परिचारिका केंद्रावर पालकांची धडक
By Admin | Updated: August 27, 2015 23:15 IST2015-08-27T23:15:29+5:302015-08-27T23:15:29+5:30
परिचारिका केंद्राच्या इमारतीच्या दुरवस्थेबाबत गुरुवारी पालकांनी हल्लाबोल केला. यानंतर विद्यार्थिनींच्या राहण्याची तातडीने पर्यायी व्यवस्था करण्यात येईल, असे लेखी आश्वासन

परिचारिका केंद्रावर पालकांची धडक
अलिबाग : परिचारिका केंद्राच्या इमारतीच्या दुरवस्थेबाबत गुरुवारी पालकांनी हल्लाबोल केला. यानंतर विद्यार्थिनींच्या राहण्याची तातडीने पर्यायी व्यवस्था करण्यात येईल, असे लेखी आश्वासन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाहुबली नागावकर यांनी दिले. त्यानंतर पालकांनी सुटकेचा नि:श्वास टाकला.
येथील परिचारिका केंद्राच्या इमारतीची दुरवस्था झाल्याने स्लॅब कोसळून एक विद्यार्थिनी जखमी झाली होती. परिचारिकेचे प्रशिक्षण घेणाऱ्या १०३ मुली जीव मुठीत घेऊन येथे वास्तव्य करीत असल्याबाबत लोकमतने उघड केले होते. वृत्त वाचून
गुरु वारी विद्यार्थिनींच्या पालकांनी थेट परिचारिका केंद्राच्या इमारतीवर धडक दिली. पालकांनी तेथे एकच हल्लाबोल केल्याने तेथील सर्व आरोग्य विभागातील प्रशासकीय यंत्रणा हादरून गेली. इमारतीची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, दुरुस्तीच्या कालावधीत विद्यार्थिनींची राहण्याची पर्यायी व्यवस्था करावी, सुरक्षा रक्षक पुरवावा अशा विविध मागण्या पालकांनी केल्या.
रुग्णालय प्रशिक्षण केंद्र, जिल्हा प्रशिक्षण केंद्र आणि बाह्य रुग्ण विभागाच्या दुसऱ्या मजल्यावर पर्यायी व्यवस्था करण्यात येईल, तेथे सुरक्षा रक्षकही पुरविण्यात येणार असल्याचे डॉ. नागावकर यांनी पालकांना लेखी लिहून दिले. (प्रतिनिधी)