तुरुगात जाण्याची तयारी ठेवा
By Admin | Updated: January 7, 2016 00:48 IST2016-01-07T00:48:42+5:302016-01-07T00:48:42+5:30
कर्जत तालुक्यातील वेणगाव, वदप, जांभिवली, गौरकामथ या भागातून हिंदुस्थान पेट्रोलियमची पाइपलाइन जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे

तुरुगात जाण्याची तयारी ठेवा
कर्जत : कर्जत तालुक्यातील वेणगाव, वदप, जांभिवली, गौरकामथ या भागातून हिंदुस्थान पेट्रोलियमची पाइपलाइन जात आहे. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होणार आहे आणि मिळणारा मोबदला अत्यल्प आहे. ही कंपनी जरी भाडेपट्ट्यावर भूसंपादन करणार असले तरी भविष्यात शेतकऱ्यांना या ठिकाणी पिके घेता येणार नाहीत, झाडे लावता येणार नाही किंवा ही जमीन एन ए करता येणार नाही. अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत तर काहींच्या जमिनीचे दोन भाग होणार आहेत.कंपनीने आपली पाइप लाइनची लांबी थोडी वाढविली आणि फॉरेस्टच्या जागेतून नेली तर आमचा त्याला विरोध असणार नाही, परंतु शेतकरी उध्वस्त होणार असेल तर तुम्ही आम्ही सर्वांनी राजकारण बाजूला ठेवून लाठ्या काठ्या खायला, प्रसंगी तुरु ंगात जायला तयार राहा असे आवाहन केले.
हिंदुस्थान पेट्रोलियमच्या पाइप लाइनला शेतकऱ्यांचा विरोध करण्याकरिता आमदार सुरेश लाड यांनी मार्गदर्शन करावे याकरिता बाधित शेतकऱ्यांनी गौरकामथ येथे बैठक आयोजित केली होती. आंदोलनात मी किंवा इतर कोणीही राजकीय श्रेय किंवा लाभ न घेता एकत्रपणे आंदोलन करू या अशी सूचना आमदार लाड यांनी केली.
या बैठकीच्या वेळी व्यासपीठावर रायगड जिल्हा किसान सभेचे अध्यक्ष तानाजी चव्हाण, ज्येष्ठ नेते वि. रा. देशमुख, बळीराम देशमुख हे होते. या सभेला पप्पू पाटील, विनय वेखंडे, प्रशांत जोशी, प्रकाश ठकेकर, विलास देशमुख, मनोहर देशमुख, समीर देशमुख आदींसह शेतकरी उपस्थित होते. (वार्ताहर )