प्रा. उदय जोशी पॅनल विजयी
By Admin | Updated: May 10, 2017 00:15 IST2017-05-10T00:15:31+5:302017-05-10T00:15:31+5:30
रायगड जिल्हा पतसंस्था महासंघाच्या निवडणुकीत प्रा. डॉ. उदय जोशी पॅनेलचे चारही उमेदवार निवडून आले. रायगड जिल्हा नागरी

प्रा. उदय जोशी पॅनल विजयी
लोकमत न्यूज नेटवर्क
अलिबाग : रायगड जिल्हा पतसंस्था महासंघाच्या निवडणुकीत प्रा. डॉ. उदय जोशी पॅनेलचे चारही उमेदवार निवडून आले. रायगड जिल्हा नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित अलिबाग या महासंघाच्या संचालक मंडळाच्या एकूण २१ सदस्यांपैकी १४ सदस्य बिनविरोध निवडून आले होते. तीन जागा रिक्त राहिल्या तर उर्वरित चार जागांकरिता ८ मे २०१७ रोजी मतदान पार पडले. या निवडणुकीत प्रा. डॉ. उदय जोशी पॅनेलचे चारही उमेदवार मोठ्या फरकाने निवडून आले.
एकूण ८४ मतदारांपैकी १ मतदार म्हणजेच बाबूराव भोनकर यांचे ५ मे रोजी रोजी निधन झाले. तर उर्वरित ८३ मतदारांपैकी ७८ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या ७८ मतांपैकी विशेष मागास प्रवर्ग मतदार संघातील डॉ. उदय जोशी पॅनलचे उमेदवार नरसिंह बाळकृष्ण मानाजी (मुरु ड) यांना ५० मते त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार तुळपुळे पॅनेलचे दिलीप कांबळे (म्हसळा) यांना २८ मते मिळाली. अनुसूचित जाती जमाती राखीव मतदार संघातील जोशी पॅनेलचे उमेदवार संजय वानखेडे (अलिबाग) यांना ४६ मते मिळाली तर, त्यांचे प्रतिस्पर्धी तुळपुळे पॅनलचे उमेदवार प्रकाश सोनवडेकर (अलिबाग) यांना ३० मते मिळाली. २ मतपत्रिका बाद झाल्या होत्या. महिलांकरिता राखीव असलेल्या मतदार संघातून निवडून द्यावयाचा २ जागांकरिता जोशी पॅनलच्या कविता ठाकूर (अलिबाग) यांना ४८ मते तर जोशी पॅनेलच्या दुसऱ्या उमेदवार उषा चांदगावकर (रोहा) यांना ४४ मते, तुळपुळे पॅनेलच्या महिला उमेदवार मालती आंग्रे (पनवेल) यांना २९ मते मिळाली तर दुसऱ्या उमेदवार मानसी कर्वे यांना फक्त २७ मते मिळाली.