शहरं
Join us  
Trending Stories
1
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
2
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
3
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
4
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
5
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
6
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन
7
क्रिस वोक्स स्ट्राइकवर आला असता तर...? इंग्लंडच्या लढवय्याबद्दल काय म्हणाला मॅच विनर सिराज?
8
'तिचे ओठ असे हलतात जणू मशीनगनच'; डोनाल्ड ट्रम्प कॅरोलिन लेविट यांच्याबद्दल काय बोलून गेले?
9
प्रत्यक्षात घडली Jolly LLB 2 सारखी घटना, ३० वर्षे साधूच्या वेशात लपून होता बांगलादेशमधील गुन्हेगार, अखेर…
10
१ तास सीबीआयला चकवा दिला, पैशांनी भरलेली बॅग कचराकुंडीत फेकली; नवी मुंबईत फिल्मी स्टाईल 'थरार'
11
IND vs ENG: भारताच्या विजयानंतर आशा भोसलेंची नात जनाईची मोहम्मद सिराजसाठी खास पोस्ट, म्हणाली...
12
Container Fire In Thane: पातलीपाडा उड्डाणपुलावर कंटेनरला आग, थरारक घटनेचा व्हिडीओ समोर!
13
Video - बिल भरायला नको म्हणून व्हेज बिर्याणीत टाकलं हाड, घातला गोंधळ; CCTV मुळे पोलखोल
14
"केंद्रातील मोदी सरकार व्हेंटिलेटवर…’’, सबळ कारणं देत इंडिया आघाडीच्या नेत्याचा मोठा दावा
15
IND vs ENG : सिराज-प्रसिद्ध कृष्णाचा जलवा! टीम इंडियानं रचला इतिहास; पहिल्यांदाच असं घडलं
16
मंत्रिपद जाऊनही धनंजय मुंडेंनी सरकारी बंगला का सोडला नाही? भरावा लागणार दंड
17
MSRTC Recruitment: एसटी महामंडळात नोकरीची संधी, जाणून घ्या पात्रता आणि अर्ज करण्याची पद्धत!
18
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
19
'बिग बॉस १९'साठी 'तारक मेहता'लाच ऑफर? मेकर्सने केली विचारणा; अभिनेत्याच्या होकाराची प्रतीक्षा
20
Mangalagauri 2025: पूजा होईपर्यंत बोलायचे नाही, असा मंगळागौरीच्या पूजेचा नियम का?

कोरेगाव भीमाबाबत पंतप्रधान काहीच बोलले नाहीत - अजित पवार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 9, 2018 01:43 IST

भारतात कोरेगाव भीमा येथे एवढी मोठी घटना घडली. भारत देशाने नोंद घेतली. संपूर्ण मीडियाने दखल घेतली, पण पंतप्रधानांनी कोरेगाव भीमाबाबत एकही स्टेटमेंट दिले नाही, असे उद्गार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधिमंडळातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी काढले.

माणगाव : भारतात कोरेगाव भीमा येथे एवढी मोठी घटना घडली. भारत देशाने नोंद घेतली. संपूर्ण मीडियाने दखल घेतली, पण पंतप्रधानांनी कोरेगाव भीमाबाबत एकही स्टेटमेंट दिले नाही, असे उद्गार राज्याचे माजी उपमुख्यमंत्री तथा विधिमंडळातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अजित पवार यांनी काढले.माणगाव येथील विविध विकासकामांचे भूमिपूजन अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी झाले. या वेळी आयोजित जाहीर सभेत ते बोेलत होते. सर्व जनतेला कोरेगाव-भीमा येथे नक्की काय झाले याबाबत माहिती जाणून घ्यावयाची असताना पंतप्रधान काहीच बोलत नाहीत. फक्त चाय पे बात बोलत आहेत. आदिवासी बांधव, मागासवर्गीय जनतेचे हाल झाले आहेत. भाजपा-शिवसेना युती ही फेकू व खोटारडे सरकार आहे. या सरकारच्या काळात जनतेचा प्रचंड भ्रमनिरास झाला. नोटाबंदी झाल्यामुळे विकासदर घटला आहे, अशी जोरदार टीका अजित पवार यांनी केली. दिलेला शब्द पाळायचा असतो हे आम्हाला राजकीय जीवनात शरद पवारांनी शिकवले. शिवसेना-भाजपा सरकारने कोकणावर अन्याय केला आहे. शेतक ºयांच्या आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. विजेच्या संदर्भातील प्रश्न बिकट झाले आहेत. उद्धव ठाकरे भाजपावर टीका करतात, पण सत्तेतून बाहेर पडण्याची हिंमत करत नाहीत. मेक इन इंडियाच्या नावाखाली अनेक प्रकल्प पंतप्रधानांनी गुजरातला पळविले आहेत. या काळात समाजाचा कोणताही घटक समाधानी नाही. शेतकरी समाधानी नाहीत. त्यांच्या मालाला योग्य किंमत मिळत नाही. ऊस उत्पादक, कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आहेत. हे सरकार सत्तेवर आल्यावर त्यांनी १०० दिवसांत महागाई कमी होणार असे सांगितले होते. सत्ता येऊन १००० दिवस झाले अजून महागाई कमी झालेली नाही. गॅस सिलिंडरचे भाव वाढल्याने महिला वर्ग नाराज आहे. आमच्या काळातील कित्येक योजना आहेत त्या योजनांची फक्त नावे या सरकारने बदलली आहेत. शेतकºयांचे पेकाट या सरकारने मोडले आहे. या मुख्यमंत्र्यांना शाश्वत शेती काय समजणार? कोरेगाव भीमा घटना का घडली, सरकारचा कुठेच धाक राहिला नाही. समाजाला उच्च न्यायालयाने सांगितले असतानाही अजून शिक्षणात आरक्षण दिलेले नाही, असे सांगत येणाºया काळात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठीमागे ताकद उभी करा, असे आवाहन अजित पवार यांनी केले.माणगाव नगर पंचायत हद्दीतील नाना-नानी पार्क, दत्तनगर रस्ता, उतेखोलवाडी रस्ता, कचेरी रोड रस्ता, नाट्यगृह अशा सहा कोटी रु पयांच्या विकासकामांचा शुभारंभ सोमवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आ. अजित पवार यांच्या हस्ते, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ. सुनील तटकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. या वेळी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अदिती तटकरे, युवा नेते अनिकेत तटकरे, आ. अनिल तटकरे, माणगाव नगराध्यक्ष आनंदशेठ यादव, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रमोद घोसाळकर, गोरेगाव सरपंच झुबेर अब्बासी, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष प्रभाकर उभारे आदींसह माणगाव नगर पंचायतीचे सर्व नगरसेवक व राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.माणगावमध्ये वातानुकूलित नाट्यगृह होणारमाणगाव नगर पंचायत निवडणुकीदरम्यान आ. तटकरे यांनी माणगावकरांना अभिवचने दिली होती त्याची पूर्तता होताना आनंद वाटतो आहे. केंद्रात व राज्यात भाजपा व शिवसेना सत्तेवर आहे. या सरकारने जनतेला दिलेली आश्वासने पाळलेली दिसत नाहीत. गुजरातने त्यांना नाकारले. समविचारी पक्षांनी एकत्रित निवडणुका लढवल्या असत्या तर गुजरातचे चित्र आज वेगळे असते. राष्ट्रवादी काँग्रेसने नेहमीच जनतेचा विचार केला आहे. शहराचा विकास म्हणजे केवळ रस्ता, वीज, पाणी हे नाही.शहराचा सांस्कृतिक, साहित्यिक दर्जा उंचावला पाहिजे, त्यातून चांगले कवी, संपादक, लेखक यांचे विचार सर्वांना ऐकायला मिळावेत हा उद्देश नजरेसमोर ठेवून आ. तटकरे यांनी सातत्याने पाठपुरावा केला. त्यामुळे माणगावात साडेतीन कोटींचे नाट्यगृह होईल. ते प्रशस्त, वातानुकूलित असेल. त्यामध्ये चांगला हॉल, त्यामध्ये ५०० आसन खुर्च्या, पार्किंगची व्यवस्था असे हे नाट्यगृह होणार आहे, असे अजित पवार म्हणाले.

टॅग्स :Ajit Pawarअजित पवार