शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
RCB चे अभिनंदन न करता MS Dhoni ड्रेसिंग रुममध्ये का परतला? समोर आलं कारण 
3
राहुल गांधी आणि अखिलेश यादव यांच्या सभेत गोंधळ; बॅरिकेड्स तोडल्यामुळे चेंगराचेंगरी
4
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
5
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
6
Swati Maliwal Case : दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानातून सीसीटीव्ही डीव्हीआर जप्त केला
7
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
8
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
9
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
10
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
11
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
12
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
13
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
14
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
15
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
16
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
17
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
18
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
19
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
20
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू

ऑनलाइन शिक्षणाबाबत पालक चिंताग्रत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2020 12:01 AM

अनेकांचा विरोध : सुविधा नसल्याने अडचणी

आगरदांडा : कोविडच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत राज्यातील शाळा प्रत्यक्षात सुरू करणे शक्य नसल्याने, १५ जूनपासून शैक्षणिक वर्ग सुरू करून स्थानिक परिस्थितीनुसार प्रत्यक्ष शाळा सुरू करण्याबाबत निर्णय घेण्याचे अधिकार संबंधित जिल्हाधिकारी व संबंधित शाळा व्यवस्थापन समिती यांना घेण्याचे आदेश काढण्यात आले होते. त्या अनुषंगाने तालुक्यातील मुख्याध्यापक सर्व शाळांना आॅनलाइन अभ्यासक्रम कधी आणि किती घ्यावा, याचे परिपत्रक दिले आहे. त्याप्रमाणे, आदेश मुरुड पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी यांनी काढल्यानंतर विद्यार्थी व पालक चिंताग्रस्त झाले आहेत. तर काही सधन आणि एकुलते एक मूल असणाऱ्या पालकांनी आॅनलाइन शिक्षणाचा मार्ग आनंदाने अनुसरला आहे. तरी त्याला विरोध करणाºया पालकांचीही संख्या दखल घेण्याजोगी आहे. बºयाच शाळांच्या ग्रुपवर याबाबतच्या चर्चा सुरू आहे.

आॅनलाइन शिक्षणासाठी काही शाळा सज्ज असल्या, तरी मुरुडमध्ये इंटरनेट नेटवर्कची मोठी अडचण आहे. वारंवार वीजपुरवठा खंडित होतो, त्यामुळे वाय-फाय चालत नाही. आॅनलाइन शिक्षणामुळे मुलांना विषयांचे आकलन पटकन होणार नाही, तसेच शंका विचारता येणार नाहीत. ३० टक्के मुलांकडे अँड्रॉइड फोनच नाहीत व घेण्यासारखी परिस्थिती नाही. इंटरनेटसह मोबाइल हातात आला की, मुले गेम, चॅटिंग किंवा नको त्या विषयांकडे वळतील, तीन तास मोबाइलवर राहिल्याने डोळे खराब होतील, आशी भीती पालकांना आहे.आॅनलाइन शिक्षण कसे होणार? पालकांपुढे प्रश्नबºयाच मुलांचे दोन्ही पालक नोकरी करत असल्याने, भ्रमणध्वनी घरी ठेवणे त्यांना शक्य नाही. पालकांनी नवा भ्रमणध्वनी खरेदी करावा, अशी शाळेची अपेक्षा आहे. ज्यांच्या दोन मुलांची शाळा एकाच वेळी भरते, अशा पालकांनाही हाच सल्ला दिला जातो. इलेक्ट्रॉनिक उपकरणांची विक्री वाढावी, म्हणून आॅनलाइन शिक्षण सुरू झाले आहे का, अशी शंका पालक उपस्थित करीत आहेत. पालक कार्यालयात गेल्यावर काही मुले आजी-आजोबांबरोबर असतात. त्यांना इलेक्ट्रॉनिक उपकरणे हाताळता येत नाहीत. काहींकडे इंटरनेट नाही, अशा अनेक तक्रारींचा पाढा पालक वाचत आहेत.वेळापत्रक जारीआॅनलाइन वर्ग १६ आॅगस्टपासून सुरू होणार आहेत. शिक्षणाचा कालावधी पूर्व प्राथमिक सोमवार ते शुक्रवार ३० मिनिटे, पालकांशी संवाद व त्यांना मार्गदर्शन. पहिली ते दुसरी सोमवार ते शुक्रवार प्रत्येक दिवशी ३० मिनिटांचे दोन सत्रापर्यंत. त्यापैकी १५ मिनिटे पालकांशी संवाद व मार्गदर्शन आणि १५ मिनिटे विद्यार्थांना उपक्रम आधारित शिक्षण. तिसरी ते आठवी सोमवार ते शुक्रवार प्रत्येक दिवशी ४५ मिनिटांचे दोन सत्रापर्यंत शिक्षण, नववी ते बारावी सोमवार ते शुक्रवार प्रत्येक दिवशी ४५ मिनिटांचे चार सत्रापर्यंत आॅनलाइन शिक्षण आसणार आहे.