प्राथमिक शिक्षकांचे धरणे
By Admin | Updated: April 26, 2017 00:30 IST2017-04-26T00:30:36+5:302017-04-26T00:30:36+5:30
जुनी पेन्शन योजना चालू करावी या मागणीसाठी अखिल कर्जत तालुका प्राथमिक शिक्षकांनी मंगळवारी तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.

प्राथमिक शिक्षकांचे धरणे
कर्जत : जुनी पेन्शन योजना चालू करावी या मागणीसाठी अखिल कर्जत तालुका प्राथमिक शिक्षकांनी मंगळवारी तहसील कार्यालयासमोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.
जुनी पेन्शन योजना १ नोव्हेंबर २०११ पासून बंद झाली आणि अंशकालीन नवीन पेन्शन योजना चालू केली. यामुळे शिक्षकांचे आर्थिक नुकसान होते. निवृत्ती आणि मृत्यूनंतर त्याचा लाभ होत नाही, जुन्या लोकांना फायदे व्हायचे ते होत नाही, सहाव्या वेतन आयोगातील त्रुटी दूर करून सातवा वेतन आयोग समान काम समान वेतन या तत्त्वावर सर्व शासकीय कर्मचाऱ्यांना १ जानेवारी २०१६ पासून लागू करण्यात यावा. प्राथमिक शिक्षक व प्राथमिक शिक्षणविषयक समस्या सोडविण्यासाठी राष्ट्रीय प्राथमिक शिक्षक आयोगाची स्थापना करण्यात यावी या तीन मुख्य मागणीसाठी कर्जत तालुका प्राथमिक शिक्षक संघाने कर्जत तहसील कार्यालयाच्या समोर एक दिवसाचे धरणे आंदोलन केले.
कर्जत तालुक्यात चारशे प्राथमिक शिक्षक आहेत. आज २५ एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता तहसील कार्यालयाच्या बाहेर जिल्हा वरिष्ठ उपाध्यक्ष विजय जगताप, जिल्हा संघटक संतोष दातीर, तालुका अध्यक्ष मनोहर भोसले, कार्याध्यक्ष मुरलीधर गावित, प्रमोद फिकरे, संजय अष्टेकर, अभिजित वाणी, राहुल गायकवाड, शिवाजी जाधव आदी सह शिक्षक एक दिवसाच्या धरणे आंदोलनास बसले. याबाबत संध्याकाळी तहसीलदार यांना निवेदन सादर केले.
या निवेदनाच्या प्रती राज्यपाल व मुख्यमंत्री यांना पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती विजय जाधव यांनी दिली. (वार्ताहर)