शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसांत दाेनदा प्रवासी लटकले; सीएसएमटी ते वडाळ्यापर्यंत वाहतूक कोलमडली
2
अमित शाहांच्या मॉर्फ्ड व्हिडीओ प्रकरणी X कडून मोठी कारवाई, झारखंड काँग्रेसचं अकाऊंट केलं बंद
3
आजचे राशीभविष्य - २ मे २०२४; व्यापारासाठी दिवस उत्तम, आर्थिक बाबी मार्गी लागतील
4
२८-१५-५ महायुतीचा फॉर्म्युला; नाशिक, ठाणे शिंदेसेनेला, पालघर भाजपकडे
5
किंमत वाढूनही आपण खरेदी केले टनाने सोने; भारतीयांनी तीन महिन्यांत घेतले १३६.६ टन सोने
6
जीएसटीने भरली सरकारची तिजोरी; एप्रिलमध्ये २.१० लाख कोटींची वाढ
7
अमेरिकेपेक्षा भारतातच ‘एआय’चा वापर अधिक; तंत्रज्ञान स्वीकारण्यात देश सर्वात आघाडीवर
8
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदानाची अंतिम टक्केवारी जाहीर; ३ टक्क्यांची वाढ
9
राज ठाकरे सभा घेऊन कोणाच्या वरातीत नाचणार? सभेसाठी मनसेच्या अर्जावर उद्धवसेनेची टीका
10
भाजप-उद्धवसेना फक्त एका ठिकाणी समोरासमोर; गळ्यात गळे घालून फिरणारे शिवसैनिक एकमेकांच्या विरोधात
11
मुंबईत षटकार मारणार, राज्यात १५ जागा जिंकणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विश्वास
12
लॉकअपमधल्या चादरीच्या पट्टीने गळफास घेत बिश्नोई गँगच्या आरोपीची आत्महत्या
13
देशाच्या विकासात काँग्रेस अडथळा; ‘फॅमिली फर्स्ट’मुळे भारताचे नुकसान, योगी आदित्यनाथ यांचे टीकास्त्र
14
ठाण्यात दोघा माजी महापौरांमध्ये पुन्हा लढत; २०१४ मध्ये राजन विचारे विरुद्ध संजीव नाईक झाली होती लढत
15
प्रज्वल रेवण्णा उद्या बंगळुरूत येणार; आरोप तथ्यहीन असल्याचा दावा
16
पंतप्रधानांच्या पत्रात दडला निवडणुकीचा अजेंडा; उमेदवारांच्या माध्यमातून मतदारांना संदेश
17
श्रीकांत यांच्या कल्याणसाठी म्हस्केंना उमेदवारी देऊन विचारेंना बाय ? राजन विचारे यांना निवडणूक सोपी जाणार अशी चर्चा सुरू
18
शिंदेंना चढावी लागणार ‘व्हाइट हाउस’ची पायरी; गणेश नाईक यांचा नवी मुंबईसह आगरी मतांवर प्रभाव
19
मराठी पाट्यांचे रडगाणे; ९८ टक्के आस्थापनांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन केले
20
दगडफेकीपर्यंतचा प्रचार कोणत्या दिशेने जाणार?

परतीच्या पावसाच्या तडाख्याने भातपीक आडवे

By ऑनलाइन लोकमत | Published: October 15, 2019 11:27 PM

शेतकरी हवालदिल : विमा कवचाचाही लाभ नाही

अलिबाग : गेल्या आठवड्यात परतीच्या पावसाने चांगलाच तडाखा दिल्याने अलिबाग, पेण, कर्जत, माणगाव या तालुक्यांतील काही ठिकाणी भातपीक आडवे झाले होते. जिल्ह्यातील नुकसानीचा एकूण आकडा हा सुमारे पाच टक्क्यांपेक्षा कमी दिसत असला, तरी यामध्ये येणाऱ्या शेतकऱ्यांना चांगलाच आर्थिक फटका बसला आहे. तर दुसरीकडे ९५ हजार हेक्टर क्षेत्रापैकी फक्त ३५० हेक्टरवरील ६०० शेतकºयांनीच विमा संरक्षण घेतले आहे. त्यामुळे नुकसान झालेल्या शेतकºयांच्या शेतीचा पंचनामा झाल्याशिवाय कोणाचे किती नुकसान झाले आहे. त्या शेतकºयांनी विमा संरक्षण घेतले होते का? हे स्पष्ट होणार आहे.

वादळी वाºयासह बरसणाºया पावसाने मागील आठवड्यामध्ये सर्वांचीच चांगलीच त्रेधातिरपीट उडवून दिली होती. ठिकठिकाणी झाडे पडणे, घरांचे छप्पर उडणे, गोठ्यांची पडझड असे प्रकार घडले होते. विजेच्या तडाख्यामुळे अनेक गुराढोरांना आपले प्राण गमवावे लागले होते. सोसाट्याच्या वाºयासह बरसणाºया पावसामुळे शेतातील भातपीक आडवे झाले होते. त्यामध्ये प्रामुख्याने अलिबाग, पेण, माणगाव, कर्जत या तालुक्यांचा समावेश आहे. हातातोंडाशी आलेले पीक गेल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.

जिल्ह्यात ९५ हजार हेक्टर क्षेत्रावर भातपीक घेतले जाते. हेक्टरी ४० क्विंटल भाताचे, तर २८ क्विंटल तांदळाचे उत्पादन होते. त्यानुसार ३८ लाख क्विंटल भात आणि २६ लाख ६० हजार क्विंटल तांदळाच उत्पादन होते. सर्वत्र झालेल्या नुकसानीचा आकडा मोठा नसला, तरी ज्या शेतकºयांचे नुकसान झाले आहे. त्यांच्यासाठी फार मोठा आर्थिक फटका असल्याचे बोलले जाते. कारण उभे पीक मातीमोल झाले आहे.जिल्ह्यातील शेतकरी विमा कवच घेण्याच्या भानगडीत पडत नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. ९५ हजार हेक्टर क्षेत्रातील फक्त ३५० हेक्टर क्षेत्रासाठी सुमारे ६०० शेतकºयांनी विमा संरक्षण घेतले आहे. सरकारचे ८०० रुपये आणि शेतकºयांचे ८०० रुपये, असा एकदाच हफ्ता भरायचा असतो. तसेच एका शेतकºयांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले तर विम्याचा लाभ मिळतो.

तसेच आपल्याकडील शेतकºयांच्या नावावर एकरामध्ये शेती नसल्याने विम्याची रक्कम नगण्य अशीच असते. त्यामुळे शेतकरी विम्याचे कवच घेताना दिसून येत नाहीत. त्यामुळे दोन्ही बाजूने शेतकºयांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे चित्र आहे.मजुरीचा खर्च मोठाच्भात कापणीसाठी लागणाºया मजुरांची सध्या चणचण भासत आहे. जे मजूर उपलब्ध होतात, त्यांना सुमारे ५०० रु पयांची रक्कम मजुरी म्हणून द्यावी लागते. मजुरांना जेवण, दोन वेळचा चहा-नाश्ता तसेच येण्या-जाण्याचा प्रवास खर्च द्यावा लागतो. कापणीचा हंगाम सर्वत्र एकाच वेळी आल्याने मजुरांनी आपल्या मजुरीत वाढ केली आहे. वाढत जाणाºया मजुरीचा दर शेतकºयांसाठी डोकेदुखी ठरत आहे. भाताच्या उत्पन्नापेक्षा मजुरी अधिक द्यावी लागत असल्याने शेती परवडत नसल्याचे वाघ्रण येथील शेतकरी आत्माराम पाटील यांनी सांगितले. 

जिल्ह्यात कोठेही मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले नाही. सुमारे पाच टक्क्यांपेक्षा कमी नुकसान झाले आहे. त्यामुळे भातपिकाच्या उत्पादनावर विशेष फरक पडणार नाही. पंचनामा केल्यावरच नेमके किती नुकसान झाले. नुकसान झालेल्या शेतकºयांनी विमा संरक्षण घेतले होते का हे स्पष्ट होईल.- पांडुरंग शेळके, जिल्हा कृषी अधीक्षक