शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

स्थानिकांना न्याय देण्याचे काम संघटनेने करावे - बाळा नांदगावकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2021 00:57 IST

Raigad News : बाजूच्या गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यांत नोकरीबाबत काय धोरण चालू आहे, याचा अभ्यास करून येथील मोठ्या कंपन्यांमध्ये माथाडींना न्याय देण्याचे संघटनेने काम करावे

नागोठणे - स्थानिक कंपन्यांमध्ये १०० टक्के स्थानिक मराठी तरुणांना काम मिळाले पाहिजे, हे मनसेचे धोरण आहे. बाजूच्या गुजरात, कर्नाटक, आंध्रप्रदेश राज्यांत नोकरीबाबत काय धोरण चालू आहे, याचा अभ्यास करून येथील मोठ्या कंपन्यांमध्ये माथाडींना न्याय देण्याचे संघटनेने काम करावे, असा सल्ला मनसेचे नेते, माजी राज्यमंत्री बाळा नांदगावकर यांनी माथाडी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिला.महाराष्ट्र नवनिर्माण माथाडी कामगार सेनेच्या रायगड जिल्ह्यातील नागोठण्यात उघडण्यात आलेल्या पहिल्या कार्यालयाचे उद्‌घाटन नांदगावकर यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी उद्‌घाटनपर भाषणात ते बोलत होते. लोकांना समजून घेऊन काम केले तर यश निश्चितच मिळते. नागोठण्यात उघडलेले रायगड जिल्ह्यातील हे पहिले कार्यालय आहे. जिल्ह्यात आपल्या माथाडी संघटनेची आणखी कार्यालये कशी वाढतील, यासाठी आजपासूनच कामाला लागावे, असा सल्ला नांदगावकर यांनी पदाधिकाऱ्यांना दिला. यावेळी माथाडी संघटनेकडून नांदगावकर यांना या व्यवसायात महत्त्वपूर्ण समजला जाणारा माथाडींचा ‘हुक’ यावेळी भेट देण्यात आला. रायगड जिल्ह्यातील मोठ्या कंपन्यांमध्ये ८० टक्के परप्रांतीय माथाडी कामगार काम करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. ८० टक्के स्थानिक माथाडी कामगार या कंपन्यांमध्ये कसे जातील, यासाठी लवकरच लढा देणार असल्याचे राजन शितोळे यांनी सांगितले.  या कार्यक्रमाला मनसेचे जिल्हा संघटक गोवर्धन पोलसानी, माजी आ. प्रकाश भोईर, संघटनेचे अध्यक्ष अरविंद गावडे, कार्याध्यक्ष सुमंत तारी, राजेश उज्जैनकर, जिल्हाध्यक्ष संजय गायकवाड, प्रदेश सरचिटणीस राजन शितोळे, देवेंद्र गायकवाड, महेश पंडित, सागर चाळके, राजेश शाह, संघटनेचे रोहे तालुका अध्यक्ष विनायक तेलंगे, उपाध्यक्ष गोरखनाथ पारंगे आदींसह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.  तोंडातून निघालेले शब्द हे बाण असून, गोडीने बोलून लोकांची मने जिंकावीत, असा सल्ला नांदगावकर यांनी कार्यकर्त्यांना दिला.

टॅग्स :Bala Nandgaonkarबाळा नांदगावकरMNSमनसेRaigadरायगड