शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करा, तहसीलदारांचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2021 00:13 IST

Raigad News : महाड तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या श्रीमंत समजल्या जाणाऱ्या बिरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील हबिबा कॉम्प्लेक्स या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचा आदेश महाडचे तहसीलदार सुरेश काशीद यांनी दिला आहे.

बिरवाडी - महाड तालुक्यातील आर्थिकदृष्ट्या श्रीमंत समजल्या जाणाऱ्या बिरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील हबिबा कॉम्प्लेक्स या इमारतीचे स्ट्रक्चर ऑडिट करण्याचा आदेश महाडचे तहसीलदार सुरेश काशीद यांनी दिला आहे. स्ट्रक्चर ऑडिटच्या अहवालानंतर पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. माणगाव तालुक्यातील लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र महाविद्यालयातील सिव्हिल विभागांतील अभियंत्यांमार्फत बिरवाडीमधील हबिबा कॉम्प्लेक्स इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत .ग्रामविकास अधिकारी नागनाथ घाडगे यांच्याशी संपर्क साधला असता बिरवाडीमधील इब्राहिम माटवणकर यांनी आपल्या मालकीच्या जागेत निवासी व वाणिज्य वापरातील इमारत उभारली आहे. त्या इमारतीतमधील सर्वाधिक गाळे व निवासी खोल्यांची मालकी इब्राहिम माटवणकर यांच्याकडेच आहे, तर काही गाळे व निवासी खोल्या विकत घेतलेल्या कुटुंबीयांना ग्रामपंचायतीने नोटीस देऊन स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे सूचित केले आहे, अशी माहिती घाडगे यांनी दिली आहे.महाडमधील तारीक गार्डन इमारत दुर्घटनेनंतर तालुक्यातील ग्रामपंचायतींना त्यांच्या हद्दीतील इमारतींचे स्ट्रक्चर ऑडिट करून घेण्याच्या सूचना प्रशासनाच्या वतीने देण्यात आल्या होत्या. त्याची अंमलबजावणी ग्रामपंचायतीकडून झाली नसल्याचे हबिबा कॉम्प्लेक्स प्रकरणावरून दिसून येत आहे. रहिवाशांकडून कोणतीही तक्रार नाहीबिरवाडीमधील हबिबा कॉम्प्लेक्स ही इमारत धोकादायक आहे किंवा नाही? याचा फैसला हा स्ट्रक्चर ऑडिटच्या अहवालानंतर होणार असला तरी सोशल मीडियावरील वृत्ताच्या आधारे हबिबा कॉम्प्लेक्स इमारत चर्चेत आली, त्या वृत्तातील सत्यता पडताळणी करण्यासाठीच स्ट्रक्चर ऑडिट करण्याचा निर्णय तहसीलदार सुरेश काशीद यांनी घेतल्याचे बोलले जात आहे. विशेष म्हणजे या इमारतीमधील रहिवाशांनी इमारत धोकादायक असल्याची कोणतीही तक्रार .ग्रामपंचायत अथवा कोणत्याही शासकीय कार्यालयांकडे केलेली नाही. असे असताना केवळ सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या वृत्ताच्या आधारे तहसीलदार सुरेश काशीद यांनी घेतलेल्या निर्णयाचे कौतुक होत आहे. बिरवाडीमध्ये नियमांची पायमल्ली करून चार मजली इमारतीचे बांधकाम सुरू आहे. या बांधकामाला स्थगिती देऊनसुद्धा काम सुरू आहे. मात्र, याठिकाणी राजकीय वरदहस्त असल्याने कारवाई करण्यास विलंब होत असल्याची बाब समोर येत आहे.

टॅग्स :Farmerशेतकरी