रायगड सुरक्षा मंडळात भरती प्रस्ताव
By Admin | Updated: October 28, 2015 00:56 IST2015-10-28T00:56:19+5:302015-10-28T00:56:19+5:30
सुरक्षारक्षक म्हटले की नको ती राखणदारी, असे बोलले जाते, त्यामुळे कुणीही याकडे फारसे वळत नाही. मात्र रायगड सुरक्षा रक्षक मंडळाने दिलेल्या योगदानामुळे या क्षेत्राकडे करिअर

रायगड सुरक्षा मंडळात भरती प्रस्ताव
प्रशांत शेडगे, पनवेल
सुरक्षारक्षक म्हटले की नको ती राखणदारी, असे बोलले जाते, त्यामुळे कुणीही याकडे फारसे वळत नाही. मात्र रायगड सुरक्षा रक्षक मंडळाने दिलेल्या योगदानामुळे या क्षेत्राकडे करिअर म्हणून तरुण पाहू लागले आहेत. त्यातच किमान वेतनाबरोबरच इतर भत्ते आणि सुविधा मिळू लागल्या आहेत. रायगडात एकूण १५00 सुरक्षारक्षक सुरक्षित झाले आहेत. मंडळाने नव्याने भरती प्रस्ताव सरकार दरबारी सादर केल्याने आगामी काळात आणखी एक हजार तरुणांना नव्याने रोजगार उपलब्ध होण्याची शक्यता
आहे.
रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कंपन्या, शासकीय आणि निमशासकीय कार्यालये आहेत. या व्यतिरिक्त जेएनपीटी, ओएनजीसी, लोहपोलाद -मार्केट, सिडको, एफसीआय अशा मोठमोठ्या आस्थापना आहेत. या ठिकाणी पूर्वी खाजगी एजन्सीकडून सुरक्षारक्षक पुरवले जात असे. मात्र संबंधितांकडून मोठ्या प्रमाणात आर्थिक शोषण केले जात असल्याच्या तक्र ारी येऊ लागल्या. त्यामुळे मुंबईप्रमाणे रायगडातही २००२ साली सुरक्षा रक्षक मंडळ स्थापन करण्यात
आले.
या मंडळाचे प्रत्यक्ष काम हे २००६ साली सुरू करण्यात असून सुमारे १९५0 सुरक्षारक्षक नोंदणीकृत आहेत. त्यापैकी १५00 जण महावितरण, एमआयडीसी, टाटा पॉवर, स्टील मार्केट, सागरी सुरक्षा आणि काही प्रमाणात सिडकोत काम करतात. उर्वरित ४00पैकी काही जण निवृत्त तर काहींनी इतर ठिकाणी नोकरी मिळाली म्हणून राजीनामे दिले आहेत. काही आस्थापनात सुरक्षा रक्षक नियुक्तीच्या प्रतीक्षेत असून मंडळ त्यांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे.
सुरक्षारक्षक मंडळात स्थानिक तरुणांना अधिक प्राधान्य दिले जाते. त्यांना योग्य प्रशिक्षण दिले जाते तसेच प्रामाणिकपणा, विश्वास, नियमितपणा, दक्षता या चतु:सूत्रीवर भर असल्याने सुरक्षारक्षकांची मागणी वाढली आहे.
शासकीय त्याचबरोबर खाजगी आस्थापना मंडळाकडे नोंदणीकृत होवू लागले आहेत. दिवसेंदिवस सुरक्षारक्षकांची मागणी वाढत असल्याने नव्याने भरती करण्याचा प्रस्ताव मंडळाने तयार करून तो कामगार विभागाकडे पाठवला आहे. या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्यानंतर लागलीच भरती प्रक्रि या हाती घेण्यात येणार आहे.