शहरं
Join us  
Trending Stories
1
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींच्या आरोपावर निवडणूक आयोगाचे उत्तर
2
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
3
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
4
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
5
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
6
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
7
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
8
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!
9
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
10
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
11
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
12
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
13
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
14
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
15
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
16
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
17
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
18
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
19
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
20
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...

अखत्यारीत नसलेल्या रस्त्याखाली केबल टाकण्यास नगरपंचायतीने दिली परवानगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2020 00:53 IST

१८ लाखांचे आकारले शुल्क; म्हसाळा शहरातील लोणेरे-श्रीवर्धन मार्गावर काम

म्हसळा : नगरपंचायत हद्दीत येणाऱ्या मात्र सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असणाऱ्या म्हसळा शहरातील लोणेरे-श्रीवर्धन मार्गावर वोडाफोन आयडिया या खासगी कंपनीची ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी चक्क नगरपंचायतीने १८ लाख २४०० रुपये घेऊन परवानगी दिल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.गुरुवारी रात्री बाजारातील मुख्य रस्त्यावर खोदकाम सुरू असताना शहरातील नागरिकांनी या खोदकामाबद्दल माहिती घेतली असता हे काम वोडाफोन आयडिया या कंपनीची ऑप्टिकल फायबर केबल टाकण्यासाठी सुरू आहे असे कंत्राटदाराने सांगितले. मात्र केबल टाकण्याचे काम रस्त्याचा बाजूने न करता रस्ता खोदून सुरू असल्याने तेथे उपस्थित नागरिकांनी त्या कामाला विरोध करून काम थांबवले. मात्र, कंत्राटदाराने शुक्रवारी मध्यरात्री पोलीस बंदोबस्तात पुन्हा काम सुरू केल्याने शहरात काही काळ तणावाचे वातावरण होते. मात्र, याच वेळी बांधकाम विभागातील कार्यकारी अभियंता श्रीकांत गणगणे यांनी स्वतः येऊन हे काम बेकायदा असल्याचे सांगत थांबवले. कंत्राटदाराने मी १८ लाख रुपये नगरपंचायतीला भरले असल्याचे सांगितले. यावेळी कार्यकारी अभियंता गणगणे यांनी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत आहे, नगरपंचायतीला परवानगी देण्याचा अधिकार नसल्याचे सांगत काम थांबवले. नाही तर गुन्हा दाखल होईल असे कंत्राटदाराला सांगून केबलसाठी होणारे खोदकाम थांबवले.कामाला संरक्षण शहरातील रस्ता खोदून फायबर केबल टाकण्याच्या बेकायदा कामाला संरक्षण देण्यासाठी म्हसळा पोलिसांचा फौजफाटा उभा होता. शहरातील नागरिकांचे म्हणणे सोडून पोलीस कंत्राटदाराचे ऐकत होते. यामुळे शहरातून पोलिसांविरोधात नाराजीचा सुर उमटू लागला आहे.