शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

समाजाला सुसंस्कृत चौकटीत बसवण्यासाठी केलेला उपक्रम कौतुकास्पद - पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2017 22:37 IST

चांगल्या विचारांची भूमिका हि नेहमीच सुसंस्कृत समाज घडवते. लोकमत आणि रायगड पोलिस यांनी समाजाला सुसंस्कृत चौकटीत बसवण्यासाठी उभा केलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी काढले आहेत.

 अलिबाग - सार्वजनिक उत्सवातून मानवता धर्म घडला पाहिजे. त्याकरिता सार्वजनिक गणोशोत्सव स्पर्धेचा प्रयत्न स्तूत्य आहे. स्वधर्म जात-पात हे सर्व नंतर आहे, प्रथम मानवता आहे, असा विचार प्रत्येक मनाच्या अंतकरणातून आला पाहीजे. चांगल्या विचारांची भूमिका हि नेहमीच सुसंस्कृत समाज घडवते. लोकमत आणि रायगड पोलिस यांनी समाजाला सुसंस्कृत चौकटीत बसवण्यासाठी उभा केलेला उपक्रम खरोखरच कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार जेष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी काढले आहेत.

लोकमत आणि रायगड पोलिस यांच्या संयुक्त विद्यमाने आणि बॅन्क ऑफ इंडिया व महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या सहयोगाने जिल्ह्यात आयोजित सार्वजनिक गणोशोत्सव स्पर्धेच्या पारितोषिक वितरण सोहोळ्य़ाचे शानदार आयोजन पीएनपी नाटय़गृहात गुरुवारी करण्यात आले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते. स्पर्धेतील विजयी गणोश मंडळांना पद्मश्री डॉ. श्री.आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्याहस्ते गौरविण्यात आले.

कायद्याच्या राज्यात चूकीला शिक्षा झाली पाहीजे

    मानवाच्या अंतकरणामध्ये अवगुण आणि सद्गुण असे दोन भाग असतात. अवगुणामुळे मानव समाजाला त्रस होतो. काम, क्रोध, लोभ, मत्सर, दंभ, द्वेश, संशय असे  वाईट विचार अंतकारणातूनच येतात. त्याची शिक्षा मात्र शरीराला भोगावी लागते. त्यामध्ये चुकीचे काहीच नाही. कायद्याच्या राज्यात चूकीला शिक्षा झाली पाहीजे, असे डॉ.आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी स्पष्ट केले. सदविचार चांगल्या कामात वापरण्यासाठी मनाचा अभ्यास चांगला असला पाहीजे आणि हेच विचार बैठकीच्या माध्यमातून रुजविण्याचे काम करण्यात येत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. चांगल्या विचारांनी आयुष्य सुखी होण्यास मदत मिळेल, असेही ते म्हणाले.बुवाबाजी अंधश्रध्दा यावर विश्र्वास ठेऊ नका. चांगले विचारच आयुष्याला संरक्षण देतील. बाल वयातच चांगले संस्कार झाल्यास चांगली सुसंस्कृत मने निर्माण होऊन देश समृध्दीला येईल, असे परखड मतही डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी व्यक्त केले. देशभर बैठकीच्या माध्यमातून बाल संस्कार केंद्रे चालवली जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.    सार्वजनिक मंडळांकडे मोठय़ा संख्येने मानव शक्ती आहे. राष्ट्र हीतासाठी त्यांचे योगदान मोलाचे ठरणार आहे. मंडळांनी समाज प्रबोधनासाठी असेच पुढे आले पाहीजे, असे आवाहनही त्यांनी केले. सणासुदीच्या काळात दिवसरात्र रस्त्यावर राहून समाजाला आंनद देण्याचे पोलिसांचे कार्य महान आहे. रस्तावरील वाहतुक सुरळीत राहावी यासाठी समाजानेही स्वत:ला शिस्त लावून घेणो महत्वाचे असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.गणोशोत्सव मंडळांनी राष्टहिताच्या कामात हातभार लावण्यासाठी शाळा, गरीब खेळाडू, समुद्र किनारे दत्तक घ्यावेत. स्पर्धा परिक्षांसाठी गरजूंना पुस्तके उपलब्ध करुन द्यावीत. त्यासाठी जिल्हा प्रशासन सर्वाेतोपरी मदत करेल, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांनी केले. रायगड जिल्ह्यातील गावागावांमध्ये ज्येष्ठ निरुपणकार डॉ.नानासाहेब धर्माधिकारी आणि डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावाच्या कमानी लागल्या आहेत. यातूनच जनसामांन्यांमध्ये असलेला त्यांच्या कार्याचा प्रभाव दिसून येतो. अशा महानविभूतींच्या सानिध्यात काम करायला मिळणो हे भाग्य समजतो, असेही डॉ.सुर्यवंशी यांनी सांगितले.रायगड जिल्हा हा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेला जिल्हा आहे. त्याच जिल्ह्यामध्ये डॉ.धर्माधिकारी परिवार समाज प्रबोधनाचे काम करीत आहे. त्याच जिल्ह्यात काम करायला मिळण्यासाठी भाग्य लागते, असे जिल्हा पोलिस अधिक्षक अनिल पारसकर यांनी सांगितले. लोकमतने समाजिक कार्यात रायगड पोलिसांना सामावून घेतले या बद्दल त्यांनी आभार व्यक्त करुन असे उपक्रम घेण्याचे आवाहन केले.याप्रसंगी प्रकाश भाऊ धर्माधिकारी, सचिनदादा धर्माधिकारी, उमेशदादा धर्माधिकारी बँक ऑफ इंडीयाचे झोनल मॅनेजर विमल राजपूत, अलिबागचे नगराध्यक्ष प्रशांत नाईक, रायगड जिल्हा मध्यवर्ती बॅन्केचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिप नाईक, बँक ऑफ इंडीयाचे विपणन व्यवस्थापक विजय सिंग, वृत्तपत्र वितरक संजय कर्वे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते. नुपूर नृत्य संस्थेच्या ऐश्वर्या आणि श्रव्या यांनी गणोशस्तवन नृत्याने कार्यक्रमाची शानदार सुरुवात केली.  त्यांनी सादर केलेल्या नृत्याला प्रेक्षकांनी टाळ्य़ांच्या गजरात दाद दिली. कार्यक्रमाचे सुरेख सुत्रसंचालन कवयित्री सुजाता पाटील यांनी केले, तर कार्यक्रमाचे आभार पोलिस उपअधिक्षक (गृह) राजेंद्र दंडाळे यांनी व्यक्त केले.

 सार्वजनिक गणोशोत्सव स्पर्धा -2017 पारितोषिक विजेती गणोशोत्सव मंडळेप्रथम पारितोषिक    - रु.1000 आणि स्मृतीचिन्ह     - आदर्श मित्रमंडळ,अलिबाग    व्दितीय पारितोषिक     - रु.7000 आणि स्मृतीचिन्ह    - संत रोहीदासनगर सार्व.गणपती मंडळ,महाड    तृतिय    पारितोषिक    -रु.5000 आणि स्मृतीचिन्ह        -बालमित्र मंडळ,वरची खोपोली,खोपोली.     विशेष उल्लेखनिय पोरितोषिक ,रु.1000 आणि स्मृतिचिन्ह 1.नवतरुण मित्र मंडळ,खानाव,ता.अलिबाग.2.सार्वजनिक गणोश मंडळ,कजर्त बाजारपेठ,कजर्त.3.न्यूस्टार सार्व.गणोशोत्सव मंडळ,तरेआळी, पेण        4.काळकाई माता क्रिडा सार्वजनिक गणोशोत्सव मंडळ, कोतवाल बु़, पोलादपूर.5.श्रीवर्धन उपजिल्हा रुग्णालय,श्रीवर्धन.    6.आदर्श समता नगर रहिवासी मंडळ,माणगांव.    7.श्री भैरवनाथ मित्रमंडळ,परळी-पाली.8.सार्वजनिक गणोशोत्सव,भाटे वाचनालय, रोहा.  गणोशोत्सव काळात गोवा राष्ट्रीय महामार्गावर विनाकोंडी वाहतूक  ठेवण्यात यशस्वी  पोलीस अधिकारी व कर्मचारी गौरव 1.जिल्हा वाहतूक पोलीस शाखा प्रमुख- पोलीस निरिक्षक श्री.मनोज म्हात्रे2.नियंत्रण कक्ष -पोलिस निरिक्षक - श्री.दादासाहेब सिदा घुटुकडे.3.वडखळ पोलीस ठाणो- पोलीस नाईक - महेष काशिनाथ रुईकर.4.महाड शहर पोलीस ठाणो- पोलीस नाईक- भानूदास अनंत म्हात्रे.5. वाहतूक शाखा- पोलीस हवालदार- दिनेश पांडुरंग थळे.6. वाहतूक शाखा- पोलीस हवालदार- प्रविण सुदाम पिंपरकर.7. वाहतूक शाखा- पोलीस हवालदार- सुनिल नामदेव गायकवाड.8. वाहतूक शाखा- पोलीस हवालदार- विशाल विजय येलवे.9.वाहतूक शाखा- पोलीस नाईक- अक्षय एकनाथ जाधव.10.वाहतूक शाखा- पोलीस नाईक- नितेश पांडुरंग कोंडाळकर.11.वाहतूक शाखा- महिला पोलीस शिपाई- संजिवनी गावडू पाटील.12.वाहतूक शाखा- पोलीस शिपाई- सुहास प्रल्हाद काबुगडे. 

 

 

टॅग्स :Ganeshotsavगणेशोत्सव