शहरं
Join us  
Trending Stories
1
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
2
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
3
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
4
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
5
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
6
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
7
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
8
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
9
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
10
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
11
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
12
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
13
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
14
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
15
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
16
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
17
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
18
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
19
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
20
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
Daily Top 2Weekly Top 5

माणगाव तालुक्यात गावठी बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू; दोघा जखमींमध्ये १० वर्षांच्या मुलाचा समावेश 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2021 11:26 IST

या स्फोटात सत्यम याला गंभीर दुखापत होऊन संदेशची पत्नी मजिनाबाई हिला किरकोळ दुखापत झाली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलाला तत्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचाराकरिता आणण्यात आले.

रायगड:  माणगाव तालुक्यातील निजामपूरजवळ गावठी हातबॉम्बच्या स्फोट झाला आहे. या भीषण स्फोटात एकाचा जागीच मृत्यू झाला असून, स्फोटामध्ये  एक १० वर्षीय मुलगा गंभीर जखमी झाला आहे तर त्याची आई किरकोळ जखमी झाली आहे. ही घटना मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली. यानंतर घटनास्थळी पोलिसांनी २५ हातबॉम्ब हस्तगत केले आहेत. या भीषण स्फोटात संदेश आदिवासी चौहान (वय ४५) याचा जागीच मृत्यू झाला. संदेशची पत्नी मजिनाबाई संदेश चौहान (वय ४०) व मुलगा सत्यम संदेश चौहान (वय १०) (सर्व रा. बिराहली, ता. रिथी, जि. कठनी, मध्य प्रदेश) हे जखमी झाले आहेत. डुकराच्या शिकारीसाठी हातबॉम्बचा वापर करण्यात येतो. चौहान कुटुंब  याच कारणासाठी बॉम्बचा वापर करत असल्याची माहिती पुढे आली आहे. निजामपूर विभागातील चन्नाट रस्त्यावर मशीदवाडी गावाच्या हद्दीत माळरानात शेतावर धामणी नदीजवळ ही घटना घडली. या घटनेची नोंद माणगाव पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.संदेश हा त्याची पत्नी मजिनाबाई, मुलगा सत्यम हे माणगाव तालुक्यातील मशीदवाडी गावच्या हद्दीत धामणी नदीशेजारी शेतातील माळरानात उघड्यावर राहात होते. मंगळवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास संदेश चौहान हा हातबॉम्ब हाताळत असताना त्या बॉम्बचा अचानक स्फोट झाला. त्यामध्ये संदेश यांच्या हाताला आणि शरिराला गंभीर जखमा झाल्या. यामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला.

जखमींवर पनवेलमध्ये उपचार या स्फोटात सत्यम याला गंभीर दुखापत होऊन संदेशची पत्नी मजिनाबाई हिला किरकोळ दुखापत झाली. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या मुलाला तत्काळ माणगाव उपजिल्हा रुग्णालयात औषधोपचाराकरिता आणण्यात आले. याठिकाणी त्याच्यावर प्राथमिक औषधोपचार केल्यावर त्याची गंभीर परिस्थिती पाहून त्याला अधिक औषधोपचारांसाठी एमजीएम रुग्णालय येथे हलविले. 

एका झाडावर लपवलेले २५ गावठी हातबाॅम्ब सापडले. हे लोक मध्य प्रदेशातील पारधी समाजाचे आहेत. बॉम्ब घटनास्थळीच तयार केले असावेत आणि ते हाताळताना स्फोट झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. - अतुल झेंडे, अपर जिल्हा पोलीस अधीक्षक 

टॅग्स :Blastस्फोटRaigadरायगडDeathमृत्यू