रायगड आयएपीच्या अध्यक्षपदी पाटणकर

By Admin | Updated: April 28, 2017 00:20 IST2017-04-28T00:20:26+5:302017-04-28T00:20:26+5:30

इंडियन अ‍ॅकॅडमी आॅफ पिडीअ‍ॅट्रिक्सच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी माणगाव येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. आबासाहेब पाटणकर

Patangar was elected president of Raigad IAP | रायगड आयएपीच्या अध्यक्षपदी पाटणकर

रायगड आयएपीच्या अध्यक्षपदी पाटणकर

अलिबाग : इंडियन अ‍ॅकॅडमी आॅफ पिडीअ‍ॅट्रिक्सच्या रायगड जिल्हा अध्यक्षपदी माणगाव येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. आबासाहेब पाटणकर यांची एकमताने निवड झाली आहे. डॉ.पाटणकर हे माणगाव येथे गेली वीस वर्षे बालरोग तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहेत. डॉक्टरांच्या विविध संघटनांमधुन सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहेत.
डॉ. पाटणकर त्यांच्या नेतृत्वाखालील नूतन कार्यकारिणीमध्ये खोपोली येथील बालरोग तज्ज्ञ डॉ. प्रमोद वानखेडे यांनी सचिव म्हणून जबाबदारी स्वीकारली आहे. तर महाडचे डॉ.सुनील शेट, अलिबागचे डॉ.राजेंद्र चांदोरकर, पनवेलचे डॉ.विनीत तांबे, उरणचे डॉ. व्यंकटेश गिरी व खारघरचे डॉ.उध्दव तळणीकर यांची कार्यकारिणी मंडळावर निवड करण्यात आली आहे. जिल्हा कार्यकारिणीच्या सल्लागार समितीमध्ये ज्येष्ठ बालरोग तज्ज्ञ व ‘चला मुलांना घडवू या’ उपक्रमाचे प्रणेते डॉ. चंद्रशेखर दाभाडकर (महाड), डॉ. राजीव धामणकर (अलिबाग), डॉ. महेश मोहिते (पनवेल), डॉ. प्रेमचंद जैन (खोपोली), डॉ. हेमंत गंगोलिया (नेरळ) यांचा समावेश आहे. पनवेलच्या डॉ.सोनाली आमले व खोपोलीच्या डॉ. सुनीता इंगळे या महिला संघटक म्हणून कार्यभार सांभाळणार आहेत.
या कार्यक्र माला रायगड जिल्ह्यातील बालरोग तज्ज्ञ उपस्थित होते. (विशेष प्रतिनिधी)

Web Title: Patangar was elected president of Raigad IAP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.