पनवेल ते चिपळूण विशेष रेल्वे नाहीच, अफवांवर विश्वास ठेवू नका; कोंकण रेल्वेचा खुलासा

By वैभव गायकर | Updated: September 2, 2023 11:20 IST2023-09-02T11:20:12+5:302023-09-02T11:20:59+5:30

समाज माध्यमांवर फिरणाऱ्या अफवांवर नागरिकांनी विश्वास न ठेवण्याचे कोकण रेल्वेचे अवाहन.

panvel to chiplun is not a special train do not believe rumours disclosure of konkan railway | पनवेल ते चिपळूण विशेष रेल्वे नाहीच, अफवांवर विश्वास ठेवू नका; कोंकण रेल्वेचा खुलासा

पनवेल ते चिपळूण विशेष रेल्वे नाहीच, अफवांवर विश्वास ठेवू नका; कोंकण रेल्वेचा खुलासा

वैभव गायकर, लोकमत न्युज नेटवर्क, पनवेल: पनवेल ते चिपळूण विशेष रेल्वे दि.4 पासुन पनवेल येथुन सुटणार असल्याची माहिती समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे.मात्र अशाप्रकारची कोणतीच विशेष रेल्वे कोंकण रेल्वेच्या माध्यमातुन सोडली जाणार नसुन तसा कोणता निर्णय झाला नसल्याने या अफवांवर विश्वास ठेवु नका असा खुलासा कोंकण रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी एल के वर्मा यांनी केला आहे.

गणेशोत्सवानिमित्त कोंकणात काही विशेष गाड्या कोंकण रेल्वेच्या वतीने सोडल्या जातात. मात्र पनवेल चिपळूण विशेष रेल्वेबाबत कोणताही वेळापत्रक जाहीर केला नसून समाज माध्यमांवर फिरणाऱ्या अशा अफवांवर नागरिकांनी विश्वास न ठेवण्याचे अवाहन देखील कोंकण रेल्वेच्या वतीने करण्यात आले आहे.

Web Title: panvel to chiplun is not a special train do not believe rumours disclosure of konkan railway