तालुक्यात २००५मध्ये अनेक गावांमध्ये दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती. दासगावमध्ये दरड कोसळून ४८ लोकांचे बळी गेले होते. तर ३८ घरे जमीनदोस्त झाली होती.

दासगाव : महाड तालुक्यात २००५मध्ये अनेक गावांमध्ये दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झाली होती. दासगावमध्ये दरड कोसळून ४८ लोकांचे बळी गेले होते. तर ३८ घरे जमीनदोस्त झाली होती. या दरडग्रस्तांना दासगावमध्येच मुंबई-गोवा महामार्गालगत पत्र्याचे शेड बनवून राहण्याची सोय करण्यात आली होती. गेली ११ वर्षे हे दरडग्रस्त नागरिक आजही त्या पत्रा शेडमध्येच राहत आहेत. चार वर्षांपूर्वी शासनाने या पत्रा शेडचीच जागा दरडग्रस्तांसाठी संपादित करत १३१ प्लॉट तयार केले. या ठिकाणी या लोकांना शासनाने घर बांधण्यासाठी ९५ हजारांचा निधीही मंजूर केला. मात्र, शासनाकडून वारंवार या दरडग्रस्तांकडे दुर्लक्ष झाल्यामुळे आजही दरडग्रस्त घरांची समस्या, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, वीजसमस्या, सांडपाणी प्रश्न, अशा अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. या सर्व समस्या दूर करण्यासाठी महाड-पोलादपूरचे आ. भरत गोगावले यांनी संबंधित सर्व खात्यांच्या अधिकाºयांची बुधवारी याच पत्राशेडच्या ठिकाणी बैठक लावून या ठिकाणच्या समस्या दूर करता येतील, यावर चर्चा केली. त्या वेळी या नवीन वसाहतीला गणेशनगर नावही देण्यात आले असून, गोगावले यांच्या हस्ते याचे अनावरण करण्यात आले.२००५मध्ये दासगावात दरड कोसळून नुकसान झाले होते. त्यानंतर या परिसरातील दरडग्रस्तांना मुंबई-गोवा महामार्गालगत पत्र्याचे निवारा शेड बनवून राहण्याची सोय केली. गेली ११ वर्षे हे नागरिक या शेडमध्ये नरकयातना भोगत आहेत. यांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडून दुर्लक्ष करण्यात आले आहे. चार वर्षांपूर्वी आ. भरत गोगावले यांच्या प्रयत्नाने तात्पुरता निवारा पत्र्याच्या शेडच्या ठिकाणची जागा पुनर्वसनासाठी निश्चित केली. त्या ठिकाणी घर बांधण्यासाठी या दरडग्रस्तांना शासनाने प्रत्येक घराला ९५ हजारांचे अनुदानही मंजूर केले. मात्र, मंजुरीनंतर प्लॉट नागरिकांच्या ताब्यात मिळाले; परंतु पैसे मिळण्यासाठी अनेक निकष असल्याने या ठिकाणच्या दरडग्रस्तांना आपली घरे बांधणे शक्य झाले नाही. काहींनी मात्र आपल्या खिशातील पैसा घालून घरे बांधली; पण शासनाच्या पैशांवर अवलंबून असलेल्या नागरिकांची घरे आजही बांधली गेलेली नाहीत. येथे पिण्याचे पाणी, वीज, गटारे यांचा अभाव तसेच अपुºया निवाºयाअभावी होणारा त्रास, अशा गेली ११ वर्षे नरकयातना भोगत आहेत. मात्र, या समस्या दूर करण्यासाठी महाड पोलादपूरचे आ. भरत गोगावले यांनी संबंधित अधिकाºयांची बुधवारी एक बैठक या पत्रा शेडच्या ठिकाणी आयोजित क रून यावर कोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत चर्चा केली.या बैठकीसाठी महाडचे तहसीलदार, प्रांत कार्यालय प्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, महावितरण अधिकारी, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, दासगावचे सरपंच, उपसरपंच व दासगाव, दाभोळचे ग्रामसेवक, तलाठी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.१२००५मध्ये दासगावच्या दरडीमध्ये ३८ घरे जमीनदोस्त झाली. आजूबाजूच्या या परिसराला धोका असल्याने इतरही त्या ठिकाणच्या रहिवाशांना हलवून दरडग्रस्तांसोबत त्याच्याही राहण्याचा बंदोबस्त त्या वेळी पत्रा शेडमध्ये करण्यात आला. सध्याच्या परिस्थितीत शासनाने चार वर्षांपूर्वी त्याच ठिकाणची जागा संपादित करून १३१ प्लॉट तयार केले.२दरडग्रस्त तसेच इतर धोकादायक स्थितीत असलेल्या दासगावमधील नागरिकांना वाटप करण्यात आले. २८ प्लॉट आजही शासनाकडे या ठिकाणी शिल्लक आहेत. या वाटपानंतर ९५ दरडग्रस्तांनी आपली घरे बांधण्यास सुरुवात केली. घरबांधणीसाठी शासनाकडून ९५ हजारांचा निधी जाहीर झाला होता. मात्र, त्यामध्ये जोपर्यंत बांधकाम सुरू होत नाही, तोपर्यंत पैसे दिले जात नाही.३या ९५ दरडग्रस्तांना पहिला हप्ता २० हजारांचा मिळाला. मात्र, तेवढ्या रकमेत जोताही पूर्ण करू शकत नाही. त्यामुळे अनेकांनी आपल्या खिशातील पैसे खर्च केल्यामुळे २७ घरांचे बांधकाम पूर्ण झाले. तर शेवटच्या टप्प्यात ६ घरे आहेत. २३ जणांनी जोते बांधले; पण पैशाअभावी पुढे काही केले नाही. ९५ दरडग्रस्तांना २० हजारांची पहिल्या हप्त्याची रक्कम मिळाली.४५३ जणांना दुसºया हप्त्याची २० हजारांची रक्कम मिळाली. तर २८ घरांना १५ हजारांचा तिसरा हप्ता मिळाला आहे. आजपर्यंत २७ घरे बांधून झालेली आहेत; पण त्यांना पूर्ण पैसे मिळाले नाहीत. त्यासाठी शासन दरबारी फे ºया मारत आहेत. त्यामुळे उर्वरित कामे राहिलेल्या दरडग्रस्तांच्या घरांचे काय होणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे.वसाहतीचे नामकरणदरडग्रस्तांसाठी होणाºया नवीन वसाहतीला गणेशनगर असे नवीन नाव देऊन नामकरण करण्यात आले आहे. या वेळी नामफलकाचे अनावरण आ. भरत गोगावले यांच्या हस्ते करण्यात आले.गेली ११ वर्षे येथील नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. वहूर, दासगाव नळपाणी पुरवठा योजनेतून पाणीपुरवठा करण्यात येतो.मात्र, कोतुर्डे धरणातून येणारे हे पाणी आटल्यानंतर एप्रिल-मे या दोन महिन्यांत ही योजना ठप्प होते. अशा वेळी एकमेव आधार असणारी येथील विहीरही ताण वाढल्यावर कोरडी पडते.त्यानंतर मात्र येथे कोणताच पाण्याचा स्रोत उपलब्ध होत नाही. पावसाळ्यापूर्वीचे दोन महिने पाण्यासाठी मोठी भटकंती करावी लागते. त्यामुळे या वसाहतीसाठी स्वतंत्र पाणीपुरवठा योजना राबविण्याची गरज आहे.२००५मध्ये दासगावात दरड कोसळून नुकसान झाले होते. त्यानंतर या परिसरातील दरडग्रस्तांना मुंबई-गोवा महामार्गालगत पत्र्याचे निवारा शेड बनवून राहण्याची सोय केली.गेली ११ वर्षे हे नागरिक याशेडमध्ये नरकयातना भोगतआहेत. यांच्या पुनर्वसनासाठी शासनाकडून दुर्लक्ष करण्यातआले आहे.

टॅग्स :Raigadरायगड