पोलादपूरमध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ
By Admin | Updated: May 25, 2017 00:17 IST2017-05-25T00:17:06+5:302017-05-25T00:17:06+5:30
तालुक्यातील देवळे ग्रामपंचायत हद्दीतील करंजे पायटेवाडी, बौद्धवाडी येथील १९हून अधिक घरांचे मंगळवारी

पोलादपूरमध्ये अवकाळी पावसाचा धुमाकूळ
लोकमत न्यूज नेटवर्क
पोलादपूर : तालुक्यातील देवळे ग्रामपंचायत हद्दीतील करंजे पायटेवाडी, बौद्धवाडी येथील १९हून अधिक घरांचे मंगळवारी रात्री झालेल्या वादळी पावसामुळे मोठे नुकसान झाले. विद्युत खांब उखडल्याने मंगळवारपासून येथील विद्युतपुरवठा खंडित झाला आहे, तसेच पितळवाडी विभागातील बोरावले, चिखली येथील विद्युतपुरवठा खंडित झाला होता.
करंजे येथील सुभानजी घाडगे, श्रीपत घाडगे, गणपत घाडगे, श्रावण जाधव, सखाराम साळवी, गौतम जाधव, विठोबा घाडगे, पंढरी शेलार यांच्यासह १९ ग्रामस्थांच्या घरांचे नुकसान झाले. घरावरील पत्रे, कौले उडून गेल्याने घरातील धान्य पावसाने भिजले आहे, यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
घटनास्थळी देवळे ग्रामपंचायतीच्या सरपंच वंदना केसरकर, माजी सरपंच प्रकाश कदम, ग्रामसेवक जाधव, तलाठी म्हात्रे, ग्रामपंचायत सदस्य महामुनी आदींनी भेट दिली.