महाडजवळ दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक गंभीर
By Admin | Updated: October 10, 2015 23:50 IST2015-10-10T23:50:03+5:302015-10-10T23:50:03+5:30
भरधाव दुचाकींची समोरासमोर जोरदार टक्कर होऊन झालेल्या दुर्घटनेत दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाले, तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला. त्याला सायन रुग्णालयात दाखल

महाडजवळ दुचाकींच्या अपघातात एक ठार, एक गंभीर
महाड : भरधाव दुचाकींची समोरासमोर जोरदार टक्कर होऊन झालेल्या दुर्घटनेत दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाले, तर एक जण गंभीररीत्या जखमी झाला. त्याला सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. आज शनिवारी पहाटे ५.३० वा. महाड रायगड मांगीवल कोळसे गावच्या हद्दीत घडला.
संदेश विजय पवार (१८, रा. वाळसुरे) व विशाल सुभाष शिंदे (२३, रा. साकीनाका, मुंबई) अशी मृतांची नावे असून, विजय सीताराम पवार (५०) हे यांची प्रकृती चिंताजनक आहे. संदेश हा आपल्या वडील विजय पवार यांच्यासह वाळसुरे येथून महाडकडे हीरोहोंडा दुचाकीने येत असता समोरून रायगडकडे जाणाऱ्या भरधाव दुचाकीने त्याच्या दुचाकीला ठोकरले. यात दोघे दुचाकीस्वार जागीच ठार झाले.
शहर पोलीस ठाण्यात या अपघाताप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (वार्ताहर)