शहरं
Join us  
Trending Stories
1
Sanjay Raut: "लोकशाहीच्या नावानं झुंडशाही सुरू" बिनविरोध निवडीवरून राऊत संतापले, दिला महत्त्वाचा इशारा!
2
Eknath Shinde: महायुतीचे उमेदवार कशामुळं बिनविरोध निवडून आले? एकनाथ शिंदेंनी सांगितलं त्यामागचं खरं कारण!
3
Obscene Content: अश्लील कंटेंटवरून सरकारचा एलन मस्क यांना इशारा, ७२ तासांत मागितला अहवाल!
4
मतदानापूर्वीच महायुतीचं अर्धशतक! कोणत्या महापालिकेत किती उमेदवार बिनविरोध विजयी झाले? वाचा यादी
5
T20 World Cup 2026: क्विंटन डी कॉक, डेव्हिड मिलर, बेबी एबी; दक्षिण आफ्रिकेने उतरवला तगडा संघ
6
महापालिका निवडणुकीचे चित्र स्पष्ट! ७८ जागांवर ३८१ उमेदवार, अनेक प्रभागात चौरंगी-बहुरंगी लढत
7
"मुंबईचे लुटारू तुम्ही, रखवालदार आम्ही"; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर नाव न घेता जहरी टीका
8
पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध
9
Solapur BJP: सोलापुरात भाजपच्या दोन गटांत मोठा राडा, माजी नगरसेवकाचं कार्यालय फोडलं, नेमका वाद काय?
10
महाराष्ट्रात फक्त मराठीच सक्तीची, साहित्य संमेलनातून मुख्यमंत्र्यांचा स्पष्ट संदेश 
11
"...तर निकाल वेगळा लागला असता"; ठाकरे बंधू युतीवर देवेंद्र फडणवीसांनी मतांचं 'गणित' उलगडलं
12
Shreyas Iyerचे न्यूझीलंडविरूद्ध Team India मध्ये पुनरागमन शक्य, पण BCCIने ठेवली 'ही' एक अट
13
'राहुल गांधी अन् भारत विरोधी लॉबी...', उमर खालिदसाठी आलेल्या 'त्या' पत्रांवरुन भाजपची टीका
14
साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मुख्यमंत्र्यांची फोनाफोनी; कुणाशी आणि काय बोलले स्वतःच सांगितलं!
15
मुंबईचा महापौर हिंदू होईल आणि तो मराठीच असेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलं स्पष्ट
16
आदित्य-अमित ठाकरेंकडून जाहीरनामा प्रसिद्ध; ७०० फुटांपर्यंत घरपट्टी माफ, महिलांना १५०० रुपये स्वाभिमान निधी
17
R Ashwin: "यंदाचा टी-२० विश्वचषक कोणीही पाहणार नाही"; रविचंद्रन अश्विन असं का म्हणाला?
18
स्विगी, झोमॅटो सारख्या कंपन्यांच्या डिलिव्हरी बॉईजना सुरक्षा मिळणार! 'या' अटी पूर्ण कराव्या लागतील; नवीन नियम जारी
19
राहुल नार्वेकरांचा Video व्हायरल, "माझ्याशी पंगा घेताय.."; हरिभाऊ राठोड यांनीही केले गंभीर आरोप
20
ठाण्यात एकाच घरात दोन पक्ष! मुलगा शिंदेसेनेतून, आई राष्ट्रवादी (शरद पवार) कडून आमने-सामने
Daily Top 2Weekly Top 5

पनवेल महानगरपालिकेत मतदानाआधीच विजयाचा गुलाल, महायुतीचे तब्बल सात नगरसेवक बिनविरोध

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 21:15 IST

Panvel Municipal Election Result 2026: भाजपाचे सहा तर एक अपक्ष विजयी

Panvel Municipal Election Result 2026: महापालिका निवडणुकांच्या प्रचारसभांचे बिगुल वाजण्याआधीच राज्यात अनपेक्षित घटना घडल्या. राज्यभरातून विविध पद्धतीने महायुतीचे ५०हून अधिक नगरसेवक बिनविरोध निवडून आले. कल्याण डोंबिवलीतून भाजपने खाते उघडले होते. त्यानंतर ठाणे, भिवंडी, अहिल्यानगर पाठोपाठ पनवेल महापालिकेतही मोठ्या संख्येने उमेदवार बिनविरोध विजयी झाले. पनवेल महानगरपालिकेत (Panvel Municipal Election 2026) महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला असून पनवेल महापालिका निवडणुकासाठी आज अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी ७ उमेदवारांनी आपला अर्ज माघारी घेतला आहे. त्यामुळे, भाजपचे ६ आणि १ अपक्ष उमेदवार बिनविरोध विजयी झाले.

{{{{facebook_video_id####https://www.facebook.com/reel/1196576265874250/}}}}

आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी तब्बल सात उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. यात प्रभाग क्रमांक १८ (अ) मधून ममता प्रितम म्हात्रे, प्रभाग क्रमांक १८ (ब) मधून नितीन जयराम पाटील, प्रभाग क्रमांक १९ (अ) मधून दर्शना भगवान भोईर, प्रभाग क्रमांक १९ (ब) रूचिता गुरूनाथ लोंढे, प्रभाग क्रमांक २० (अ) अजय तुकाराम बहिरा, प्रभाग क्रमांक २० (ब) डॉ. प्रियंका तेजस कांडपिळे आणि प्रभाग क्रमांक १८ (क) मधून अपक्ष नगरसेवक स्नेहल स्वप्नील ढमाले हे उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.

बिनविरोध निवडून आलेल्या उमेदवारांची नावे-

१) नितीन पाटील २) रुचिता लोंढे ३) अजय बहिरा ४) दर्शना भोईर ५) प्रियंका कांडपिळे६) ममता प्रितम म्हात्रे७) स्नेहल ढमाले

२०१७ मध्ये पनवेलमध्ये होती भाजपचीच सत्ता

पनवेल महापालिकेवर २०१७ साली भाजपची एक हाती सत्ता आली होती. महापालिकेत याआधी भाजपची एकहाती सत्ता होती. ७८ नगरसेविकांपैकी ५१ नगरसेवक हे भाजपचे निवडून आले होते. यंदा शिवसेना शिंदे गटासोबत भाजपची युती आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेला इथे खातेही उघडता आले नाही. परंतु यावेळी युती झाल्याने दोन्ही पक्ष एकत्र आहेत. आम्ही केलेल्या विकास कामाच्या जोरावर ही निवडणूक लढवणार असल्याचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर सांगत आहेत. तसेच, पुन्हा भाजपचा महापौर बसेल असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला आहे. 

English
हिंदी सारांश
Web Title : Panvel Election: Ruling Alliance Celebrates Seven Uncontested Victories Before Voting

Web Summary : Before Panvel's municipal elections, the ruling alliance secured seven unopposed victories, including six BJP candidates and one independent. In 2017, BJP held a majority in Panvel. BJP leaders express confidence in retaining power.
टॅग्स :Municipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६Panvel Municipal Corporation Electionपनवेल महापालिका निवडणूक २०२६