अनधिकृत बांधकामावर कारवाईचे आदेश

By Admin | Updated: April 17, 2017 04:32 IST2017-04-17T04:32:12+5:302017-04-17T04:32:12+5:30

येथील समुद्रकिनारी सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत राज्याचे मुख्य बंदर अधिकारी हे संतप्त झाले आहेत. याबाबतच्या तक्रार अर्जावरच त्यांनी

Order for action against unauthorized construction | अनधिकृत बांधकामावर कारवाईचे आदेश

अनधिकृत बांधकामावर कारवाईचे आदेश

अलिबाग : येथील समुद्रकिनारी सुरू असलेल्या अनधिकृत बांधकामाबाबत राज्याचे मुख्य बंदर अधिकारी हे संतप्त झाले आहेत. याबाबतच्या तक्रार अर्जावरच त्यांनी, आपले अधिकारी करतात काय, असा शेरा मारला आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांची
निष्क्रीयता त्यामुळे उघड झाली. अनधिकृत बांधकाम प्रकरणी कारवाई करण्याचे आदेश प्रादेशिक बंदर अधिकारी महाराष्ट्र मेरीटाइम बोर्ड यांना दिले आहेत. तसेच कार्यवाहीबाबत मुख्यालयाला अहवाल सादर करण्यासही फर्माविले आहे.
येथील आरटीआय कार्यकर्ते संजय सावंत यांनी या अनधिकृत बांधकामाची तक्र ार ई-मेलद्वारे राज्याचे मुख्य बंदर अधिकारी यांच्याकडे केली होती. त्या प्राप्त तक्र ारीची गंभीर दखल राज्याचे मुख्य बंदर अधिकारी यांनी घेतली. अलिबाग समुद्रकिनारी अलिबाग बंदर अधिकारी कार्यालय आहे. या कार्यालयाच्या जवळ समुद्रकिनाऱ्याच्या बंधाऱ्याला खेटूनच महसूल आणि बंदर खात्याची जागा आहे. या जागेमध्ये अनधिकृत बांधकाम सुरू होते. ते थांबविण्याची मागणी अलिबाग येथील अश्रफ घट्टे यांनी अलिबाग नगरपालिकेकडे केली होती. त्यानंतर तेथील कामाला ब्रेक लागला होता. तेथील काम पुन्हा सुरू करण्याच्या हालचाली लक्षात येताच संजय सावंत यांनी थेट राज्य सरकारकडे ४ एप्रिलला तक्र ार केली होती. अलिबाग नगरपालिकेने घट्टे यांना या बांधकामासाठी एमसीझेडएमए, पर्यावरण विभागाकडून परवानगी घेतली नसल्याचे कळविले होते. त्यानंतर नगरपालिकेने हे बांधकाम ‘हागणदारी मुक्ती’ या शासकीय योजनेचा भाग असल्याचे जाहीर केल्याने हे प्रकरण गाजले होते. आता राज्याच्या मुख्य बंदर अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन प्रकरणात कारवाईचे आदेश दिल्याने आमच्या तक्र ारीत तथ्य असल्याचेच सिद्ध झाले आहे, असे अश्रफ घट्टे यांनी सांगितले. याप्रकरणाचा शेवटपर्यंत पाठपुरवा करणार असल्याचे सावंत म्हणाले.

Web Title: Order for action against unauthorized construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.