आॅनलाइन सातबारा खोळंबला
By Admin | Updated: March 18, 2016 00:11 IST2016-03-18T00:11:51+5:302016-03-18T00:11:51+5:30
गतिमान प्रशासनासाठी सरकारने ई-गर्व्हनन्सचा अवलंब केल्याने जनतेची कामे फास्ट ट्रॅकवर आली असली, तरी आॅनलाइन सातबारा मिळण्यात बऱ्याचशा अडचणींचा सामना करावा

आॅनलाइन सातबारा खोळंबला
अलिबाग : गतिमान प्रशासनासाठी सरकारने ई-गर्व्हनन्सचा अवलंब केल्याने जनतेची कामे फास्ट ट्रॅकवर आली असली, तरी आॅनलाइन सातबारा मिळण्यात बऱ्याचशा अडचणींचा सामना करावा लागत आहे. आॅनलाइन सातबारा काढताना सातत्याने सर्व्हर डाऊन होत आहे. त्यामुळे सातबारा उपलब्ध होत नसल्याने जनतेच्या कामांचा खोळंबा होत आहे. यातून तातडीने मार्ग काढावा, अशी मागणी अलिबाग-नागाव येथील समीर राणे यांच्यासह अन्य नागरिकांनी केली आहे. याबाबतचे निवेदन गुरुवारी अलिबागचे नायब तहसीलदार अनिल गोसावी यांना देण्यात आले.
आॅनलाइन सेवा सुरळीत होत नाही तोपर्यंत पूर्वीप्रमाणे हाती सातबारा देण्याबाबतचा विचार करावा, अशी मागणी त्यांनी केली.