पेण बाजार समितीवर शेकाप

By Admin | Updated: July 27, 2015 02:59 IST2015-07-27T02:59:37+5:302015-07-27T02:59:37+5:30

पेण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे १८ पैकी १८ उमेदवार विजयी झाले असून शिवसेना-काँग्रेस युती,

Peking on PEN Bazar Samiti | पेण बाजार समितीवर शेकाप

पेण बाजार समितीवर शेकाप

पेण : पेण कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीत शेतकरी कामगार पक्षाचे १८ पैकी १८ उमेदवार विजयी झाले असून शिवसेना-काँग्रेस युती, भारतीय जनता पक्ष या विरोधी पक्ष उमेदवारांचा धुव्वा उडाला. तब्बल १५० मतांच्या फरकाने प्रत्येक उमेदवार विजयी झाला. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शेकापची संघटनात्मक पाळेमुळे खोलवर रूजलेली असल्याने खरेदी-विक्री संघापाठोपाठ पेण कृषी उत्पन्न बाजार समितीवर शेकापने सातव्यांदा तब्बल ३५ वर्षे आपली सत्ता अबाधित राखली आहे.
ग्रामपंचायत गटात शेतकरी कामगार पक्षाचे सुरेश पाटील २७४ मते, संदेश ठाकूर २७१ मते, स्मिता पेणकर ३४७ मते, व लहू आवटे ३५९ मते मिळवून विजयी झालेत. या गटात पराभूत उमेदवारांमध्ये शिवसेनेचे मिलिंद मोकल १४९ मते, काँग्रेसचे राजेश मोकल १२९ मते, काँग्रेसच्या लक्ष्मी नाईक १५७ मते तर भालचंद्र घरत (स्वतंत्र) १३७ मते या उमेदवारांचा १५० हून अधिक मतांच्या फरकाने पराभव झाला.
भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले. सहकारी कृषी पतसंस्था गटात शेतकरी कामगार पक्षाचे एकहाती वर्चस्व असल्याने भाऊ एरणकर यांना २३३, रामदास घासे २३३, कृष्णा म्हात्रे २२९, भाऊ म्हात्रे २३२, प्रफुल्ल म्हात्रे २३५, नितीन पाटील २३२, शरद पाटील २२६ मते मिळाल्याने या शेतकरी कामगार पक्षाच्या उमेदवारांनी एकहाती विजय संपादन केला. या गटातील विरोधी उमेदवार काशिनाथ पाटील यांना फक्त २८ मते मिळून डिपॉझिट जप्त झाले. व्यापारी आडते गटात शेतकरी कामगार पक्षाचे राजेश गाला १५१ व राकेशकुमार शहा १४८ मते मिळून विजयी झाले. विरोधी उमेदवार प्रकाश पाटील यांना २६ मते मिळून डिपॉझिट जप्त झाले.
बिनविरोध उमेदवारात शेतकरी कामगार पक्षाचे प्रमोद तथा पिंट्या भास्कर पाटील, नीलम हरिश्चंद्र पाटील, निशा प्रकाश पाटील, दादू भाऊ कोकले व गजानन नामदेव पाटील या पाच उमेदवारांसह मतमोजणीत विजयी झालेले १३ असे १८ पैकी १८ जागी शेतकरी कामगार पक्षाने एकहाती वर्चस्व मिळवले. यावेळी विजयी उमेदवारांचे आमदार धैर्यशील पाटील यांनी अभिनंदन केले. विजयी उमेदवारांची जंगी मिरवणूक काढण्यात आली. (वार्ताहर)

Web Title: Peking on PEN Bazar Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.