चांभार्ली येथील क्रिकेट मैदानावर खेळाडूचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2019 02:23 AM2019-11-26T02:23:11+5:302019-11-26T02:24:21+5:30
सावले येथील सावळेश्वर क्रिकेट संघातील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ओळख असणारा अमर साळुंके चांभार्ली येथे क्रिकेट सामना खेळताना मैदानावरच चक्कर आल्यावर जमिनीवर कोसळला.
मोहोपाडा - सावले येथील सावळेश्वर क्रिकेट संघातील उत्कृष्ट गोलंदाज म्हणून ओळख असणारा अमर साळुंके चांभार्ली येथे क्रिकेट सामना खेळताना मैदानावरच चक्कर आल्यावर जमिनीवर कोसळला. मित्रांनी त्याला तातडीने रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे खालापूरसह पनवेल, सुधागड तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
अमर बाळाराम साळुंके (२२, रा. सावळा) हा एक सिव्हिल इंजिनीअर पदवीधर असून क्रिकेटवेडा अवलिया होता. लहानपणापासून अभ्यासाबरोबरच क्रिकेट खेळण्याची आवड असल्याने तो सावळेश्वर संघातील उत्कृष्ट गोलंदाज होता. २३ नोव्हेंबर पासून चांभार्ली येथील एचएल कंपनीच्या मैदानावर तीन दिवसी क्रिकेटचे सामने सुरू होते. रविवारी २४ नोव्हेंबर रोजी अमरने दोन ते तीन सामन्यात गोलंदाजी करीत एका सामन्यात विरोधी संघातील तीन गडी बाद करून हँट्रीक मिळविली ; त्यानंतरच्या सामन्यात अमरला मैदानावरच चक्कर आल्याने चांभार्ली येथील खाजगी रु ग्णालयात उपचारासाठी काही मिनिटाच हालविण्यात आले; मात्र अमरची प्राणज्योत मैदानावरच मावळी असल्याचे डॉक्टरांनी सहकारी मित्रांनी सांगताच एकच हांबरडा फोडला. त्यानंतर ही बातमी वाऱ्यासारखी पसरताच नातेवाईकांंसह मित्र मंडळींनी घटनास्थळी धाव घेतली; त्यानंतर आमर शव शवविच्छेदन चौक प्राथमिक रूग्णालयात करण्यात
आले.
अमरचे वडील हे मुळचे सुधागड तालुक्यातील वासुंडे येथील रहिवासी असून ते सावळा (पनवेल) येथील कारखान्यात काम करतात. अमर यांच्या पश्चात आई-वडील एक छोटा भाऊ असा परिवार आहे.