कशेडीतील अपघातात एक ठार
By Admin | Updated: February 7, 2016 00:22 IST2016-02-07T00:22:35+5:302016-02-07T00:22:35+5:30
मुंबई - गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात कंटेनरची कारला धडक होऊन कंटेनर कारसह दरीत कोसळून झालेल्या अपघातात कारचालक राजकुमार वराट

कशेडीतील अपघातात एक ठार
पोलादपूर : मुंबई - गोवा महामार्गावर पोलादपूर तालुक्यातील कशेडी घाटात कंटेनरची कारला धडक होऊन कंटेनर कारसह दरीत कोसळून झालेल्या अपघातात कारचालक राजकुमार वराट (रा. पुणे) हे जागीच ठार झाले, तर कारमधील अन्य पाच गंभीर जखमी झाले.
अपघात शनिवारी दुपारी १२.१५ च्या दरम्यान झाला असून, कारमधील सर्वजण गणपतीपुळे येथे देवदर्शनासाठी निघाले होते. कशेडी घाटात दरीत गेलेल्या कारला काढण्यासाठी पोलादपूर पोलीस ठाणे येथील पीएसआय महाजन, पीएसआय अंधेरे, म्हात्रे व कशेडी टॅप येथील अनिल धाडीगावकर पीएसआय, झगडे, महाडिक, भोसले, चव्हाण यांच्यासमवेत रा.जि.प.चे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत कळंबे उपस्थित होते. जगद्गुरू नरेंद्र महाराज ट्रस्टच्या रुग्णवाहिकेने जखमींना पोलादपूर येथे आणण्यात आले.
शासनाने सुरू केलेल्या १०८ सेवेचा बोजवारा उडालेला दिसून आला. घटनास्थळी खेडच्या दोन रुग्णवाहिका असूनही प्रोटोकॉलमुळे आम्ही जखमींना पुणे येथे नेऊ शकत नसल्याची हतबलता व्यक्त केली गेली. रुग्णवाहिका असूनही वेळेवर उपचार न झाल्यामुळे एखादा अपघातग्रस्त दगावला तर त्याला कारणीभूत कोण, असा प्रश्न प्रवाशांनी यावेळी विचारला. अपघाताची नोंद पोलादपूर पोलीस ठाण्यात झाली असून, पोलीस निरीक्षक संभाजी हरगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमित सावंत पुढील करीत आहेत.