शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जाहीर
By Admin | Updated: October 28, 2016 03:50 IST2016-10-28T03:50:32+5:302016-10-28T03:50:32+5:30
नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाचे शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून विद्यमान नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या नावाची घोषणा

शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार जाहीर
अलिबाग : नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाचे शेकाप-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे अधिकृत उमेदवार म्हणून विद्यमान नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांच्या नावाची घोषणा गेल्या आठवड्यात शेतकरी कामगार पक्षाचे सरचिटणीस आमदार जयंत पाटील यांनी केली होती. त्यानंतर गुरुवारी पीएनपी एज्युकेशन सोसायटीच्या मुख्यालय सभागृहात आयोजित उभय पक्षांच्या संयुक्त पत्रकार परिषदेत शेकापचे जि.प.सदस्य अॅड.आस्वाद पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष मनोज धुमाळ यांनी नगरसेवक पदाच्या उमेदवारांच्या नावाची घोषणा केली.
प्रभाग १ अ सुषमा पाटील (अनुसूचित जमाती महिला), प्रभाग १ ब राकेश चौलकर (सर्वसाधारण), प्रभाग २ अ वृषाली ठोसर (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), प्रभाग २ ब अजय झुंजारराव (सर्वसाधारण), प्रभाग ३ अ अॅड. गौतम पाटील (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), प्रभाग ३ ब अश्विनी पाटील (सर्वसाधारण महिला), प्रभाग ४ अ प्रदीप नाईक (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग), प्रभाग ४ ब प्रिया घरत-वेलकर (सर्वसाधारण महिला), प्रभाग ५ अ विनोद सुर्वे (अनुसूचित जाती), प्रभाग ५ ब संजना किर (सर्वसाधारण महिला), प्रभाग ६ अ अॅड. मानसी म्हात्रे (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला), प्रभाग ६ ब उमेश पवार (सर्वसाधारण), प्रभाग ७ अ सुरक्षा शहा (सर्वसाधारण महिला), प्रभाग ७ ब अनिल चोपडा (सर्वसाधारण), प्रभाग ८ अ शैला भगत (अनुसूचित जमाती), प्रभाग ८ ब राजश्री पेरेकर (नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग महिला) आणि प्रभाग ८ क नईमा अफजल सय्यद (सर्वसाधारण महिला) यांचा समावेश आहे. जुन्या सात नगरसेवकांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
यावेळी अलिबागचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार प्रशांत नाईक, विद्यमान उप नगराध्यक्षा तथा उमेदवार सुरक्षा शाह, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस अॅड.जनार्दन पाटील, जिल्हा संघटक ऋषिकांत भगत, जिल्हा सरचिटणीस राजा केणी, चेंढरे ग्रामपंचायत सदस्य दत्ता ढवळे, राष्ट्रवादी काँग्रेस युवक काँग्रेस अध्यक्ष जगदीश घरत, शेकाप कार्यालयीन चिटणीस अॅड.परेश देशमुख आदी उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)