शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
4
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
5
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
6
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
7
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
8
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
9
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
10
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
11
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
12
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
13
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
14
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
15
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
16
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
17
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
18
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
19
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
20
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू

ताडवाडी-मोरेवाडीसाठी नळपाणी योजना अद्याप कागदावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 00:59 IST

रायगड जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश हवेत विरले : उद्भव कुठे असावा, यासाठी रखडले काम

कांता हाबळे

नेरळ : कर्जत तालुक्यातील पाथरज ग्रामपंचायतीमधील ताडवाडी आणि मोरेवाडीमध्ये नेहमीप्रमाणे पाणीटंचाई सुरू झाली आहे. त्या दोन्ही वाड्यांसाठी पावसाळ्यापूर्वी नळपाणी योजना कार्यान्वित करावी, असे आदेश रायगड जिल्हाधिकाऱ्यांनी आॅक्टोबर २०१७ मध्ये दिले होते. त्यानंतर या ठिकाणी गतवर्षी जिल्हा परिषदेने नळपाणी योजना मंजूर केली होती. मात्र, ही नळपाणी योजना आजही कागदावरच आहे. डिसेंबर २०१७ मध्ये या नळपाणी योजनेची घोषणा रायगड जिल्हा परिषदेच्या लघु-पाटबंधारे विभागाने केली होती. दरम्यान, नळपाणी योजनेचा उद्भव कुठे असावा, यासाठी या दोन्ही टंचाईग्रस्त गावांची नळपाणी योजना रखडली असून येथील आदिवासी महिलांना पाण्यासाठी डोक्यावर हांडे घेऊन जावे लागत आहे.

पाथरज ग्रामपंचायतमधील सात पाड्यांची बनलेली ताडवाडी ही कर्जत तालुक्यातील मोठी आदिवासीवाडी समजली जाते. तर त्या शेजारी असलेली मोरेवाडी हीदेखील ताडवाडीच्या विहिरीवर अवलंबून असलेली आदिवासीवाडी आहे. त्या दोन्ही आदिवासीवाड्यांमधील महिलांना जानेवारी महिन्यापासूनरात्र विहिरीवर काढावी लागते. गतवर्षी त्याबाबत माध्यमांनी दखल घेतल्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी जिल्हा परिषदेला सूचित केल्यानंतर जिल्हा परिषद लघु-पाटबंधारे विभागाने २७ लाख रुपयांची तरतूद दुरुस्तीसाठी केली होती. मात्र, स्थानिक आदिवासी लोकांनी आम्हाला दुरुस्ती नको तर नवीन पाणी योजना पाहिजे आणि त्या योजनेचा उद्भव हा बांगरवाडी मातीच्या बंधाºयाचा असावा, अशी मागणी केली होती.

त्यानंतर रायगड जिल्हा परिषदेच्या लघु-पाटबंधारे विभागाने त्या ठिकाणी नळपाणी योजनेसाठी मंजूर करण्यात आलेल्या २७ लाखांचा निधी थांबवून ठेवला. जानेवारी २०१८ मध्ये अंदाजपत्रक तयार करताना नवीन नळपाणी योजना ही बनगरवाडी येथे असलेल्या मातीच्या बंधाºयातील उद्भव निश्चित करण्यात आला. त्यासाठी नव्याने तयार झालेले अंदाजपत्रक हे एप्रिल २०१८ मंजूर झाले नाही. त्या वेळी नव्याने केलेले अंदाजपत्रक हे ६७ लाखांचे बनले होते. मात्र, बांगरवाडी येथील मातीचा बंधारा हा जुना असून तेथील पाण्याचा काही भरवसा नसल्याने आमसभेत त्यावर पुन्हा चर्चा झाली. मोरेवाडी तसेच ताडवाडीसाठी नळपाणी योजना करताना ती डोंगरपाडा येथील पाझर तलावाच्या पाण्यावर करण्याची सूचना आमदार सुरेश लाड यांनी केली. त्यामुळे आता ९३ लाख रुपयांचे नवीन अंदाजपत्रक तयार झाले असून ताडवाडी आणि मोरेवाडीसाठी डोंगरपाडा पाझर तलावाच्या पाण्यावर नळपाणी योजना करण्याचे निश्चित झाले आहे.पाण्यासाठी भटकं तीताडवाडी आणि मोरेवाडी या दोन्ही वाडीतील लोकांसाठी तेथे असलेल्या दोन्ही विहिरी कोरड्या पडण्याच्या मार्गावर आहेत. त्या वेळी शेजारी असलेल्या मोरेवाडी येथील महिलांची बांगरवाडी मातीच्या धरणावर पाण्यासाठी जाण्याची भटकंती सुरू झाली आहे. त्यामुळे गतवर्षी मंजूर झालेली नळपाणी योजना आता प्रत्यक्षात आली असती तर दोन्ही आदिवासीवाड्यांतील लोकांना पाण्यासाठी विहिरीवर रात्र काढण्याची वेळ आली नसती. त्यात पाथरज ग्रामपंचायत गेल्या तीन महिन्यांपासून त्या ठिकाणी असलेल्या विहिरीमध्ये टँकरचे पाणी टाकत असल्याने सध्या तरी ताडवाडी आणि मोरेवाडीला पाणी मिळत आहे.बांगरवाडी येथील मातीचा बंधारा शासनाचा नाही, त्यात त्या बंधाºयांची दुरुस्ती झाली नाही. त्यामुळे पहिल्यापासून मागणी असलेल्या डोंगरपाडा पाझर तलावाच्या पाण्यावर नळपाणी योजना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लोकसभा निवडणूक आल्याने योजनेला अंतिम मंजुरी मिळाली नव्हती, आता त्यांना गती मिळाली असून, योजना महिनाभरात सुरू होईल.- रेखा दिसले, सदस्य, रायगड जिल्हा परिषदताडवाडी आणि मोरेवाडी येथील नळपाणी योजनेची दुरुस्ती करण्यासाठी निधी मंजूर आहे. मात्र, स्थानिक लोकांनी उद्भव बदलण्याची सूचना केल्याने सर्व अंदाजपत्रक नव्याने करायची गरज निर्माण झाली आहे. त्यामुळे अद्याप कामाला सुरुवात झाली नाही.- डी. आर. कांबळे,उपअभियंता, लघु-पाटबंधारे विभाग

टॅग्स :Raigadरायगड