कर्जतमध्ये जुगार क्लबवर पोलिसांचा छापा
By Admin | Updated: February 13, 2017 03:38 IST2017-02-13T03:38:08+5:302017-02-13T03:38:08+5:30
शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बेकायदा जुगाराचा क्लब सुरू असल्याची माहिती रायगड पोलिसांना मिळाली. त्यानुसार, कर्जत पोलिसांनी

कर्जतमध्ये जुगार क्लबवर पोलिसांचा छापा
कर्जत : शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी बेकायदा जुगाराचा क्लब सुरू असल्याची माहिती रायगड पोलिसांना मिळाली. त्यानुसार, कर्जत पोलिसांनी शनिवारी, ११ फेब्रुवारी रोजी छापा टाकून कारवाई केली. या कारवाईत १ लाख ७५ हजार २०० रु पये रोख रक्कम व इतर ऐवज जप्त करण्यात आला असून, १२ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. कर्जत शहराच्या भरवस्तीत अभिनव ज्ञानमंदिर शाळा आणि न्यायालयाच्या समोर एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावर बेकायदा जुगाराचा क्लब सुरू असल्याची माहिती कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अजमुद्दीन मुल्ला यांना मिळाली. त्यांनी आपल्या कर्मचारी वर्गाला बरोबर घेऊन संध्याकाळी ५ वाजता जुगाराच्या क्लबवर छापा टाकला. या छाप्यामध्ये १२ जणांना ताब्यात घेतले (वार्ताहर)