पेणमध्ये ३९ उमेदवारी अर्ज दाखल

By Admin | Updated: October 28, 2016 03:41 IST2016-10-28T03:41:35+5:302016-10-28T03:41:35+5:30

पेण शहराचा सर्वांगीण विकास हाच एकमेव ध्यास हा अजेंडा मतदानासमोर ठेवीत विकासाच्या संकल्पनेतून पेण शहराची निवडणूक रंगतदार ठरणार अशी प्रारंभीची चिन्हे

PAN filed for 39 nomination papers | पेणमध्ये ३९ उमेदवारी अर्ज दाखल

पेणमध्ये ३९ उमेदवारी अर्ज दाखल

पेण : पेण शहराचा सर्वांगीण विकास हाच एकमेव ध्यास हा अजेंडा मतदानासमोर ठेवीत विकासाच्या संकल्पनेतून पेण शहराची निवडणूक रंगतदार ठरणार अशी प्रारंभीची चिन्हे दिसत आहेत. पेण नगर परिषदेच्या २०१६ च्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी गुरुवारी अर्ज भरण्याच्या तिसऱ्या दिवशी सत्ताधारी काँग्रेस पक्षातर्फे विद्यमान नगराध्यक्ष प्रीतम पाटील यांनी पक्षाचा ए बी फॉर्मसहित नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरला. पेण शहर विकास आघाडीचे विद्यमान नगरसेवक व माजी नगराध्यक्ष संतोष शृंगारपुरे यांनी नगराध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज सादर केला. यामुळे ही लढत रंगतदार ठरणार असून दोन्ही गटाकडून एकूण ३७ समर्थकांसहित शक्तिप्रदर्शन केले.
पेण नगर परिषदेसह रायगडमधील नऊ नगर पालिकांच्या निवडणुकीचे बिगुल वाजले असून उमेदवारांचे सक्षमता, लोकप्रियता, लोकांच्या अडीअडचणींना धावून जाणारा, आर्थिक क्षमता व कार्यकर्त्यांचा संच या निकषावर पेणच्या दोन्ही गटाकडून लक्ष केंद्रीत करून उमेदवारी देण्यात आली आहे. सत्ता काबीज करण्यासाठी दोन्ही गटाकडून अटीतटीचे प्रयत्न सुरू राहणार. उमेदवारांमध्ये दोन्ही गटांकडे विद्यमान नगरसेवकांचाच अधिक भरणा दिसत असून पेण शहराच्या वॉर्डावॉर्डामध्ये असलेले प्रस्थापितांचे मताचे एकगठ्ठा पॅकेटसह, नवमतदारांना खेचण्याचा व गोळाबेरीज करून डाव सावरण्याचा प्रयत्न सुरू राहणार आहे.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे नगराध्यक्षांची थेट मतदारांमधून निवड होणार असल्याने मतदारांमध्ये या निवडणुकीबाबत उत्सुकता आहे. येत्या महिनाभरात याबाबत मतदारांचे विचारमंथन होवून ही राजकीय हवा तापत राहणार आहे. गुरु वारी दोन्ही गटाने प्रमुख नेतेमंडळी, शहरातील प्रतिष्ठित मान्यवरांसह उमेदवारी अर्ज सादर केले.
काँग्रेसतर्फे माजी मंत्री रवींद्र पाटील तर पेण शहर विकास आघाडीतर्फे शेकाप आ. धैर्यशील पाटील, भाजपाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाळासाहेब पाटील यांची उपस्थिती होती. यावेळी निवडणूक अधिकारी व पोलीस यंत्रणेने चोख बंदोबस्त ठेवला होता. यावेळी शांततेत अर्ज दाखल के ले. (वार्ताहर)

Web Title: PAN filed for 39 nomination papers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.