शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

पनवेलचे एसटी आगार खड्ड्यांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 28, 2018 23:16 IST

पनवेल एसटी डेपोची दयनीय अवस्था झाली आहे. संपूर्ण डेपो खड्डेमय झाला आहे, तसेच डेपोत कमालीची अस्वच्छता पसरली आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत.

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : पनवेल एसटी डेपोची दयनीय अवस्था झाली आहे. संपूर्ण डेपो खड्डेमय झाला आहे, तसेच डेपोत कमालीची अस्वच्छता पसरली आहे. ठिकठिकाणी कचऱ्याचे ढीग साचले आहेत. खड्ड्यांतून बस चालविताना चालकांची कसरत होत आहे. यात प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यासंदर्भात एसटी महामंडळाकडून कोणतीही कार्यवाही होत नसल्याने प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली आहे.पनवेल बसस्थानकात दररोज जवळपास पाच हजार बसेस ये-जा करतात. हे बसस्थानक मध्यवर्ती ठिकाणी असल्याने कोकण, मराठवाड्यासह राज्याच्या विविध भागात जाणाºया प्रवाशांची येथे मोठी गर्दी असते. या डेपोतून दादर, कुर्ला, ठाणे, अलिबाग, उरण, डोंबिवली आदीसह ग्रामीण भागासाठी बसेस सुटतात. त्यामुळे या डेपोला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे. सण-उत्सव काळात तर या डेपोत प्रवाशांची कमालीची गर्दी असते. या पार्श्वभूमीवर डेपोची नियमित डागडुजी करणे गरजेचे आहे. प्रत्यक्षात मात्र परिस्थिती वेगळी आहे. डागडुजीअभावी डेपोत खड्डे आहेत, की, खड्ड्यांत डेपो अशीच काहीशी परिस्थिती येथे निर्माण झाली आहे. दोन वर्षांपूर्वी डेपोच्या काही भागात काँक्रीटीकरण करण्यात आले होते. त्यामुळे कोकणात जाणाºया बसेसना काहीसा दिलासा मिळाला होता. असे असले तरी आता हे काँक्रीटही उखडले आहे. ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. बसेस खड्ड्यांत आपटल्या जात आहेत. त्यामुळे गाडीत बिघाड होण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. त्याचा फटका प्रवाशांना बसत आहे.स्वच्छतागृहाची स्वच्छता केली जात नाही. डेपोच्या आवारात ठिकठिकाणी कचरा साचला आहे. मलनि:सारण वाहिन्या सुद्धा तुंबल्या आहेत. त्याचबरोबर जलवाहिनी तुटली आहे. याबाबत उपाययोजना होताना दिसत नाहीत. या संदर्भात आगार व्यवस्थापक विलास गावडे यांच्याशी संपर्क साधला असता या सर्व संदर्भात वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा सुरू असल्याचे मोघम उत्तर त्यांनी दिले.पनवेल बसस्थानकाच्या नूतनीकरणाकरिता आम्ही पाठपुरावा करीत आहे. या ठिकाणी अनेक समस्या आहेत. त्या अर्जांचा ढीग पडला आहे. मात्र, महामंडळाकडून काहीही केले जात नाही. त्याचे परिणाम प्रवाशांना भोगावे लागत आहेत.- डॉ. भक्तीकुमार दवे, अध्यक्ष प्रवासी संघ, पनवेल

टॅग्स :state transportराज्य परीवहन महामंडळPotholeखड्डेpanvelपनवेल