शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

पोलादपुरात महामार्ग भूसंपादनात अन्याय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 28, 2017 00:59 IST

मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात सातत्याने सहकार्याची भूमिका घेणाºया पोलादपूर शहरातील महामार्ग बाधित ७५हून अधिक ग्रामस्थांना भूसंपादित केलेल्या जमिनीचे अत्यल्प दर देऊन शासन पोलादपूरकरांवर अन्याय करत आहे.

पोलादपूर : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात सातत्याने सहकार्याची भूमिका घेणाºया पोलादपूर शहरातील महामार्ग बाधित ७५हून अधिक ग्रामस्थांना भूसंपादित केलेल्या जमिनीचे अत्यल्प दर देऊन शासन पोलादपूरकरांवर अन्याय करत आहे.शेजारील महाड नगरपरिषदेच्या हद्दीत जमिनीला रेडिरेकनरचा दर सात लाख असून, तेथील ग्रामस्थांना प्रतिगुंठा १४ लाख रु पये, हा दर दिला गेला. त्या तुलनेत पोलादपूर नगरपंचायत हद्दीतील जमिनीला दर मिळावा, ही रास्त मागणी ग्रामस्थांची आहे. वास्तविक पाहता, पोलादपूर एस.टी.बसस्थानकाला लागून एक किलोमीटरचा परिसर हा वाणिज्य वापराचा आहे.तसेच पोलादपूर हे ऐतिहासिक व पर्यटनस्थळ असून, पोलादपूर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने या परिसरात व्यापाराची मोठ्या प्रमाणात उलाढाल होत असते. याच भागातून सातारा-बंगळुरू मार्ग, पणजी, तळकोकणात जाणारा मार्ग, महाड, विन्हेरे,दापोली, मंडनगड मार्ग जातो, त्यामुळे ही तालुक्याची प्रमुख बाजारपेठ आहे. आजच्या बाजारभावाने या जमिनीचा भाव प्रतिगुंठा २० लाख रु पयेप्रमाणे आहे. त्यामुळे शासनाने किमान बाजारभावाप्रमाणे या जमिनीला दर द्यावा, ही मागणी ग्रामस्थांची आहे. तसे निवेदन ग्रामस्थांनी मुख्यमंत्री महोदयांना दिले आहे. या मागणीचा शासनाने विचार करून पोलादपूरकरांवरील अन्याय दूर करावा. आयुष्यभरचे उदरनिर्वाहाचे साधन असणारी व्यापारी जमीन शासनाच्या योजनेसाठी दिल्यानंतर किमान उर्वरित आयुष्यात जगण्याइतपत जमिनीचा दर शासनाने द्यावा, या मागणीचा शासन दरबारी सकारात्मक विचार व्हायलाच हवा, अशा सर्व मागण्यांचे निवेदन उपविभागीय अधिकारी इनामदार यांना देण्यात आले.पोलादपूर येथील महामार्गाचे रु ंदीकरण करून केला जाणारा रस्ता हा सध्याच्या महामार्गापेक्षा सुमारे चार-पाच मीटर जमीन खोदून, दोन्ही बाजूने भिंत उभारून जमिनीअंतर्गत बोगद्यासारखा बनविला जाणार असल्याची माहिती मिळते. तसे झाल्यास पोलादपूरचा व्यवसाय हा महामार्गावर प्रवास करणाºया प्रवाशांच्या जीवावर चालतो. पोलादपूरकरांचे उत्पन्नाचे हे एकमेव साधन आहे. त्यामुळे अशा प्रकारचा रस्ता बनविण्यास ग्रामस्थांचा सक्त विरोध आहे. तसा प्रयत्न झाल्यास तीव्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा महामार्ग बाधित समितीने दिला आहे. त्यामुळे पोलादपूर येथील नवीन बनविला जाणारा महामार्ग हा आताच्या महामार्गाचे रु ंदीकरण हे सद्यपरिस्थितीत असणाºया महामार्गास लागून समांतररेषेत दोन्ही बाजूने करण्यात यावे, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.हा महामार्ग लवकरात लवकर व्हावा, यासाठी ग्रामस्थांची सहकार्याची भूमिका असून, आपले जमिनीचे हक्क अबाधित ठेवून शासनाला सहकार्य करण्याची भूमिका ग्रामस्थांकडून घेतली गेली आहे. मात्र, जमिनीला योग्य दर मिळावा, यासाठीची मागणी शासन दरबारी लावून धरत आलेल्या दराने रक्कम स्वीकारण्याची तयारी दाखवून वाढीव मोबदला रक्कम व नुकसानभरपाई मागणीची कारवाई करण्याचे हक्क राखून ठेवून (अंडर प्रोटेस्ट) स्वीकारण्याची तयारी ग्रामस्थांनी दाखवली आहे.