बसखाली चिरडून एक ठार
By Admin | Updated: November 3, 2015 00:41 IST2015-11-03T00:41:58+5:302015-11-03T00:41:58+5:30
उतारावर इंजिन चालूस्थितीत उभी असलेली एसटी बस अचानक पुढे सरकल्याने त्या बसच्या चाकाखाली चिरडून त्याच एसटी बस चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना

बसखाली चिरडून एक ठार
महाड : उतारावर इंजिन चालूस्थितीत उभी असलेली एसटी बस अचानक पुढे सरकल्याने त्या बसच्या चाकाखाली चिरडून त्याच एसटी बस चालकाचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही दुर्घटना रविवारी रात्री ८.३० वा. च्या सुमारास फौजी आंबबडे आचरेवाडी येथे घडली. मोहन दत्तात्रेय मेंडे (५४, रा. काकरतळे, महाड) असे मृत्यू झालेल्या बसचालकाचे नाव आहे.
महाड आगाराची महाड फौजी आंबवडे ही एसटी बस आचरेवाडी येथे वस्तीसाठी थांबली होती. आयरेवाडी येथे बसमधील सर्व प्रवासी उतरल्यानंतर ही बस चालक मेंढे यांनी जवळच उतारावर थांबवली. इंजिन चालूस्थितीत असतानाच चालक मेंढे हे गाडीतून उतरले. मात्र बस अचानक उतारावरुन पुढे जात असल्याचे मेंढे यांच्या लक्षात आले. त्याचवेळी बसचे मागील चाक त्यांच्या अंगावरुन गेल्याने त्याचा चिरडून जागीच मृत्यू झाला.
ग्रामीण पोलीस ठाण्यात या अपघात प्रकरणाची नोंद आहे. बसचालक मेंढे यांच्या अपघाती निधनाबद्दल काकरतळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (वार्ताहर)