शहरं
Join us  
Trending Stories
1
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
2
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
3
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
4
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
5
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला
6
Health Tips: पाणी पिण्याची योग्य वेळ कोणती? जेवण करण्यापूर्वी, जेवण करताना की जेवणानंतर? 
7
"ऑपरेशन सिंदूरचा पार्ट २, पार्ट ३ अजून बाकी"; राजनाथ सिंहांचा पाकिस्तानला 'मेसेज', मोरक्कोमध्ये काय बोलले?
8
खेळण्यातली बंदूक वापरली अन् ३ बँकांवर डल्ला मारला! पोलिसांनी दरोडेखोराला पकडताच समोर आलं धक्कादायक सत्य
9
सणासुदीच्या काळात कार खरेदी करणे झाले स्वस्त! जीएसटीमध्ये मोठी कपात, कर्जही झाले स्वस्त
10
पाकिस्ताननं कर्जाच्या आकडेवारीत असं काय लपवलं की, अमेरिकेनं दिला अल्टिमेटम; भारताशी तर कनेक्शन नाही ना?
11
दणदणीत विजयानंतर गंभीरने पाकिस्तानला डिवचले, खेळाडूंना अशी सूचना देत जखमेवर मीठ चोळले
12
ब्रेकअपचं खोटं अन् हत्येनंतरचा बनाव...कानपूर सुटकेस 'कांड' प्रकरणात ट्विस्ट, २ आरोपींना अटक
13
Accident: पाण्याचा टँकर आणि दुचाकीत भीषण धडक; तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू
14
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
15
VIRAL: रिक्षात बसलेल्या विदेशी तरुणाला रिक्षाचालकाने फ्रेंचमध्ये विचारला प्रश्न; त्यानंतर जे झालं ते...
16
'या' ग्राहकांना हेल्थ इन्शुरन्सवर GST माफीचा फायदा नाही; आरोग्य विम्या कंपन्यांनी केलं स्पष्ट
17
रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमात मराठी मालिकाविश्वातील 'या' अभिनेत्याची लागली वर्णी, स्वतः दिली माहिती
18
"पैसे कमावतो, टॅक्स भरतो; चोरी करत नाही...", तगड्या कमाईवरुन अक्षय कुमारचं स्पष्टीकरण
19
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
20
फक्त गरबाच खेळा...हुल्लडबाजी नको; दांडियामध्ये साध्या वेशात महिला पोलीस सहभागी होणार

पेण एसटी कर्मचारी वसाहतीचे झाले खंडर

By admin | Updated: February 5, 2017 02:55 IST

पेण रामवाडी येथील एस. टी. कर्मचारी वसाहतीचे सध्या खंडर झाले आहे. येथील इमारती धोकादायक बनल्या असून, दोन अतिधोकादायक इमारती खाली करण्यात आल्या आहेत.

- वैभव गायकर,  पनवेलपेण रामवाडी येथील एस. टी. कर्मचारी वसाहतीचे सध्या खंडर झाले आहे. येथील इमारती धोकादायक बनल्या असून, दोन अतिधोकादायक इमारती खाली करण्यात आल्या आहेत. सर्वत्र कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. वसाहतीला पाणी पुरविणाऱ्या विहिरीजवळून गटार जात असल्याने, पिण्याचे पाणी दूषित होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. रायगड जिल्ह्यातील राज्य परिवहन महामंडळाच्या ८ डेपोचे व्यवस्थापन करण्यासाठी रामवाडी येथे विभागीय आगार उभारले आहे. १९७२ मध्ये कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी वसाहत बांधण्यात आली आहे. यामध्ये १३ चाळी व तीनमजली पाच इमारतींचा समावेश आहे. ४५ वर्षांमध्ये वसाहतीच्या देखभालीकडे फारसे लक्ष देण्यात आले नाही. इमारतीची रंगरंगोटी व दुरुस्तीची कामे करण्यात आली नाहीत. यामुळे इमारती धोकादायक बनल्या आहेत. प्लास्टर पडू लागले आहे. छतामधील लोखंड बाहेर आले आहे. ज्या तीन इमारतींमध्ये कर्मचारी वास्तव्य करत आहेत, त्यांची स्थितीही चांगली नाही. वसाहतीमध्ये १३ चाळी आहेत. चाळींचीही योग्य देखभाल केली जात नाही. वसाहतीमधील काही गटारे उघडी असून, यात पडून नागरिक जखमी होण्याची शक्यता आहे. वस्तीमध्ये कचराकुंडी नाही. टाकलेला कचरा उचलला जात नसल्याने रस्त्याच्या दुतर्फा कचऱ्याचे ढीग साचले आहेत. वस्तीमधील सांडपाणी व्यवस्थित बाहेर जात नाही. १० एकर पेक्षा मोठ्या भूखंडावर वसाहत वसली आहे. चाळींच्या आजूबाजूला वाढलेले गवतही काढण्यात आलेले नाही. एस. टी. कर्मचारी वसाहतीला येथील विहिरीमधून पाणीपुरवठा केला जात आहे. विहिरीपासून काही अंतरावरून गटार वाहत असल्याने, दूषित पाणी विहिरीत जाण्याची शक्यता आहे. रहिवाशांनी वारंवार सांगूनही गटाराचा प्रवाह बदलला जात नाही. महामंडळाची करोडो रुपयांची मालमत्ता धूळ खात पडली आहे. येथील वसाहतीची पुनर्बांधणी व सुशोभीकरण करण्याकडे प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. अशीच स्थिती राहिली, तर सर्व इमारती खाली करून कर्मचाऱ्यांना इतर ठिकाणी हलविण्याची वेळ येईल, असे मत अनेकांनी व्यक्त केले आहे.पुनर्बांधणीकडे दुर्लक्ष रामवाडी कर्मचारी वसाहतीमधील दोन इमारती खाली केल्या आहेत. उर्वरित तीन इमारतींची स्थितीही बिकट झाली आहे. चाळीही मोडकळीस आल्या आहेत. पूर्ण वसाहतीची पुनर्बांधणी करण्याची आवश्यकता आहे, परंतु प्रशासनाकडून अद्याप पुनर्बांधणीसाठी फारशा हालचाली झालेल्या नाहीत. यामुळे भविष्यात टप्याटप्प्याने सर्व इमारती खाली केल्या जाण्याची शक्यता आहे.स्वच्छ भारत अभियानाचा विसर रामवाडी बस आगार व कर्मचारी वसाहतीमध्ये कचऱ्याचे साम्राज्य झाले आहे.रोडच्या बाजूला कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. सांडपाणी वाहून नेणारी पाइपलाइन खराब झाल्याने, आगाराच्या मागील बाजूला पाणी बाहेर आले असून, दुर्गंधी पसरली आहे.प्रशासकीय इमारतीच्या मागील बाजूलाही कचऱ्याचे ढीग तयार झाले आहेत. १० एकरपेक्षा मोठ्या भूखंडावर वसाहत वसली असली, तरी देखभाल दुरुस्तीअभावी तिची दुर्दशा झाली आहे.