३५९ मशालींनी उजळला प्रतापगड

By ऑनलाइन लोकमत | Published: October 4, 2019 02:59 AM2019-10-04T02:59:19+5:302019-10-04T02:59:37+5:30

इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या प्रतापगड किल्ल्यावर मंगळवारी रात्री ३५९ मशालींनी उजळून निघाला.

pratapgadh News | ३५९ मशालींनी उजळला प्रतापगड

३५९ मशालींनी उजळला प्रतापगड

Next

पोलादपूर : इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या प्रतापगड किल्ल्यावर मंगळवारी रात्री ३५९ मशालींनी उजळून निघाला. गडावरील भवानी मातेच्या प्रतिष्ठापनेला नवरात्रोत्सावातील चतुर्थी दिवशी ३५९ वर्षे पूर्ण झाली. यानिमित्त मशाल महोत्सवाचे आयोजन हस्तकला केंद्राचे प्रमुख चंद्रकांत उतेकर यांनी केले होते. गेल्या नऊ वर्षांपासून ही परंपरा सुरू असून यंदा या उत्सवाचे दहावे वर्ष आहे. राज्यभरातील हजारो शिवभक्तांनी या महोत्सवाचा आनंद लुटला.
छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना करण्यासाठी केलेले कित्येक पराक्रम या किल्ल्याशी जोडलेले आहेत. महाराजांनी नेपाळच्या गंडकी नदीमध्ये सापडणाºया शालिग्राम दगडापासून भवानीमातेची मूर्ती बनवून गडावर तिची स्थापना केली. या घटनेला ३५० वर्षे पूर्ण झाल्यानंतर गडावर ३५० मशाली पेटविल्या, तेव्हापासून नवरात्रोत्सवात चतुर्थी दिवशी मशाली पेटविण्याची परंपरा सुरू झाली.
यंदा भवानीमातेच्या प्रतिष्ठापनेला ३५९ वर्षे पूर्ण झाल्याने किल्ल्यावर भवानीमातेची विधिवत पूजा व गोंधळाचा कार्यक्रम झाल्यावर रात्री ८ वाजता भवानीमातेच्या मंदिरात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून मशाल महोत्सव सुरू करण्यात आला. या वेळी महाड नगराध्यक्षा स्नेहल जगताप, राजिप सदस्य चंद्रकांत कळंबे, संजय कचरे आदी उपस्थित होते. मंदिर परिसरापासून शिवप्रताप बुरुजापर्यंत ३५९ मशाली पेटविण्यात आल्या. दीपोत्सवाने संपूर्ण किल्ला उजळून निघाला होता. ढोल-ताशांच्या गजरात हा कार्यक्रम पार पडला.
 

Web Title: pratapgadh News

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Raigadरायगड