शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
2
Pune: पुण्याच्या विमानतळ परिसरात बिबट्या, सगळ्यांना फुटला घाम; तुम्ही व्हिडीओ बघितला का?
3
पाकिस्तानला धडा शिकवण्यासाठीचा प्लॅन तयार, पंतप्रधान मोदी बुधवारी घेणार चार बैठका, त्यानंतर...  
4
'बुके नको बुकं द्या'! बिरदेव डोणेचं आवाहन, बॉलिवूड अभिनेत्रीच्या बॉयफ्रेंडने पाठवली हजार पुस्तकं
5
'जबाबदारीच्या वेळीच बेपत्ता'; काँग्रेसचा PM मोदींवर वार, भाजपचे नेतेही भडकले
6
प्रीती झिंटा भाजपमध्ये प्रवेश करणार? अभिनेत्रीने केला खुलासा, म्हणाली- "मला देशाबद्दल प्रेम आहे त्यामुळे..."
7
इन्फोसिसमध्ये वर्षात तिसरी नोकरकपात! १९५ कर्मचाऱ्यांना दाखवला बाहेरचा रस्ता; काय आहे कारण?
8
कॅनडाचा निवडणूक निकाल भारतासाठी आहे खास; खलिस्तानी धुपले, पक्षाची मान्यताच गेली
9
माजी पाकिस्तानी खासदार भारतात हलाखीच्या परिस्थितीत; कुल्फी विकून उदरनिर्वाह, कोण आहेत ?
10
माणुसकी म्हणून तरी आमच्या भावनांशी खेळू नका; पहलगामच्या राजकारणावर असावरीच्या आईची प्रतिक्रिया
11
छत्रपती संभाजीनगरचा जन्म, 'ही' मराठमोळी मुलगी थेट विजय देवरकोंडासोबत झळकणार
12
देशाच्या सुरक्षेचा विषय असेल तर हेरगिरी करण्यात काय अडचण?; पेगाससवरुन सुप्रीम कोर्टाचा सवाल
13
पाकिस्तानसोबत युद्ध झाल्यास भारताचा पराभव निश्चित; काँग्रेस नेत्याच्या पोस्टनं नवा वाद
14
आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडं षटक, ६ चेंडूत दिल्या ३७ धावा, गोलंदाजाचं नाव ऐकून चकीत व्हाल
15
आयपीएलमध्ये विक्रमी शतक झळकावणाऱ्या वैभव सूर्यवंशीला राज्य सरकारकडून मोठं बक्षीस!
16
टाटा मिठाची कहाणी: छोट्या व्यवसायात का उतरले रतन टाटा? पैसा कामावणं नाही तर, 'हे' होतं कारण
17
सोलापूर पुन्हा हादरले! हात अन् गळा चिरून प्रशिक्षणार्थी डॉक्टरने केली आत्महत्या
18
क्रेडिट कार्ड UPI शी लिंक केल्यास मिळतात 'हे' फायदे; प्रत्येकवेळी खिशात बाळगण्याची गरज नाही
19
आयपीएलमध्ये विक्रमी शतक ठोकणारा वैभव सूर्यवंशी कितवीत शिकतो? कुठल्या शाळेत जातो? जाणून घ्या
20
"कारगिलमध्ये हरवलं होतं, जरा डोकं लावा..."; धवनने आफ्रिदीला सुनावले; अपमानाची करुन दिली आठवण

पनवेलमध्ये पुन्हा ‘पाणी’बाणी?; दिवसाआड पाणीपुरवठा होण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2018 00:54 IST

ग्रामीण भागातही पाण्याची समस्या गंभीर

- वैभव गायकरपनवेल : मागील वर्षाप्रमाणे या वर्षीदेखील पनवेल शहरातील पाण्याची समस्या गंभीर रूप धारण करण्याची शक्यता आहे. आबासाहेब वेदक (देहरंग) धरणातील अपुरा पाणीसाठा या गोष्टीला कारणीभूत ठरणार आहे. कारण या धरणातील पाणीसाठा कमी होताना दिसत असून याची झळ पनवेलवासीयांना बसण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेने आतापासूनच पाण्याचे नियोजन करायला सुरुवात केली आहे. याचाच एक भाग म्हणून पावसाळ्यापर्यंत पनवेलकरांना दिवसाआड पाणी देण्याच्या हालचाली सुरू असल्याची माहिती सूत्राने दिली.पनवेल महानगरपालिकेच्या क्षेत्रात देहरंग धरण, एमजेपी, एमआयडीसी, सिडको आदी प्राधिकरणांच्या मार्फत पाणीपुरवठा केला जातो. यापैकी खारघर, कळंबोली, कामोठे नोडमध्ये सिडको मार्फत पाणीपुरवठा केला जातो. तर नवीन पनवेल शहराला एमजेपी व सिडकोमार्फत पाणीपुरवठा केला जातो. पनवेल शहराला एमजेपी, आप्पासाहेब वेदक धरण व एमआयडीसी मार्फत पाणीपुरवठा केला जातो. मात्र, देहरंग धरणातील पाणीसाठा एप्रिल महिन्यापूर्वीच संपुष्टात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सद्यस्थितीला खारघरमध्ये ९० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. प्रत्यक्षात त्या भागात ६५ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो, तसेच कळंबोली शहराला ४२ एमएलडी पाण्याची गरज असताना ३८ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. कामोठे नोडला ६० एमएलडीऐवजी फक्त ३५ एमएलडी पाणी दिले जाते. तळोजा नोडसाठी २० एमएलडी पाण्याची आवश्यकता असताना केवळ १० एमएलडी पाण्यावर येथील रहिवाशांची बोळवण केली जात आहे. नवीन पनवेल शहराला ४६ एमएलडी पाण्याची गरज असताना प्रत्यक्षात ४० एमएलडी पाणी दिले जाते. पनवेल शहराला ३० एमएलडीची आवश्यकता असताना २० एमएलडी पाणी मिळते, तसेच पालिकेत समाविष्ट २९ गावांना २० एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, या गावांना केवळ दहा एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. विशेष म्हणजे, पालिकेत समाविष्ट २९ गावांना अद्यापही बोरिंग, विहिरींवर अवलंबून राहावे लागत आहे. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी अमृत योजनेअंतर्गत ४०० कोटींचा निधी महापालिकेला उपलब्ध झाला आहे. या योजनेअंतर्गत ४० जलकुंभ बांधण्यात येणार आहेत. १६५ कि.मी.च्या जलवाहिन्या टाकल्या जाणार आहेत.पुढील तीन वर्षांत हे काम संपुष्टात येणार आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर पालिका क्षेत्रात मुबलक पाणीपुरवठा होईल. मात्र, सद्यस्थितीत पाण्याच्या समस्येशी दोन हात करण्यासाठी पालिकेला प्रभावी योजना आखावी लागणार आहे. संपूर्ण पालिका क्षेत्राला सध्याच्या घडीला २९५ एमएलडी पाण्याची आवश्यकता आहे. मात्र, पालिका क्षेत्राला सुमारे ८५ ते ९० एमएलडी तुटवडा भासत आहे.२९ गावांना बोरिंग, विहिरींचा आधारपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील २९ गावांपैकी ११ गावांत अद्याप जलवाहिनी पोहोचलेली नाही. या ठिकाणच्या रहिवाशांना केवळ बोरिंग, विहीर आदी पाण्याच्या स्रोतांवर अवलंबून राहावे लागत आहे. धानसर, रोहिंजण, खुटारी, एकटपाडा, किरवली, पिसार्वे, धारणा, धारणा कॅम्प, तुर्भे, करवले, बीड या ११ गावांचा यात समावेश आहे.पाणी परिषद भरविण्याची मागणीशहराला भेडसावणाऱ्या गंभीर पाणीप्रश्नावर पाणी परिषद भरविण्याची मागणी राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष शिवदास कांबळे यांनी केली आहे. या अंतर्गत शहरासाठी पाण्याचे नियोजन, किती वेळ पाणीपुरवठा केला जाणार आहे, या संदर्भात सविस्तर माहिती या पाणी परिषदेत देण्याची मागणी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे करण्यात आली आहे.पनवेलकरांना मुबलक पाणीपुरवठ्यासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करीत आहोत. अद्याप दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतलेला नाही.- गणेश देशमुख,आयुक्त, पनवेल महापालिकापाणीसाठा किती आहे, शेवटपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत होईल याची खबरदारी भाजपामार्फत घेतली जाईल. पालिका प्रशासनासोबत या संदर्भात सविस्तर चर्चा केली जाईल.- प्रकाश बिनेदार, नगरसेवककेंद्रापासून, राज्यात, पालिकेत सत्तेत भाजपा आहे. सिडको अध्यक्ष, महापौरपद भाजपाकडे असताना पनवेलकरांना पिण्यासाठी मुबलक पाणी मिळत नसेल तर हे दुर्दैव आहे. निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने हवेत विरली आहेत. पालिका क्षेत्रातील अपुºया पाणीपुरवठ्यावरून खुद्द भाजपाच मोर्चे काढत आहे, हे हास्यास्पद आहे.- प्रीतम म्हात्रे, विरोधी पक्षनेते, पनवेल महापालिका

टॅग्स :water shortageपाणीटंचाईpanvelपनवेल