पेणमध्ये १ लाख कांदळवनाची लागवड

By Admin | Updated: April 23, 2017 02:19 IST2017-04-23T02:19:45+5:302017-04-23T02:19:45+5:30

स्थानिक महिलांच्या सहकार्याने नर्सरीत कांदळवनांच्या रोपांची निर्मिती करून तब्बल १ लाख ५ हजार ४३५ कांदळवन रोपांची लागवडीचा यशस्वी प्रयोग पेणमधील जेएसडब्ल्यू इस्पात

One lakh sown cultivators | पेणमध्ये १ लाख कांदळवनाची लागवड

पेणमध्ये १ लाख कांदळवनाची लागवड

- जयंत धुळप, अलिबाग
स्थानिक महिलांच्या सहकार्याने नर्सरीत कांदळवनांच्या रोपांची निर्मिती करून तब्बल १ लाख ५ हजार ४३५ कांदळवन रोपांची लागवडीचा यशस्वी प्रयोग पेणमधील जेएसडब्ल्यू इस्पात या लोखंडनिर्मिती उद्योगाच्या ‘सामाजिक उत्तरदायित्व निधी’ आणि पेण तालुक्यांतील पाच गावांतील ३४ महिला स्वयंसहाय्यता गटांनी राबवला आहे. त्यामुळे खाडीकिनाऱ्याजवळील खारपाणी घुसून नापीक झालेल्या शेतात पुन्हा भातशेतीची लागवड करता येणार आहे. कांदळवन लागवडीचा राज्यातील हा पहिलाच प्रकल्प आहे. धरमतर खाडीकिनारचा फुटलेला ५ हजार ९०१ मीटर लांबीचा बंधाराही जेएसडब्ल्यू इस्पातच्या १ कोटी ३३ लाख ७० हजार रुपयांच्या सामाजिक उत्तरदायित्व निधीतून बांधण्यात आला. त्यामुळे नापिक झालेली १५ गावांतील ५ हजार हेक्टर भातशेती खाऱ्या पाण्यापासून संरक्षित झाली.
बंधाऱ्याचे काम सुरू असतानाच, तज्ज्ञ वनस्पती शास्त्रज्ञ आणि किनारी गावांतील जाणकार ग्रामस्थ व स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कांदळवनांच्या कोणत्या जातीची रोपे तयार करायची, हे निश्चित करण्यात आले. तसेच रोपे तयार करण्यासाठी जेएसडब्ल्यूच्या वनस्पती व फलोत्पाद संशोधन विभागाच्या माध्यमातून रोपवाटिका तयार करण्यात आल्या. या रोपवाटिकांमध्ये स्थानिक महिला स्वयंसहाय्यता गटाच्या सुमारे ३४० महिलांनी रोपांची निर्मिती केली.
गतवर्षी ८ आॅक्टोबर रोजी ग्रामसमृद्धी संकल्प चमू, जेएसडब्ल्यूचे अधिकारी, जेएसडब्ल्यू इस्पात सामाजिक उत्तरदायित्व निधी विनियोग समितीचे प्रमुख मोहन घाडगे आणि ३४ महिला स्वयंसहाय्यता गटाच्या सदस्या यांच्या उपस्थितीत कांदळवन रोप लागवडीस प्रारंभ करण्यात आला. २५ ते २८ आॅक्टोबर २०१६दरम्यान लागवड करण्यात आलेल्या या सर्व रोपांचे वनस्पती तज्ज्ञांच्या माध्यमातून परीक्षण करण्यात आले. वर्षभरात रोपांनी चांगलाच जोम धरला असून, धरमतर खाडीकिनारच्या नैसर्गिक जैवविविधतेस नव्याने समृद्धी प्राप्त झाल्याचे शनिवारच्या जागतिक वसुंधरा दिनी स्पष्ट झाले आहे.

भात लागवड शक्य
लागवड करण्यात आलेल्या १ लाख ५ हजार ४३५ कांदळवनांच्या रोपांमुळे नव्याने बांधण्यात आलेल्या बंधाऱ्यावर उधाणाच्या भरतीच्या लाटांच्या माऱ्याची तीव्रता कमी होईल.
शिवाय खाडीकिनारी गावांत यंदाच्या मान्सूनमध्ये पुन्हा एकदा भात लागवडीखाली येऊ शकेल, असा आशावाद धरमतर खाडीकिनारच्या या
१५ गावांतील शेतकरी ग्रामस्थांना आहे.
आगामी काळात विठ्ठलवाडी ते भाल या किनारी भागातील ५० एकर क्षेत्रांत कांदळवन लागवड करण्याचे नियोजन असल्याची माहिती, जेएसडब्ल्यूचे वरिष्ठ व्यवस्थापक अरुण शिर्के यांनी दिली आहे.

Web Title: One lakh sown cultivators

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.