हवेतील उग्र दर्पाने पनवेलकर त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 01:59 AM2019-11-06T01:59:14+5:302019-11-06T01:59:46+5:30

प्रदूषणात वाढ : रात्रीच्या वेळी कंपन्यांमधून सोडण्यात येतो रसायनिक वायू

Panvelkar stricken with a gust of wind | हवेतील उग्र दर्पाने पनवेलकर त्रस्त

हवेतील उग्र दर्पाने पनवेलकर त्रस्त

Next

वैभव गायकर

पनवेल : दिल्लीतील प्रदूषणाची चर्चा सध्या सर्वत्र होत आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी त्या ठिकाणी सम-विषम वाहने चालविण्यात येत असून शाळाही बंद ठेवण्यात आल्या आहेत. अशीच काहीशी परिस्थिती सध्या पनवेलमध्ये उद्भवली आहे. शहरीकरणाबरोबर तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणामुळे पनवेलमधील वातावरण दिवसेंदिवस दूषित होत असून, रात्रीच्या वेळी कंपन्यांमधून सोडण्यात येणाऱ्या रासायनिक वायूमुळे पनवेलकर त्रस्त आहेत. ज्येष्ठांबरोबरच लहान मुले, तरुणांमध्येही श्वासोच्छ्वासाचे आजार बळावत असल्याने दिसून येत आहे.

दिवाळीनंतर थंडी वाढते. त्याचबरोबरच धुके पसरायला सुरुवात होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून धुक्याबरोबरच वातावरणात धुराचेही प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. धुक्याच्या आडून पनवेल, तळोजा एमआयडीसीतील काही कंपन्यांमधून दूषित विषारी वायू मोठ्या प्रमाणात हवेत सोडले जात आहेत.
प्रदूषणाची आकडेवारीची माहिती देणाºया एका साइटवर गेल्या २४ तासांत हवेची सरासरी गुणवत्ता निर्देशांक (एक्यूआय) १५७ म्हणजेच आरोग्यास धोकादायक असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. पनवेलमध्ये विशेषत: रात्रीच्या वेळी खारघर, कळंबोली, कामोठे तसेच एमआयडीसीतील काही भागात सध्या अतिशय उग्र दर्प अनुभवास येत आहे.
तळोजा एमआयडीसीमधील प्रदूषणाच्या विषय तर राष्ट्रीय हरित लवादामध्ये गेला आहे. लवादाने वेळोवेळी संबंधित यंत्रणेला दंड ठोठावला आहे. मात्र, प्रदूषणाबाबत अद्यापही एमआयडीसी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रक मंडळ बेफिकीर असल्याचे पाहावयास मिळत आहे. याचिकाकर्ते नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. तळोजा एमआयडीसीतील प्रदूषणाचा फटका स्थानिकांबरोबरच खारघर, तळोजा नोड, पनवेल परिसरातील नागरिकांनाही बसत आहे. पनवेलमधील वाढत्या प्रदूषणासंदर्भात प्रदूषण नियंत्रण मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी राहुल मोटे यांच्याकडे विचारणा केली असता, प्रदूषणासंदर्भात राबविण्यात येणाºया उपाययोजनांची माहिती फोनवर देता येणार नसल्याचे सांगून त्यांनी टाळाटाळ केली. एकीकडे वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असताना अधिकारी वर्ग मात्र जबाबदारी झटकत असल्याचे दिसून आले.

उग्र वायूने नागरिक हैराण
खारघर, कळंबोली, कामोठे, पनवेल परिसरातील नागरिकांना संध्याकाळ होताच उग्र दर्पाला सामोरे
जावे लागते. हा दर्प नवजात बालके, श्वसनाचा
त्रास असलेल्यांसाठी घातक आहे. याबाबत
प्रदूषण नियंत्रण मंडळाने योग्य ती पावले उचलणे गरजेचे आहे.

वायुप्रदूषणामुळे उद्भणारे आजार
च्श्वासोच्छ्वासाचा त्रास बळावतो.
च्घसा दुखणे, डोळ्यांची जळजळ होणे
च्स्मरणशक्तीवर परिणाम होतो
च्चिडचिड वाढते.
च्एकाग्रतेत बाधा येते.
च्फुप्फुसांना सूज येते. परिणामी, रक्तवाहिन्या व हृदयाला इजा होण्याची शक्यता बळावते

Web Title: Panvelkar stricken with a gust of wind

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.